दिग्दर्शनाचा वारसा घरातूनच मिळाला - आदित्य सरपोतदार
आदित्य अजय सरपोतदार.... अजय विश्वास सरपोतदार सरांचा चित्रपटसृष्टीतला वारसा पुढे
नेणार एक नाव. हे नाव उलाढाल मुळे सर्वांपर्यंत पोहचलं आणि आता हया नावाला हळू हळू
एक वलय प्राप्त होत आहे. 'सतरंगी रे' हा आदित्य सरपोतदार दिग्दर्शित चित्रपट १०
फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त त्याच्याशी केलेली बातचीत
* तू दिग्दर्शनाकडे कसा वळलास?
- मी एम. कॉम केले आहे पुणे विद्यापीठ, सिम्बायोसिस कॉलेज मधून. पण ११ वीत असताना
मी. FTII (Film and Television Institute of India) मधून film making चा शॉर्ट
कोर्स केला होता. त्यानंतर ज्युनिअर कॉलेज मध्ये असताना मी एक इंग्रजी शॉर्ट फिल्म
पण केली होती जी इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये सुद्धा पाठवली होती. तेव्हा खरी सुरुवात
झाली. ज्युनिअर कॉलेज मध्ये असताना मी वडिलांना असिस्ट करायचो. इंडिपेन्डन्टली मग
टाटा आणि १०- १२ ऍड फिल्म्स केल्या. त्यानंतर कॉलेज संपल्यावर ईटिव्ही नेटवर्क -
हैदराबाद (रामोजी फिल्म्सिटी ) जॉईन केल होत. मग मुंबईला आल्यानंतर 'उलाढाल' वर काम
सुरु केलं आणि पहिली फिल्म मी केली ती 'उलाढाल'. बेसिकली घरात आमच्या वातावरण या
क्षेत्राला पूरक असल्यामुळे ती जाणीव पण झाली आणि ती समज पण लवकर आली.
|
 |
* 'सतरंगी रे' चे ट्रेलर पाहिल्यानंतर 'उलाढाल' सारखाच खूप
चकचकीत सिनेमा असं लक्षात येत तर त्यासाठी तू काही वेगळ टेक्निक वापरल
आहेस का?
- माझी समज अशी आहे की आपण आपली फिल्म बनवतोय ती जेव्हा आपण
मल्टिप्लेक्सला लावतो. तेव्हा आपल्या स्क्रीनच्या
आजूबाजूला मोठ्या
बजेटचे हिंदी आणि इंग्रजी सिनेमे पण चालू असतात तर लोकांना मराठी फिल्म
पाहताना अस कुठेच वाटल नाही पाहिजे. कि आपण टेक्निकल बाबतीत कमी मूल्य
असलेल किवा छोट्या दर्जाचं प्रॉडक्ट बघतोय. मग फिल्मचा विषय काहीही असो.
कारण प्रत्येक सिनेमाची धाटणी आणि विषय वेगळा असतो. पण कमीतकमी
टेक्निकली प्रेसेंटेशन्बाबतीत ती फिल्म त्या लेवलची आणि स्टाईलची किंवा
क्वालिटीची वाटली पाहिजे. म्हणून आम्ही काही गोष्टी सांभाळतो. म्हणजे
कॅमरा, लेन्सेस, पोस्ट प्रॉडक्शन मध्ये ज्या काही टेक्निक वापरतो त्या
बॉलिवुड टेक्निक्च्या जवळपास जाणार्या आहेत आणि आपल्या बजेट मध्ये
बसणार्या. आणि एक गोष्ट म्हणजे या फिल्मचा कलरिस्ट |
म्हणजेच डीआय जो सेट करतो
त्याची पहिली मराठी फिल्म आहे. रॉब लॅन्ग नाव आहे त्याच. त्याने या आधी
बॉडिगार्ड, आरक्षण, अशा फिल्म्स केल्या होत्या. सगळे टेक्निशिअन आम्ही
चांगलेच निवडले त्यामुळे हा चकचकीत पणा आणनं शक्य झालं.
* शुटिंग शेड्युल कसं होत? आणि कोणत्या लोकेशन्स बघायला मिळणार
आहेत या चित्रपटात?
