|
" मला फक्त एक व्यवसायिक चित्रपट करायचा नव्हता."
- आदिती देशपांडे |
आदिती देशपांडे हे नाव मराठी चित्रपटात नवख नाही. त्यांनी 'नॉट ओन्ली मिसेस. राउत '
ह्या चित्रपटातील अभिनयासाठी खूप बक्षिसे मिळवली. त्यांनी निर्मित केलेल्या
'मायबाप'
चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांनी
दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट
'मी मन आणि ध्रुव'
हा शुक्रवारी मुंबईत प्रदर्शित होतोय. त्या संबंधी घेतलेली त्यांची मुलाखत .
|
 |
हा चित्रपट बनवण्या
मागे नेमका काय हेतू आहे ?
- मी एक चांगली अभिनेत्री आणि निर्माती होते. आणि मग ओघाने दिग्दर्शन आलेच. आणि
म्हणून जेव्हा मी रणजीत उर्फ महेंद्र आगाशे ह्यांची कथा ऐकली तेव्हा मला हा चित्रपट
दिग्दर्शित करावासा वाटला कारण मला
व्यवसायिक चित्रपट कधीच करायचा नव्हता आणि माझ्या आवडीचा चित्रपट मी केला. आजच्या
मध्यमवर्गीय कुटुंबात जोडपी कशी
एकमेकांपासून दूर होतात आणि
त्याचा
परिणाम त्यांच्या मुलांवर कसा होतो हे चित्रित केले आहे. |
चित्रपट बनविताना
काही अडचणी आल्या का
?
- नाही. सगळे व्यवस्थित
पार पडले. माझ्या कलाकारांनी मला खूप सहकार्य केले. एकदम वरिष्ठ सतीश पुळेकर ते
चिमुरडा ध्रुव
पर्यंत
सगळ्यांनी मला चांगली साथ दिली. माझी आई
निर्माती असल्यामुळे काही आर्थिक अडचणी पण नाही आल्या. माझे छायाचित्रकार चंद्रशेखर
अय्यर हे मला तांत्रिक बाबतीत खूप सांभाळून
घ्यायचे.
जोडप्यांच्या
समस्येवर आधारलेला हा विषय का निवडला
?
- माझ्या आजूबाजूला मी
अशी बरिच जोडपी
बघत होते आणि
मला हे लोकांपुढे मांडायचे होते.
एक गंभीर विषय
म्हणून मी हा विषय निवडला. पण मला कलात्मक किंवा
व्यवसायिक
असे माप दंड असलेला चित्रपट
करायचा नव्हता.
एकूण एक चांगला चित्रपट जो काही भाष्य
करून लोकांच मनोरंजन
करेल असा हा माझा चित्रपट
आहे.
चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी काही योजना केल्या आहेत
का
?
- आम्ही चित्रपटाच्या जाहिराती वर्तमानपत्रात,
पोस्टररवर,
टि.व्हीवर,
नेटवर करतो आहोत.
पण लोकांची दाद पहिल्या तीन दिवसात मिळाली तर आम्ही मल्टिप्लेक्स वाढवू आणि
प्रिंटहि वाढवू.
सचिन पारेकरसारखे अनुभूवी वितरक आम्हाला लाभले आहेत
आणि हे चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आणि व्यवसायासाठी चांगलेच आहे.
अभिनेत्री,
निर्माती आणि आता दिग्दर्शिका म्हणून प्रेक्षकांसमोर आल्यानंतर पुढे नेमकं
यापैकी कोणत्या भूमिकेत तू दिसणार आहेस
?
- मला चांगल्या भूमिका
असलेले चित्रपट मिळाले तर
अभिनयाला प्राधान्य देईन पण
जर माझा
पहिला चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला तर मी आणखीन चित्रपट
दिग्दर्शित करीन.
|