Facebook Twitter

मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Friday, May 18, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
 
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
 
Untitled Document
अजय नाईक
चेतना © मराठीमुव्हीवर्ल्ड साठी
Ajay Naik माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सतत कार्यमग्न असतानाही बालपणापासून उरात जपलेले संगीताचे वेड एखाद्याच्या प्रतिभेचे किती सुंदर आविष्कार साकारु शकते याचे सुरेख उदाहरण म्हणजे अजय नाईक या आय. बी. एम मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर असलेल्या उमद्या तरूणाचा 'मनरंग' हा अल्बम. कविवर्य मंगेश पाडगावकरांपासून आजच्या आघाडिच्या गुरु ठाकूर या कविंपर्यंत आणि शंकर महादेवन या महान गायकापासून हृषिकेश रानडे अशा नव्या दमाच्या गायकापर्यंत काव्य आणि स्वरप्रतिभेला वैशिष्ट्यपूर्ण संगीत देऊन अजय नाईक यांनी मनरंग हा आपला नविन अल्बम साकारला असून त्याचे १९ जुलैला प्रकाशन झाले एहसान यांच्या हस्ते त्यानिमित्त सांगत आहेत 'अजय नाईक'.

* संगीत या क्षेत्राबद्दल आवड कशी निर्माण झाली?
- माझ्या कुटुंबात सगळेच कलाकार आहेत. माझे वडील एक उत्तम हार्मोनियम आनी बासरी वादक आहेत. माझ्या आजोळी सुद्धा म्हणजे माझे मामा किर्तन वैगरे करायचे. तस माझ नात या क्षेत्राशी लहानपनापासूनचं. पण मी कधी औपचारिक शिक्षण नाही घेतल. मी माझा हा छंद स्वतः जोपासत गेलो. मला लहानपणापासूनच सर्व वाद्यांबद्दल एकदम विलक्षण आकर्षण होते. मी बालगंधर्व रंगमंदिरात जायचो आणि विंगेत उभ राहून निरिक्षण करायचो, दिवाळीत कपडे-फटाके विकत न घेता त्या पैशांमधून वाद्य खरेदी करायचो. शाळा- महाविद्यालयांमध्ये संगीतविषयक कार्यक्रमात सातत्याने सहभाग घ्यायचो. प्रत्येक वाद्य मला वाजवता यायलाच पाहिजे या जिद्दिवर आणि निरिक्षणातून वाद्ये वाजवण्याचा सराव अशा कितीतरी गोष्टींनी आजवर मी घडलो आहे.

* संगीताव्यतिरिक्त तुला अजून कसली आवड आहे.
- संगीत हे तर माझं खूप आवडत क्षेत्र आहे. मी माझ्या महाविद्यालयात असल्यापासून गेली १३ वर्षे मी संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. माझ्या घरी २५ पेक्षा जास्त वाद्य आहेत आणि त्यांची संख्या वाढतच चालली आहे. माझ्या घरी माझा स्वत:चा म्युजिक स्टुडिओचा सेट अप आहे. या व्यतिरिक्त मी लिखाण सुद्धा करतो.मी महाविद्यालयात असताना नाटकांच लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा केल आहे. मी कवी सुद्धा आहे. आतापर्यंत मी मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषांमध्ये २००हून अधिक कविता लिहिल्या आहेत. माझ्या “Be there for me” या इंग्रजी कवितेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 'मनरंग मध्ये दोन गाणी आहेत जी मी स्वतः लिहिली आहेत. आणि १९९८ साली मी 'झी टि.व्ही वर 'गीत गाता चल' या गाण्याच्या कार्यक्रमात भाग घेतला होता आणि मी ती स्पर्धा जिंकली होती. गेली १० वर्षे मी स्टेज शो करतोय. तसेच 'बेवजह' या हिंदी अल्बमची रचना मी केली आहे. जो लवकरच प्रदर्शित होईल.

