* आपण 'मस्त चाललयं आमचं !' या चित्रपटात कोणाची भूमिका करीत आहात 'जावईबापूंची'?
- छे. छे. सासरेबुवांची- माधव भट ही अगदी सद्वर्तनी स्वच्छ चारित्र्याची शुद्ध भाषा
बोलणारी ज्याला शिवी माहित नाही अशी व्यकती आहे.
* मग जावई कोण? आणि तुमची जोडीदारीण कोण?
- जावई आहे भूषण कडू आणि अर्धांगिनी आहे विशाखा सुभेदार.
|
 |
* झी टॉकिज बरोबर तुम्ही किती चित्रपट केले? ह्या चित्रपटातील भूमिका तुम्ही कशी
स्विकारलीत?
- झी टॉकीज प्रस्तुत आणि शेमारु एन्टरटेन्मेंट निर्मित हा माझा तिसरा सिनेमा. पहिला
'साडे माडे तीन', दुसरा 'गलगले निघाले' आणि तिसरा 'मस्त चाललयं आमचं'.
पण याची जातकुळी वेगळी आहे. कथा मला खूप आवडली. माधब भट हा बँक अधिकारी. हे पात्र
पण खूप आवडलं. खरं म्हणजे ही हिरोची भूमिका किंवा तरुण नायकाची कथा नाही. पण विषय
चांगला आहे. अभिनयात कुठेही वेडेवाकडे अंगविक्षेप नाहीत. एक चांगली कॉमेडी आहे.
प्रेक्षकांना बघताना अजिबात कंटाळा येणार नाही याची खात्री आहे.
* कुठल्या वयोगटाच्या प्रेक्षकांना हा चित्रपट खेचून आणेल असे तुम्हाला वाटते?
- आजोबांपासून नातवांपर्यंत सर्वांनी एकत्र बसून बघायला हरकत नाही. रिक्षावाले
सुद्धा ही कॉमेडी |
एन्जॉय करतील. या चित्रपटात एकही गाणं नाही तरी त्याची गरजच वाटली
नाही.
* तुमचे सहकलाकार हे टी. व्ही मालिकांमधून या क्षेत्रात आले आहेत.
त्यांच्याबरोबर काम करताना तुम्हाला कसं वाटलं?
- सगळे उत्तम कलाकार आहेत. हे एक टीमवर्क आहे. आणि मी असं म्हणेन की
सगळे खेळाणारे खेळाडू चांगले आहेत. संवादात टायमिंग बरोबर पाळता आला
पाहिजे. विशाखाच्या बाबतीत तर तिची देहबोली (बॉडी लँग्युएज) उत्तम आहे.
त्यामु़ळे काम करायला मजा आली. सगळे स्वर पकडणारे कलाकार आहेत. कुणीही
बेसुर नाहीत.
* शुटींगदरम्यानचे काही किस्से ऐकायला आवडतील...
- शूटींग सलग २० दिवस चाललं. जुलै महिन्यात पावसात त्यामुळे आउटडोअर
सीन करताना कधी कधी त्रास झाला. एक सीन म्हणजे एका रात्री घडलेली गोष्ट
चित्रीत करताना रोज पाऊस पडल्याने पाच दिवस रोज प्रयत्न करावा लागला.
त्यामुळे कॅमेरामन व इतर तंत्रज्ञांनी खूप मेहनत घेतली. त्यांच कौतुक
केलं पाहिजे.
विजय पाटकर शूटींग करताना एकदा वरुन पडला. हात फ्रॅक्चर झाला पण त्यांनी
काही तक्रार केली नाही. सर्व सहन करत पूर्ण दिवस शूटिंग पूर्ण केलं मगच
तो डॉक्टरकडे गेला.
* आगामी चित्रपट
- 'फक्त लढ म्हणा' हा एक ऍक्शनपट आहे.
|