Facebook Twitter

मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Friday, May 18, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
 
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
 
Untitled Document
कौशल इनामदार - संगीतकार
जितेंद्र मोरे © मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम करिता
३५६ गायक, एक गाणं, एक गीतकार, एक सूर, एक ताल. थोड अवघडं आहे ना ? असेल, पण अशक्य नाही. असाच एक भव्य प्रयोग 'मराठी अभिमानगीत' या द्वारे यशस्वी केला आहे संगीतकार कौशल इनामदार यांनी. प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असे कवी सुरेश भट यांचे बोल "लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी" संगीतबद्ध करणे हे कौशलचे भाग्य आणि असं गाण रसिकांपर्यंत पोहचणे हे आपल्या सारख्या श्रोत्यांच भाग्य. चित्रपट, नाटक, मालिका, जाहिराती अशा प्रत्येक माध्यमात त्याने स्वतःला संगीतकार म्हणून सिद्ध केलं आहे. प्रत्येक माध्यमातून त्याच्यावर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. जाणकारांनी त्याच कौतुक केलं आहे.
 
Kaushal-Inamdar बालगंधर्वांवरील भव्य कलाकृती 'बालगंधर्व' या चित्रपटाच्या माध्यमातून आता पडद्यावर साकारली जातेय, त्याचं शुटिंग  गेल्या महिन्यताच पूर्ण झाले. येत्या काही महिन्यात हा चित्रपट  आपल्याला पहायला  मिळणार आहे. या चित्रपटातील संगीताच्या माध्यमातून गंधर्व युग उभे करण्याची सन्माननीय संधी कौशलला मिळाली. हि संधी त्याच्यासाठी किती मोलाची आणि अविस्मरणीय आहे हे त्याच्यापेक्षा अधिक चांगल कोण सांगू शकेल... नाही का?म्हणूनच आम्ही त्याच्याशी बोलायच ठरवलं आणि त्याच्याकडून  बरच काही जाणून घेतलं. 

'बालगंधर्व' या चित्रपटासाठी संगीतकार म्हणून तुझी निवड करण्यात आली. म्हणजे ही संधी जेव्हा तुझ्यापर्यंत आली तेव्हा तुझ्या काय भावना होत्या असं कौशलला विचारण्यात आल्यावर तो सांगतो की. "खरतरं ज्यावेळी मला विचारण्यात आले कि या चित्रपटासाठी संगीतकार म्हणून आम्ही तुझा विचार करतोय. तू करशील का?" त्यावेळी माझा आनंद गगनात मावेनासा झाला. शिवाय, तेवढेच दडपण सुद्धा
होतं की बालगंधर्वांवरील चित्रपटासाठी संगीत द्यायचं म्हणजे एक आव्हानचं होतं. एक शिवधनुष्यच होत, ते मला उचलून पेलायच होत. पण मेहनत करण्याचे ठरवल.

या चित्रपटासाठी संगीत देताना त्याच्या डोक्यात नक्की काय होत? त्याने नक्की काय विचार करुन या चित्रपटाला संगीत दिलं. त्याने या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्या, याबद्दल तो म्हणाला, "बालगंधर्वांचा काळ म्हणजे १९१० चा साधारण  १०० वर्षापुर्विचा काळ.  त्या काळचं संगीत आपल्या पिढीने ऐकलही नसेल.  आपल्या पिढीने  त्यांना पाहिलं सुद्धा नाहीये. तो काळ पुन्हा जागवायचा होता आणि तो मुड पुन्हा क्रिएट करायचा होता.  त्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागली,अभ्यास करावा लागला.  ज्यांनी बालगंधर्वांना पाहिलय, त्यांना  प्रत्यक्ष  ऐकलयं, अशा काही व्यक्तींकडून इनपुट घेतले. प्रत्येकाकडून मिळालेली वेगवेगळी माहिती एकत्र करुन मी ते प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. ती सगळी प्रोसेस माझ्या साठी एका jigsaw ला पुजल्या सारखे होते. या चित्रपटाच्या संगीतावर काम करताना विशेष काळजी घ्यावी लागली ती म्हणजे 'बालगंधर्व' हे संगीतातील एक दैवतच आहेत. एक चमत्कारच. त्यांच जे योगदान आहे, तिथपर्यंत कुणीच पोहचु शकत नाही. पण मी जे काही करत होतो त्यात निदान काही चुक न व्हावी, म्हणून मी प्रयत्न केले कारण त्यात जराशी जरी चुक झाली असती तरी त्यांचे चाहते दुखावले गेले असते आणि मला ते नको होत. त्यामुळे खुप मेहनत  करुनच मी ते रसिकांसाठी तयार केलं आहे."

चित्रपटातल्या गाण्यांबद्दल कौशल सांगतो की "या चित्रपटात एकूण १७ गाणी आहेत. पण सर्वच गाणी नव्याने तयार केलेली नाहित. काही गाणी ओरिजिनल घेऊन ती फक्त re-record केली, कारण जी गाणी उपलब्ध आहेत ती आताच्या Dolby मध्ये करणं गरजेचं होतं. १७ मधली ४ गाणी हि आम्ही नव्याने तयार केली आहेत. (ज्यांना माझं स्वतःच संगीत आणि चाल आहे). प्रत्यक्ष ऑफर नंतर जवळपास दिड महिना मी preparation आणि research करत होतो. या चित्रपटासाठी संगीत देताना गायकांची निवड करताना या चित्रपटाच्या कास्टिंगचा विचार करणं खूप महत्त्वाच होतं कारण आपण जे संगीत तयार करतोय, ते त्या कलाकाराकडून पडद्यावर उतरताना कसं दिसणार आहे. त्याच्या बोलण्याच्या पद्धतीला ते सुट करेल की नाही ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्त्वाची असल्याने, मी गायकांची निवड करताना अनंत, श्रीरंग भावे, शंकर महादेवन, राहुल देशपांडे, बेला शेंडे यांचा समावेश केला आहे."

त्याच्यावर मदन मोहन, आर. डी. बर्मन, गुलाम अली, पंडीत सत्यशील, कमलाकर भागवत अशा संगीतकारांचा प्रभाव असल्याचं कौशल आवर्जुन सांगतो. 

'मराठी अभिमानगीता'ला मिळणार्‍या प्रतिसादाबद्दल कौशल खुप खुश आहे... पण एका गोष्टीवर तो थोडा नाराज सुद्धा आहे याचं कारण आम्ही त्याला विचारलं तर तो म्हणाला की "मी एकदा fm station  मध्ये गेलो होतो. तेव्हा मी त्यांना विचारले की तुम्ही मराठी गाणी का लावत नाही. तर ते म्हणाले की मराठी गाणी down market असतात. पण मला ही गोष्ट अमान्य आहे. कारण आज मराठीत अत्यंत उत्कृष्ट दर्जाची गाणी देण्याचा प्रयत्न सगळेच संगीतकार, गायक, लेखक करत आहेत. त्यामुळे मराठी गाणी down market आहेत आणि ती कोणी ऐकत नाही हा इतरांचा गैरसमज दूर केला पाहिजे."

सध्या कौशल सुद्धा 'बालगंधर्व'च music launch होण्याची वाट पाहतोय. त्याचे काम श्रोत्यांना नक्की आवडेल असा त्याचा आत्मविश्वास आहे..... शिवाय तो आणखी दोन चित्रपट आणि दोन म्युझिक अल्बमसाठी सुद्धा काम करतोय. . येणार वर्ष त्याला भरभराटीचे आणि यशाचे जावो ही शुभेच्छा.
 



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.