* 'मनरंग'ची निर्मिती कशी झाली? 'मनरंग' हे शिर्षक का योग्य वाटले?
- एकदा असच माझ्या डोक्यात आल कि अल्बम काढावा. आणि मी मुंबईत मित्रांसोबत असताना तो निर्णय पक्का झाला. मराठीत अल्बम काधायचा असं मी ठरवल. कारण माझ्या माहितीनुसार मराठी संगीतात नविन प्रयोग होत नाहीत. आणि मी माझ्या या अल्बम मध्ये तेच करण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा माझ्या डोक्यांत शिर्षक बिल्कुलही नव्हत. या अल्बम मधल्या प्रत्येक गाण्यातून वेगवेगळ्या भावना व्यक्त होतात. जसे 'नको आज चंद्रा ढगाआड जाऊ' हे एक विरह गीत आहे, 'मनरंगाचे आभाळ निळे' ह्या गाण्यातून एखादी मुलगी स्वच्छंदी, मुक्तपणे बागडत आहे असा मुड निर्माण होतो. 'धडकन तू' हे जे गाणे आहे ते एखाद्या मुलाच्या तो प्रेमात पडल्यानंतरच्या भावना आहेत. 'ओली नशा' हे थोड रॉक टाईप गाण आहे. मला वाटत मराठीतल हे पहिल गाण आहे जे पूर्णपणे रॉक म्युजिकवर आधारित आहे. 'चंद्र उमलला सरल्या राती' हे गीत स्वतःचा शोध घेत असलेल्या व्यक्तिवर आधरित आहे... 'पाऊस आला' हे गाण ऐकताना सर्व बंधन तोडून बिनधास्तपणे पावसात नाचणा-या मुलीचा भास होईल.... थोडक्यात हे सगळे आपल्या मनाचे विविध रंग आहेत म्हणून मला 'मनरंग' हे नाव योग्य वाटले आणि आम्ही त्यापुढे एक छोटीशी ओळ वाढवली.. 'मनरंग! मनाचे रंग सुरांचे तरंग.. आय. टी मध्ये असूनही नॉन आयटी जीवनशैली असल्याने अनावश्यक खर्चाला फाटा देत संगीताशी असलेली नाळ कायम राखली, म्हणून मनरंग साकारता आला

* लहानपणापासून या क्षेत्राची ओढ असताना ह्या क्षेत्रातच करिअर करायच का नाही ठरवलं ?
- माझा तर विचार होताच कि या क्षेत्रातच आपल सर्वस्व वाहून द्यायच. पण मी एका ब्राम्हण कुटुंबातून आहे. जिथे शिक्षणाला जास्त महत्तव असतं आणिहे अशा आवडी छंद म्हणूनच जोपासावे लागतात त्यामुळे मी एम. आय्.टी या महाविद्यालयातून माझे संगणक अभियांत्रिकेचे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. एम. आय. टी महाविद्यालयाच्या १९९७ च्या बॅचचा 'बेस्ट आउटगोईंग स्टुड्न्ट' मी होतो. सध्या मी आय.बी.एम मध्ये चांगल्या पदावर नोकरी करतोय. या क्षेत्रात मला माझी नोकरी सांभाळून जे करता येईल ते मी नक्की करेन. सध्या ऑफिसला येता जाता मी गाणी ऐकतो आणि सुट्टी असेल तेव्हा कंपोजिशन करतो. मी माझी नोकरी सांभाळून माझा हा छंद जोपासतोय.

* 'मनरंग' बनवितानाचा तुझा अनुभव कसा होता? शंकर महादेवन आणि इतर गायकांसोबत काम करुन कस वाटल.?
- 'मनरंग' बनवितानाच माझा अनुभव खूपच अविस्मरणीय आहे. अल्बमची संकल्पना ते निर्मिती हा काळ साधारण चार महिन्याचा होता. संगीतावर भरभरून प्रेम करणारे गीतकार, गायक आणि अनेक अडचणी सोसून माझ्यातील संगीतकार घडवण्यासाठी प्रोत्साहन देणारे मित्र, सहकारी आणि कुटुंबिय यांच्यामुळे स्वप्नवत वाटणारा हा प्रवास सुलभ झाला. शंकर महादेवन माझा खूप चांगला मित्र आहे. तो माझ्यासाठी आदर्श आहे. त्याने बाकिच्या गोष्टी सांभाळत माझी इच्छा म्हणून त्याने माझ्या अल्बमसाठी गायल आणि त्याच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी दोन महिने थांबाव लागल. कारण त्या गाण्यातला मूड तोच आणू शकत होता. शंकर-एहसान-लॉय या त्रिकूटाकडून मी खूप काही शिकलो. आणि यातील एहसानने मला माझ कंपोजिशन मी एका अल्बमद्वारे लोकांपर्यंत पोहचवाव अस प्रोत्साहन दिल. आणि ही गीते इतकी सुंदर आहेत आणि हृषिकेश, सुमित्रा, मधुरा या सगळ्यांनीच आपलं आपलं गाण त्या गाण्याचा मूड खूप छान रितीने पकडून अतिशय अप्रतिम गाणी गायली आहेत.
सर्व मुलाखती वाचा:   




मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.