मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Saturday, April 25, 2015
मुख्य पृष्ठ - संपर्क | facebook twitter RSS Updates 
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
Untitled Document
डॉ. अमोल कोल्हे.
चेतना गावखडकर © मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम करिता
डॉ. श्रीराम लागू, डॉ. गिरीश ओक आणि आता डॉ. अमोल कोल्हे. होय. डॉक्टर असलेल्या अभिनेत्यांमध्ये डॉ. अमोल कोल्हे हे नाव हल्लीच्या का़ळात सामील झालं. त्याला कायमच अभिनयाची आवड आणि जाणही होती. शिक्षण हे व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी खूप आवश्यक आहे असं त्यां ठाम मत आहे. म्हणूनच त्याने आपल्या आवडीच्या दोन्ही क्षेत्रांना समान न्याय दयायच ठरवत त्याने अभिनेत्यासोबतच आपलं डॉक्टर होण्याच स्वप्न सुद्धा पूर्ण केलं. आज त्याची ओळख एक डॉक्टर आणि कलाकार अशी आहे. स्वतःच पॅशन जपत त्याने स्वतःच करीअर घडवताना आपलं शिक्षणही जपलं आहे.

प्रथम रंगमंचावर आपली कामगिरी दाखवून त्याने नितीन देसाईंच्या 'राजा शिवछत्रपती' या मालिकेद्वारे छोट्या पडदयावर आगमन केले. आणि शिवाजींना फक्त इतिहासाच्या पुस्तकातून ओळखणार्‍या आजच्या पिढीसमोर त्याने 'शिवचरित्र' अगदी ताकदीने उभे केले त्यामुळे त्याला अगदी जागतिक पातळीवर ओळख मिळाली. त्यानंतर 'ओळख' ह्या स्टार प्रवाहच्या मालिकेतून तो अगदी वेगळ्या भूमिकेतून दिसला. स्वतःला शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून थोडं बाहेर काढण्यासाठी आणि लोकांना अभिनयाचा नवा पैलू दाखवण्यासाठी त्याला 'ओळख' ने खूप मदत केली.
 
Amol Kolhe नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'आघात' मध्ये त्याची भूमिका होती. तसेच केदार शिंदेचा "ऑन डयुटी २४ तास" या चित्रपटात सुद्धा तो प्रमुख भूमिकेत आहे. केदार शिंदे सोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला असल्याचा तो सांगतो. विजय चव्हाण एक अप्रतिम कलाकार आहेत. विनोदी भूमिका ते इतकी सहजपणे करतात. त्यांच्याबरोबर काम करताना खूप मजा आली असे तो न चुकता सांगतो.

त्याने अचानक 'ओळख' मधून एक्झिट घेतल्याच सगळ्यांनीच बघितल. आम्ही त्याला याचं कारण विचारलं असता. ते आधीपासूनच ठरली होती. इनफॅक्ट ती कथानकाचीच गरज होती. आणि सध्या तो छोट्या पडद्यावर काम करण्यापासून छोटासा ब्रेक घेऊ पाहतोय. कारण त्याला मोठया पडद्यावर लक्ष केंद्रीत करायचं आहे. पण हो एखादी उत्तम भूमिका मिळाली तर तो कुठलिही संधी सोडणार नाही. मग ती रंगमंचावर्ची असो, छोट्या पडद्यावरची किंवा मग मोठ्या पडद्यावरची असो.
मध्यतंरी, नितीन देसाई 'शिवाजी महाराजां'चा जीवनपट मोठ्या पडद्यावर साकारत असल्याचं सर्वांच्याच कानावर पडलं. या चित्रपटासाठी नितीन देसाईंने ऑडिशन ठेवली आहे. या चित्रपटात अमोलला संधी मिळाली तर? तर तो या संधीच नक्कीच सोनं करेल. कारण हा चित्रपट जागतिक पातळीवर पोहचणार आहे. हे वेगळं नको सांगायला.

सध्या मराठी चित्रपट सृष्टीला मराठी कलाकारांनी ज्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे त्याबद्दल प्रत्येक मराठी माणसाला मराठी चित्रपटांबद्दल आणि त्यातील कलाकारांबद्दल अभिमान वाटतो आहे. डॉ. अमोल कोल्हे याला अपवाद नाही. पण अमोलचं असं म्हणण आहे की "हे सर्व प्रेक्षकांनीच साध्य केलं आहे. कारण एखादी गोष्ट जगाला दाखवायची असेल तर ती डोक्यावर घेणं आवश्यक आहे तरच ती प्रत्येकाला दिसू शकते आणि मराठी व अमराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाला डोक्यावर उचलून घेतल्यावर त्याची उंची अख्ख जग पाहू शकतं." मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2015. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.