* निर्मिती क्षेत्रात पदार्पण करताना विनोदी चित्रपटाचीच निर्मिती करण्याच ठरवलं
होत का?
- मी सुरूवातीपासूनच विनोदी भूमिका जास्त केल्या आहेत. त्यामुळे माझी
ओळख मुळातच विनोदी अभिनेता म्हणून असल्याने साहजिकच आहे की प्रेक्षकांना
माझ्याकडून विनोदी चित्रपटाचीच अपेक्षा आहे व प्रेक्षकांना हवं ते देण्यासाठी
मी माझी पहिली निर्मिती हि विनोदी चित्रपटाचीच केली.
* चित्रपटाची निर्मिती करताना चित्रपटाकडून काय अपेक्षित होतं ?
- सध्याच्या
धकाधकीच्या जीवनात प्रेक्षकांना मनोरंजन करणारे चित्रपट हवे आहेत. चित्रपटगृहातून
बाहेर पडताना त्यांनी जास्त विचार करत बाहेर न पडता हसत हसत बाहेर पडावं असच मला
वाटत होतं आणि सध्याच्या प्रेक्षकवर्गाच्या निर्मात्यांकडून, कलाकारांकडून याच
अपेक्षा आहेत. त्यामुळे चित्रपट बनवताना जाणवत होतच की प्रेक्षकांचा प्रतिसाद हा
प्रचंड मिळणार आणि चित्रपट यशस्वी ठरणार हे माहितच होतं. आणि याच श्रेय मी माझ्या
संपूर्ण टिमला देते आणि निवेदिताचीही खूप मदत झाली. तिने खूप मेहनत घेतली आहे या
चित्रपटासाठी.
 * चित्रपटाच्या वितरणासाठी काही विशेष आखणी केली होती का?
- कुठलाही चित्रपट हा फक्त प्रमोशन किंवा मार्केटिंगमुळे यशस्वी होत नाही तर
माऊथ पब्लिसिटी ही खूप महत्त्वाची बाब आहे सध्या चित्रपट यशस्वी होण्यासाठी. झी
टॉकिजने माझा चित्रपट घराघरात पोहचवला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. *
चित्रपटाच्या दिग्दर्शकाची निवड करताना कोणत नाव डोळ्यांसमोर होतं ?
- नाव तसं
ठरल नव्हतं पण मी मला मिळालेल्या दिग्दर्शकाबद्दल खूप समाधानी आहे. तो जास्त कोणाला
परिचयाचा नसला तरी हा खूप हुशार दिग्दर्शक आहे. सिनेमा काय असतो, याची त्याला जाण
आहे. कथा मांडणीच तंत्र त्याला खूप छान अवगत आहे. प्रत्येक दृश्य पडद्यावर कस दिसेल
याची त्याला जाण आहे. आणि शिवाय मी होतोच. काही ठिकाणी काय आणि कस करायचं हे मी
सांगितले, मी ते सांभाळून घेतले. माझ्या इतक्या वर्षाच्या कामाचा अनुभव उपयोगी
पडला.
* चित्रपटाच यश कोणत्या घटकांवर अवलंबून आहे ?
- खरतरं आजकाल खूप चांगले
दिवस आले आहेत मराठी चित्रपटसृष्टीला. तुम्ही फक्त ते चांगल काम करायला हवं फक्त
कॅमेरा ठेवून काहिही चित्रीत होते. पण ते चित्रण तुमच्या कथेला अनुसरून झालं
पाहिजे. फक्त तांत्रिक दृष्ट्या चित्रपट उत्कृष्ट असून चालत नाही, तर कथा, पटकथा,
दिग्दर्शक आणि तुमचे कलाकारही उत्कृष्ट हवेत. थोडक्यात काय तर तुम्ही चांगली गोष्ट
तयार केली तर ती प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहचते.
* चित्रपटांसोबतच तुम्ही नाटकांमध्ये पण काम केलतं आणि करत आहात. तर या
क्षेत्राबद्दल काय सांगाल ?
- मी जस मगाशी सांगितलं की माझी इमेज विनोदी
अभिनेत्याची असल्यामुळे प्रेक्षकांना माझ्याकडून विनोदीच जास्त अपेक्षित आहे. काही
वर्षापूर्वी माझ ' अनाधिकृत' हे नाटक आलं होत. अतिशय सुरेख अशी त्याची कथा होती.
विषय थोडा गंभीर होता. पण ते नाटक जास्त यशस्वी होऊ शकल नाही पण आता जे माझ नाटक
चालू आहे ते विनोदी आहे. आणि त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यात
माझ्याबरोबर निवेदिताही प्रमुख भूमिकेत आहे.
* धोबीपछाड नंतर कोणता डाव
मांडणार ?
- डाव तर मांडायचा आहे. त्याची सुरूवात तर झालीच आहे. सध्या कथेवर
काम चालू आहे. त्याचा दर्जा हा धोबीपछाड इतकाच उत्कृष्ट असणार आहे.
* तुमचा
ड्रीमरोल कोणता?
- मी मला आवडणार्या भूमिकाच कायम स्विकारल्या आहेत. ड्रीमरोल
भरपूर आहेत. माझ्यासाठी प्रत्येक भूमिका जगणं महत्त्वाच आहे.
|