Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Saturday, February 11, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
Untitled Document
डॉ. गिरीश ओक
कश्मिरा, शब्दांकन- चेतना © मराठीमुव्हीवर्ल्डसाठी
डॉ. गिरीश ओक. गेली २५ वर्षात हे नाव खूप प्रसिद्ध झालं आहे. त्यांच सध्या 'यु टर्न' हे नाटक अतिशय लोकप्रिय झालं आहे. आणि 'तो मी नव्हेच' या नाटकातून एक अजरामर व्यक्तिरेखा साकारणार आहेत. ज्यांनी आजपर्यंत अनेक मालिकांमधून आपली वेगळीच छाप सोडली आहे. वैद्यकिय शिक्षण केले असतानाही या क्षेत्रात आपला जम बसवण्यासाठी केलेली धडपड आणि आता हाती असलेले यश याबद्दल अधिक सांगताहेत डॉ. गिरीश ओक.
Dr Girish Oak
  • तुमच्या करीअरची सुरुवात कशी झाली? ....... वैद्यकिय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनय क्षेत्रात करीअर कराव असं का वाटलं?
    - मी माझे शिक्षण माझ्या गावी म्हणजे नागपूरला पूर्ण केले. महाविद्यालयात असताना मी नाटकं, एकांकिकांमध्ये भाग घ्यायचो. त्याचा परिणाम म्हणजे मला नाटकात रस वाटू लागला. मी काही काळापूरता माझ्या डॉक्टरकीचा सराव केला. पण मी त्या क्षेत्रात नोकरी करताना समाधानी नव्हतो. म्हणून मी ते क्षेत्र सोडून मुंबईला आलो व काही छोट्या भूमिका केल्या. त्यानंतर मी १९७७ ते १९८३ नाटकं केली. साहजिकच सुरुवातील संघर्ष करायला लागला. प्रत्येक कलाकाराला तो करावाच लागतो. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला माझ्या कुटुंबियांचा पूर्ण पाठिंबा होता. म्हणजे काही लोक विचारायचे की डॉक्टर झाल्यानंतर अभिनय कशाला? तेव्हा घरातल्यांची साथ असल्याने मी या क्षेत्रात येऊ शकलो.
  • नाटकांमध्ये काम केल्यानंतर तुम्ही मालिका आणि चित्रपटांत कसे स्थिरावलात?
    - ते घडतच गेलं...... मी सिनेमा आणि मालिकांमध्ये जाणं हे अगदी सहजपणे घडलं. आधी लोक तुम्हाला ओळखू लगतात नंतर दिग्दर्शक आणि निर्माते तुम्हाला विचारतात. पण माझ्या आतापर्यंतचा आलेख पाहता मी चित्रपट आणि मालिकांपेक्षा नाटकं अधिक केलीत...म्हणजे मी आतापर्यंत जवळपास ४८ नाटकं केलीत आणि २०-२५ मालिका केल्या.

  • २५ वर्षांच्या कारकिर्दीचा तुमचा अनुभव कसा आहे?
    - खूप समाधानी आहे. ..सुरुवातीच्या काळात वाटलं की सगळं सोडून पुन्हा जाऊन डॉक्टरकीचा सराव करावा पण मी तेव्हा पुढे जाण्याचा धोका पत्करला आणि आज मी माझ्या त्या निर्णयामुळे खूप आनंदी आहे. 'दिपस्तंभ' नावाच्या चित्रपटामुळे मी या सृष्टीत स्थिरावलो आणि आपण याला माझ्या आयुष्यातला टर्निंग पाँईंट म्हणू शकतो. तेव्हापासून मी एक अभिनेता म्हणून माझी ओळख निर्माण केली. हो पण मला माझ्या निर्णयाबद्दल वाईटही वाटते, मी सध्या डॉक्टरकीचा सराव करत नसलो तरी मी त्यासंदर्भात काही पुस्तके वाचून स्वतःला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि काही डॉक्टरांची भेट घेत असतो.

