Facebook Twitter

मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Friday, May 18, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
 
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
 
जुई गडकरी
चेतना गावखडकर © मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम करिता
स्टार होण्यापेक्षा एक अभिनेत्री म्हणून नाव कमवायला आवडेल.

'स्टार प्रवाह' चॅनेल. वेळ संध्याकाळी ७.३० वा. कार्यक्रम 'पुढच पाऊल'. आपल्या घरातील दिव करुन झाल्यानंतर रिमोट हातात घेऊन बसलेल्या काकू, मावशी, आत्या, आजी टिव्ही समोरुन हालत नाहीत. आककासाहेब कल्याणी नावाने आवाज देतात आणि कल्याणीला आपलं माननार्‍या या सगळ्या जणींना एक धाकधूक लागते की "आता काय केल हिने... काय चुकलं हिचं" सगळयांना हळवी, सतत दुसर्‍यांना मदत करण्यसाठी धडपडणारी, चांगल आणि वाईट यातला फरक न कळणारी कल्याणी म्हणून माहित असलेली 'जुई गडकरी' नक्की कशी आहे.. हे आम्ही तिच्याकडूनच जाणून घेतलं.
 
* तुझं कुटुंब आणि शिक्षण या बद्दल सांग.
- मी मूळची कर्जतची. आम्ही सगळे म्हणजेच काका वगैरे मोठ्या वाड्यात एकत्र रहायचो. जो नुकताच डेवेलप करुन मस्त बिल्डिंग बांधली आहे. तिथे आमचं कुटुंब अजूनही एकत्रच राहतं. राम गणेश गडकरी हे माझे पंजोबा सोप्या भाषेत वडिलांचे आजोबा. माझे बाबा म्हणजेच केतन गडकरी नाटक लिहितात. घरात कायमच वाद्य वृंद्य आणि कलेच वातावरण. माझ्या शिक्षणाबद्दल सांगायच तरं.... मी मास मिडीया (एडवर्टायजिंग) ची बॅचलर आहे. त्यानंतर मी एडवर्टायजिंग आणि पब्लिक रिलेशन्स मध्ये पी. जी. डिप्लोमा करुन आता मार्केटिंग मध्ये एमबीए करत आहे.

* 'पुढचं पाऊल' पूर्वी तू कोणकोणत्या मालिका केल्या आहेत?
- 'बाजीराव मस्तानी' ही माझी पहिली मालिका ज्यात मी चंदाची भूमिका साकारली होती. त्यानंतर
 'माझिया प्रियाला प्रित कळेना' मध्ये सोनिया, 'तुझविन सख्या रे' मध्ये लावण्या अशा काही भूमिका मी साकारल्या आहेत.

* तू अभिनयाच ट्रेनिंग घेतल आहेस का?

- नाही. मी साधं एक दिवसाच्या शिबीराला सुद्धा कधी गेलेले नाही. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत असताना मी काही फोटोशूट केलं. आणि अभिनय करु शकते असं वाटल्यामुळे मी ऑडिशन देत गेले आणि काम मिळत राहिलं.

* कल्याणी आणि जुई मधली तुलना तू कशी करशील?

- कल्याणी आणि माझ्यात फक्त दोन गोष्टी कॉमन आहेत. आम्ही दोघीपण नाती जपतो आणि त्यांच्यावर खूप प्रेम करतो. कल्याणी खूप साधी, सरळमार्गी आणि रडूबाई आहे. म्हणजे तिला कोणीही मुर्ख बनवू शकतं. अशी ती आहे. आणि माझ्याबद्दल सांगायचं तर मला माझ्या ग्रुपमधले 'गुंड' म्हणूनच ओळखायचे... म्हणजेच मी कशी आहे हे वेगळ सांगायला नको.... थोडीशी टपोरी आहे मी.

* म्हणजे तुला कल्याणी बनताना खुप कठिण गेलं असणारं?
- हो. खुप कठिण होत सुरुवातीला. आमच्या दिग्दर्शकाने माझ्याकडून खूप सराव करुन घेतला. कल्याणीचं बोलणं, तिला असलेली न्यूनगंडाची भावना, तिची बॉडी लँग्युएज. तिचा भोळेपणा यासगळ्यावर मी साधारणत: एक महिनाभर काम केलं आणि मगच शुटिंला सुरुवात केली.

* तू या मालिकेत एक आदर्श सून म्हणून सर्वांना आवडत आहेस.. पण आदर्श सूनेची तुझी व्याख्या काय आहे?
- घर आणि ऑफिस या दोन्ही जवाबदार्‍या तिने पार पाडल्या पाहिजेत. करिअर घडवताना घरातल्या जवाबदार्‍यांकडे दुर्लक्ष करता कामा नये. कारण घराचा खरा आधारस्तंभ घरातली स्त्रीच असते. तिने शारीरिक आणि मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे. तिचा दृष्टीकोन नकारात्मक नसावा. सगळ्या गोष्टी तिने सकारात्मक दृष्टीने विचार करावा. तिने तिच्या सासूला आईचा दर्जा देण गरजेच आहे. कारण यामुळे सासू-सून हे नातं संपून आई-मुलीच म्हणजेच दोघी मैत्रिणींसारख्या वागल्या तर त्या घरातले बरेचसे प्रॉब्लेम्स कमी होतात.

* तुला कोणत्या भूमिका करायला आवडतात?
- स्त्रीप्रधान मालिका करायला आवडतात. स्त्रीच्या वेग्वेग्ळ्या छटा दाखवायला मला आवडतील. टपोरी , जवाबदार, आगाऊ, सोज्वळ अशा वेगवेगळ्या पठडीतल्या भूमिका करायला मला आवडतील. ग्लॅमरस भूमिकेपेक्षा मला एखादा कॅरॅक्टर रोल करायला आवडेल... स्टार होण्यापेक्षा एक अभिनेत्री म्हणून नाव कमवायला आवडेल.

* तुझं पुढचं पाऊल काय आहे?
- सध्या मी ही एकच मालिका करत आहे. ज्याच शुटिंग महिन्यातले ३० दिवस चालू असतं. मला चित्रपट करायला आवडेल.
 



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.