- फिल्मच्या लिखाणाच्या वेळेसच आम्ही असं ठरवलं होत कि हि फिल्म
गोव्यात झाली पाहिजे. कारण याचा बॅकड्रॉप युनिक होता. यासाठी असं
बॅकड्रॉप हवं होत जिथे म्युझिकचा प्रभाव खूप जास्ती आहे एका सामान्य
मध्यम वर्गीयावर सुद्धा. आणि आम्हाला ज्या स्टाईलचं म्युझिक करायचं होतं.
ज्या वयातली मुलं दाखवायची होती तर आम्हाला वाटलं कि गोव्यामध्ये हे
करेक्ट वातावरण मिळू शकतं. महाराष्ट्रीयन मराठी माणूस पण सापडू शकतो.
या काही गोष्टी एकत्र येण्यासाठी आम्ही गोवा निवडल. या मध्ये तुम्हाला
जुन्या गोव्यातली चर्च, मध्यमवर्गीय कोकणी घरं पहायला मिळतील. आणि
गोव्यातली स्पॅनिश लुक देणारी रंगीबेरंगी घरं पण पहायला मिळतील. पूर्ण
३२ दिवसाचं शेड्युल असल्यामुळे सर्वच शुटींग गोव्यात करणं शकय नव्हत.
त्यामुळे आउटडोअर सगळं गोव्यात शूट केलं आणि इनडोअर सगळं पुणे आणि
मुंबईत शूट केलं. पण फिल्म बघताना हे तुम्हाला कुठेही जाणवणार नाही.
पूर्ण फिल्म गोव्यातच झाली आहे असे वाटेल.
* चित्रपटातल्या कलाकारांची निवड कशी केली?
-कास्टिंग करताना आम्ही असं ठरवलं होतं कि आपण ज्या वयाच्या
मुलांवर हि फिल्म करतोय तर कलाकार सुद्धा त्याच वयाचे घ्यायचे. आणि हे
कलाकार मी जे निवडले. आदिनाथ, भूषण, सिद्धार्थ हे सगळे थोडे ओळखीचे
चेहरे आहेत ह्या सगळ्यांची सुरुवात आहे करिअरची, त्यामुळे त्यांनी
प्रुव्ह करायला पण बरच काही असत आणि काम करायची जिद्द पण असते. मला
फिल्म मध्ये बँड दाखवायचा होता त्यामुळे ऍट द सेम टाईम मला एक
म्युझिशिअन हवा होता. म्हणून मी एक म्युझिशिअन घेतला सौमिल शृंगारपुरे.
जो जाकिर हुसेन आणि शंकर महादेवन सोबत परफॉर्म करतो. तो शंकर महादेवन
यांचा भाचा आहे. किबोर्ड वाजवतो. त्याच हे अभिनयातल पदार्पण आहे. आणि
बाकी जे कलाकार आहेत त्यांनी ट्रेनिंग घेतल आहे कारण चित्रपटाची तयारी
म्हणजे म्युझिक शिकणं होत. आदिनाथ आणि भूषण यांनी गिटारच, सिद्धार्थने
ड्रमचं प्रॉपर असं ट्रेनिग घेतलं आहे ३-४ महिने त्यांनी क्लासेस घेतले
आणि त्यानंतर आम्ही शूट केलं हे सगळ या मुलांकडून करून घेता आल करणं
तेवढया जिद्दीने ते करत होते आणि अमृता व पूजा बद्दल बोलायचं तर त्या
दोघी पण युथमध्ये बर्याच फेमस आणि कनेक्टेड आहेत. खूप प्रॉमिसिंग
आहेत. मला लोकांनी कधी न पाहिलेलं एक यंग कॉम्बिनेशन हवं होत म्हणून
आम्ही ह्या सर्वांची निवड केली आहे.
* चित्रपटाच्या शूटींग दरम्यान घडलेला एखादा किस्सा तुला
आमच्यासोबत शेअर करायला आवडेल का?