  • 'यु टर्न' या नाटकाला मिळणार्‍या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल तुम्ही काय सांगाल? 
    - 'यु टर्न' या माझ्या सध्या चालू असलेल्या नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. केवळ मराठीतच नाही पण याच गुजराती भाषांतरीत नाटकाचे खेळ सुद्धा हाऊसफुल चालू आहेत.

  • तुमच 'तो मी नव्हेच' हे नाटकं आता रंगभूमीवर येण्यास सिद्ध झाले आहे.... प्रभाकर पणशीकर यांनी आपल्या जिवंत अभिनयाने अजरामर केलेल हे नाटक करताना कसं वाटलं?
    - खूप छान वाटलं. म्हणजे माझ्या ड्रीमरोलच्या अपेक्षेच्या बाहेर होत ते. खरचं सांगतो मला कधीच वाटलं नव्हतं की ही भूमिका करण्याची संधी मला मिळेल. मी माझ्या सुरुवातीच्या काळात या नाटकातली 'अग्निहोत्रे' नावाची एक छोटी भूमिका साकारली होती. या नाटकाचे मी जवळजवळ २०० प्रयोग केले. पण गेल्या २५ वर्षात मी असा कधी विचार केला नव्हता की हेच नाटक मी प्रमुख कलाकार म्हणून करेन. हि खूप मोठी संधी आणि जवाबदारी आहे. पण स्वतः प्रभाकर पणशीकर मला म्हणाले की 'तू हे करु शकतोस'. अपेक्षा खूप आहेत आणि हे नाटकं करताना खूप सतर्क रहावं लागणार आहे. हे खूप आव्हानात्मक आणि धोकादायक आहे पण खूप आकर्षक आहे. त्यामुळे सध्या मी फक्त माझ्या या नाटकाच्या सरावावर जास्त लक्ष देतो. आशा करतो की काहीतरी चांगलचं होईल.
     
  • हो. सर...नक्कीच...आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेतच...आपण आता तुमच्या मालिकांकडे वळूयात. तुमची 'अग्निहोत्र' या मालिकेतली भूमिका खूप गाजतेय. आम्हाला ह्या व्यक्तिरेखेबद्दल काही सांगाल?
    -
    हे खूप गंभीर, कंटाळवाणं व्यक्तीमत्त्व आहे. ....म्हणजे लेखक परांजपे यांनी हे पात्र खूप छान रंगवलयं. पण ते खूप कडक, आणि अत्यंत रागिष्ट असं व्यक्तिमत्त्व आहे. जे आपल्या तत्त्वांशी बांधिल आहे. काहीवेळा मला हे सगळं करणं खूप अवघड जातं कारण हे माझ्या खर्‍या व्यक्तीमत्त्वाच्या एकदम विरुद्ध आहे.

  • या व्यतिरीक्त तुम्ही सध्या अजून काय करत आहात?
    - मी आताच भरत जाधव सोबत 'हॅलो गंडेसर' हा एक चांगला चित्रपट पूर्ण केला आहे. हा एक विनोदी चित्रपट असला तरी एक अतिशय वेगळा विषय यात मांडण्यात आला आहे. संदिप देशपांडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मालिकांबद्दल सांगायचं तर मी खूप व्यस्त आहे. सध्या मी 'अग्निहोत्र' आणि 'कुकुचकू' या स्टारप्रवाहवरील मालिकांसोबतच ई टिव्ही मराठी वरील 'ह्या गोजिरवाण्या घरात' आणि 'अर्धांगिनी' या मालिका करत आहे. टेलिव्हिजन वर एकाच वेळी अशा वेगवेगळया तर्‍हेच्या भूमिका साकारायला मिळाल्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.
  • सर्व मुलाखती वाचा:   
    


    मुख्यपृष्ठ
    I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
    ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
    Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
    Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
    © 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

    -: A Project by :-
    Honeybee Media
    Honeybee Media Pvt. Ltd.