१७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार्या 'बोक्या सातबंडे' च्या
निमित्ताने दिलीप प्रभावळकर अभिनेत्यासोबतच कथा लेखक, पटकथा लेखक, आणि
संवाद लेखक अशा चौफेर भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येत आहे. लेखन व अभिनय
अशा बाजू सांभाळल्याने हा चित्रपट पूर्णपणे दिलीप भैय्या पद्धतीचा असणार हे
नक्की. जाणून घेऊया या चित्रपटाबद्दल त्यांच्याकडूनच....
 |
* बोक्या सातबंडे प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. ....कसं वाटतयं?
चित्रपट बनवण्याची कल्पना कशी सुचली ?
- खूप छान वाटतयं खूप आनंद देणारी गोष्ट आहे ही. खरतर मागील काही वर्षात बोक्या
सातबंडे सर्वांसमोर काही वेगवेगळ्या माध्यमातून आला. त्याच दरम्यान मी रेडिओसाठी 'बोक्या
सातबंडे' लिहीला. त्यात मी बोक्याच्या वडिलांची भूमिका केली होती. ते लहान मुलांना
खूप आवडल होत. त्यानंतर राजहंस पब्लिकेशनने मला पुस्तक लिहिण्यासाठी विचारणी केली.
त्याचे तीन आवृत्त्या प्रदर्शित झाल्या होत्या व मुलांकडून त्याला खूप पसंती मिळाली
होती ... लोकांना असं वाटतं की लहान मुलांना वाचनाची आवड नसते पण मला वाटत नाही.
कारण आताच 'बोक्या सातबंडे'ची ११ वी आवृत्ती नुकतीच प्रदर्शित झाली व १२ वी आवृत्ती
लवकरच प्रदर्शित होईल कारण मुलांना वाचायला आवडतं. .
|
|
* तुम्ही 'बोक्या'चे
वर्णन कसे कराल ?
- बोक्या इतर मुलांसारखाच आहे.......खूप हुशार, खट्याळ, खोडकर..... पण तो नेहमी
स्वतःच्या वेगळ्याच विश्वात असतो आणि त्याच्या आसपासच्या व्यक्तिंना मदत
करण्याची त्याची इच्छा असते.
* बोक्यातील कलाकारांची निवड कशी झाली? आणि संजय नार्वेकर यांच्या मुलाची
आर्यमनची निवड कशी झाली ?
- कलाकारांची निवड करण्याचे श्रेय मी निर्माता, दिग्दर्शक आणि सहाय्यक
दिग्दर्शक यांना देईन. मी कथा, पटकथा आणि संवाद लेखनाची बाजू मी सांभाळली आहे
मी समजतो चित्रपट हा दिग्दर्शकाचा असतो.
* लेखनाची बाजू तुम्ही सांभाळली आहे. तुम्हाला चित्रपटाचे दिग्दर्शन करावेसे
नाही का वाटले ?
- (हसतच) नाही... मुळीच नाही, तो माझ्या केक नाही. मी अभिनेता आणि लेखक आहे. हो
पण मी एकदा प्रयत्न केला आहे 'हसवा फसवी' नाटकाचे लेखन व दिग्दर्शन आणि अभिनय
सुद्धा मीच केला होता.
* चित्रपट बनवताना मूळ कथेमध्ये काही बदल केले का ?
- हो. ७० एम.एम. स्क्रीनला बनवताना त्यात शोभणारी कथा मी लिहीली. मूळात २५ छोटया
गोष्टी आहेत त्या चित्रपटात दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न मी केला आहे.
* चित्रपटाच्या शुटिंगचा अनुभव कसा होता? काही आठवणीतले क्षण ?
- सगळे सोबत असल्याने खूप मजा आली. हा गोष्टीचा आणि त्यासोबतच माझा विविध
माध्यमातला प्रवास होता. मागील काही वर्षात मी बाल नाट्ये केल्याने मला लहान
मुलांबरोबर काम करायला खूप मजा आली. मला नेहमीच लहान मुलांबरोबर काम करायला
आवडते.
* आपण हिंदी सिनेमाकडे जाऊयात... पहेली, रिस्क, लगे रहो मुन्नाभाई, सरकार
राज....यामुळे तुमच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली...
- या सगळ्यामुळे मी हिंदी चित्रपट सृष्टीकडे आकर्षित झालो असं होत नाही. ..पण
हो...हा एक वेगळा अनुभव होता माझ्यासाठी. लोकांना माहितही नव्हतं की ह्या भूमिका
करणारा कलाकार मीच आहे. 'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटातल्या 'गांधीं'च्या
भूमिकेसाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर लोक मला जास्त ओळखू लागले.
* पुरस्कार तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत ?
- जर कोणी असं म्हटल की मला पुरस्कार वैगरे गोष्टींमध्ये विश्वास नाही.... तर
हे खोट आहे. कामासाठी पुरस्कृत केलेल प्रत्येकालाच आवडतं. लोकांनी तुमच्या
कामाची दिलेली पावती म्हणजे पुरस्कार. यामुळे खरच खूप आनंद होतो. पण मला माझ्या
अभिनयापेक्षा माझ्या साहित्यिक कामाला मिळालेले पुरस्कार जास्त आवडतं. जानेवारी
महिन्यात चित्रपटाचे चित्रीकरण चालू असताना 'बोक्या सातबंडे' या पुस्तकासाठी मला
पुरस्कार मिळाला तेव्हा मी खूप आनंद झाला होता.
|