- हो नक्कीच. का नाही. अनेक किस्से घडले. पूर्ण यंग टिम असल्यामुळे
त्यांची सेट वर काही ना काही तरी धमाल चालू असायची त्यातूनच त्यांची
मैत्री आणि ऑन स्क्रीन ट्युनिंग खुलत गेलं. एक किस्सा मी इथे शेअर करेन
तो आदिनाथ कोठारेचा. गोव्यातल्या आमच्या शूटचा पहिलाच दिवस. पहिलाच
दिवस असल्याने आउटडोअर करत आहोत त्यामुळे सर्व नीट व्हायला पाहिजे या
विचाराने सर्वच थोडे नर्वस होते. आदिनाथ सेटवर आला. त्याचा एक शॉट होता.
आदिनाथची स्कूटर असते, स्कूटर वर बसतो, किक मारतो. आणि पणजीचा चौक आहे
तिथे राऊंड मारुन गाडी पार्क करतो असा तो सीन होता. कॅमेरा चालू झाला.
आदिनाथ निघाला. त्याने स्कूटर काढली. १-२ वेळा हलवून पाहिली. ते सगळं
जमलं आणि करेक्ट झालं तो निघाला आणि ५ सेकंदांमध्ये एका बाईकला head on
धडकला. तिथे तो पडल्यानंतर आम्हाला वाटलं कि आता काही खर नाही ह्याने
नक्कीच हात पाय तोडून घेतला असणार आहे. आपल्याला एक तर आता आर्टिस्ट
बदलावा लागणार किंवा पॅकअप कराव लागणार काही दिवस. पण तो उठला आणि लकिली
त्याच्या फक्त हाताला खरचटल होतं. डॉक्टरांकडून बॅडेज करुन ते बॅडेज
रात्री काढून त्याने शुटींगला सुरुवात केली. तो धडपडत असताना कॅमेरा
रोल ऑन होत होता आणि आम्ही तो शॉट एन्ड स्क्रोलमध्ये टाकला आहे. जो
सर्वांना पहायला मिळेल.
* प्रेक्षकांनी 'सतरंगी रे' का पहावा?
- प्रेक्षकांनी 'सतरंगी रे' पहावा कारण हि फक्त एक युथ फिल्म नसून यात
या फिल्मचा जो विषय आहे तो मुलांचा आणि आई वडिलांच्या ट्युनिंगचा आहे.
जेव्हा असं होत कि मुलांना काही तरी वेगळ करिअर करायच पण आई- वडिलांना
वाटतं कि मुलांनी काही तरी वेगळ करावं अशी इच्छा असते आणि जेव्हा तुम्ही
२२-२३ वर्षाचे झाल्यानंतर कॉलेज पूर्ण करुन नोकर्या शोधत असता. तेव्हा
मग ती वेळ येते कि आता ठरवायच आहे कि नक्की काय करायचं आहे. अशा वेळी
जर अडकलात म्हणजे तुमची एक वेगळी पॅशन आहे आई आई वडिलांची इच्छा
वेगळी आहे तर मग काय होतं आणि आई- वडिलांनी काय करावं तेव्हा मग आम्ही तिथे
आई वडिलांच्या दृष्टीकोनातून सुद्धा हि फिल्म बनवली आहे. सगळ्यात मुख्य
गोष्ट म्हणजे हि फिल्म आम्ही मुलांपेक्षा जास्त आई वडिलांसाठी केली आहे.
त्यामुळे त्यांनी हि फिल्म बघून relate करावं कि या चार मुलांपैकी आपल
मुलं कुठेतरी दिसत असेल तर त्या भूमिकेकडे बघून त्यांनी काय करावं त्यासाठी
ती फिल्म आहे. दुसरं कारण म्हणजे युथ फिल्म्स आपल्याकडे फार कमी होतात. जसा
साऊथ आणि बॉलिवुडमध्ये युथ फिल्मचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. त्या
टाईपच्या फिल्म्स सुद्धा मराठीत व्हाव्या म्हणून आम्ही हा प्रयत्न केला आहे
तर किमान तो प्रयत्न कसा झाला आहे हे पाहण्यासाठी तरी प्रेक्षकांनी 'सतरंगी
रे' पहावा.
|