Facebook Twitter

मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Friday, May 18, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
 
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
 
चिन्मय मांडलेकर
उल्हास शिर्के © मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम करिता
चिन्मय मांडलेकर - लेखन आणि अभिनय एक साथ

मराठी कलाक्षेत्रातील नवोदित कलाकारांमध्ये चिन्मय मांडलेकर हा असा अभिनेता आहे ज्याच्याकडे प्रचंड प्रमाणात टॅलेंट आहे. एक गुणी कलाकारच नाही तर एक चांगला लेखक म्हणूनही त्याने या क्षेत्रात आपले नाव प्रस्थापित केले आहे.

मुंबईच्या गिरगावातील सेंट सबासटीयन शाळेत शिकत असताना आपण एक दिवस अभिनेता होऊ असा विचार कधी त्याच्या मनातही आला नव्हता, पण जेव्हा त्याने विले पार्ल्याच्या एम. एल. डहाणूकर महाविद्यालयात प्रवेश केला तेव्हा मात्र त्याला आपल्यामधील कला प्रस्तूत करण्यासाठी योग्य असा मंच मिळाला. आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमार्फत त्याच्या कलानैपुण्याला योग्य ती संधीच मिळाली.

कॉलेज शिक्षण झाल्यावर चिन्मयने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एन एस डी) मध्ये प्रवेश घेण्याचे ठरवले तेव्हा त्याच्या वडिलांना आश्चर्य वाटले नाही
Chinmay Madlekar कारण त्यांनी त्याच्यातील अभिनय कला जाणली होती. NSD चा पदवीधर म्हणून मराठी दूरदर्शन क्षेत्रात त्याचे स्वागत झाले आणि 'वादळवाट' या दूरदर्शन मराठी मालिकेत काम करत असताना त्याने एक छंद म्हणून मधल्या काळात  एक स्क्रिप्ट लिहून टाकले आणि 'क्षण' या चित्रपटाच्या निमित्ताने सन २००६ ला चिन्मय एक चित्रपट कथा लेखक म्हणून  उजेडात आला. त्यानंतर  'असंभव' या मालिकेद्वारे तो लेखक म्हणून खरा प्रसिद्ध झाला. चिन्मयला लेखनाची गोडी 'वादळवाट' करत असतानापासूनच निर्माण झाली व एक सह लेखक म्हणून त्याने काम केले होते.

आपल्या आगामी 'गजर' या चित्रपटाविषयी चिन्मयला खूप अपेक्षा आहेत. कारण त्याने ह्या चित्रपटात केलेल्या कामाबद्दल तो पूर्ण समाधानी आहे. "ह्या चित्रपटात मला खास असा रोल मिळाला आहे.
शिवाय बराचसा चित्रपट ओउटडोअर शूट केल्यामुळे आळंदी आणि पंढरपूर ह्या भागात आणि तेही वारी बरोबर जाण्याचा एक वेगळाच अनुभव मिळाला आहे. त्यांच्या बरोबर काम करणे हे मी माझे भाग्याच समजतो. "चिन्मयचे सध्या गाजत असलेले नाटक 'एक लफडं विसरता न येणार' याला सुद्धा प्रेक्षेकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. शिवाय ह्या नाटकाला बरीच पारितोषिके मिळालेली आहेत.

जोगवा फेम राजीव पाटील यांच्या आगामी 'पांगिरा' या चित्रपटात चिन्मय एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. शिवाय अवधूत गुप्ते यांचा 'मोरया' या चित्रपटातही तो आहेच. सध्या ह्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्णतेच्या मार्गावर आहे. एकूण काय तर 'गजर'च्या प्रदर्शनानंतर चिन्मयसाठी एक सुप्रसिद्ध कलाकार होण्यासाठी सर्व मार्ग मोकळे आहेत . 

'क्रांतिवीर राजगुरू ' या मराठी चित्रपट मार्फत पदार्पण करूनही तो चित्रपट लोकांपर्यंत पोहचू शकला नाही पण आता मात्र चिन्मयचे आगामी तीन चित्रपट त्याला नक्कीच प्रसिद्धी मिळवून  देतील अशी आशा वाटते .

'अनहोनी ' हि त्याचे कथानक असलेली मालिका 'मी मराठीवर' जोरात चालू आहे. त्यामुळे लेखक म्हणुनही तो पुढे वाटचाल करत आहे. मराठीमुव्हीवर्ल्डतर्फे चिन्मयला आमच्या हार्दिक शुभेच्छा.



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.