Facebook Twitter

मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Friday, May 18, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
 
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
 
भूषण कडू ह्यांच्याशी मारलेल्या मस्त गप्पा !
अर्चना जगताप © मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम करिता

 
* तुझा स्वभाव लहानपणापासून विनोदीच आहे का?
- हो. मी लहानपणी खूप खोडकर वगैरे असा होतो. पण तेव्हा वाटल नव्हतं की माझ्या स्वभावाचा उपयोग मला अभिनय करताना होईल. म्हणजे मला वाटल नव्हत की मी या क्षेत्रात येऊन स्वतःला विनोदी कलाकार म्हणून प्रस्थापित करु शकेन.

* तुझ्या मते विनोदाची व्याख्या काय आहे?
- विनोद म्हणजे तो आतून झाला पाहिजे. आपण लोकांना हसवण्यासाठी जर एखादा संवाद करत असू तर तो लोकांपर्यंत अगदी सहजपणे पोहचला पाहिजे. इतक्या सहजपणे तो कलाकाराकडून केला गेला पाहिजे. कोणत्याही वाईट गोष्टीवर विनोद करु नये. विनोद योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी केला गेला तर तो चांगला वाटतो.

 * विनोदी भूमिका साकारण सोपं की कठिण?

- विनोदी भूमिका साकारण हे काही सोपं काम नाही. ते खूप अवघड काम आहे. कारण लोकांना रडवणं सोप झालयं पण त्यांना हसवणं अवघड काम आहे.

* नुकत्याच प्रदर्शित 'मस्त चाललय आमच' मध्ये तुमची काय भूमिका आहे?
- या मध्ये मी माधव भट ( भरत जाधव ) यांच्या जावयाची भूमिका करत आहे, बबन जो एक टपोरी रिक्षावाला आहे. त्यांचा या लग्नाला विरोध असल्याने त्यांची आणि जावयाची किती जवळिक आहे हे वेगळ सांगायला नको.. म्हणजे ते दोघ एकमेकांची खोड मोडण्यासाठी काय काय करतात. कसे गैरसमज निर्माण होऊन एकमेकांच्या संसरात नाक खुपसतात... अशी ती कथा आहे.

* या चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता?
- मस्त. एकदम मस्त... या मध्ये एक से बढकर एक विनोदी कलाकार असल्यामुळे हा एक मस्त चित्रपट बनला आहे. सगऴ्यांसोबत छान ट्युनिंग जमलं. सासरे आणि बबन्या ची कॉमेडी प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील .......... आणि म्हणतील 'मस्त चाललय आमचं'.


 



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.