चित्रपट निर्मितीचं शिवधनुष्य मेघाने लीलया पेललं
'सुपरस्टार' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच त्या चित्रपटाची नायिका
मेघा धाडे हिच्याशी आम्ही संवाद साधला. चित्रपटाला मिळालेल्या चांगल्या
प्रतिसादामुळे मेघाने मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.
मेघा ही वयाच्या सातव्या वर्षापासून स्टेजवर वावरतेय. त्यामुळे अभिनय क्षेत्रात ती
नवी नाही पण याच क्षेत्रात करियर करायचं आणि ते पण पायरी पायरीने हे मनांत ठरवूनच
तिने जळगाव येथे शालेय शिक्षण पूर्ण करून मुंबई गाठली आणि पुढील शिक्षण घेता घेताच
ती छोट्या पडद्यावर दिसू लागली. तिने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमधून भूमिका
केल्या. बालाजी फिल्म्सच्या हिंदी सिरियल्स मधून गेली चार वर्ष ती प्रेक्षकांच्या
ओळखीची झाली आहे.
|
 |
तिला जेव्हा विचारलं की 'सुपरस्टार' या मराठी चित्रपटाची तू प्रथम
निर्माती झालीस म्हणून प्रमुख भूमिका स्वत:कडे घेतलीस का? तेव्हा तिने
स्पष्ट सांगितलं की निर्माती होण्याचं तिच्या ध्यानीमनी नव्हत. प्रथम
दिग्दर्शकाने तिला कथा ऐकवली. प्रमुख भूमिकेची ऑफर दिली. प्रोड्यूसर
दुसरीच व्यक्ती होती. कथा आवडल्याने तिने काम करण्याचे मान्य केले.
नंतर चित्रीकरण सुरु झालं. काही काळानंतर निर्मात्याने माघार घेतली. अशा
स्थितीत सिनेमा होऊ शकला नसता. मग मात्र एक चॅलेंज म्हणून तिने ही
प्रॉडक्शन ची जवाबदारी एवढ्या लहान वयात स्वीकारली आणि ती पूर्ण देखील
केली. तिने दाखवलेलं हे धाडस नक्कीच कौतुकास पात्र आहे.
तिने सांगितलं की पंढरीनाथ कांबळे आणि
सिद्धार्थ जाधव ह्या
द्वयी बरोबर काम करण्याचा
अनुभव अतिशय आनंददायी होता ते दोघे खरोखरीच जिवलग मित्र असल्याने त्यांची केमिस्ट्री
छान जमली होती. |
त्या दोघांनी मेघालाही त्यांच्यात सहज सामावून घेतलं आणि तिचं
टेन्शन नाहीस झालं. ती म्हणजे पॅडी आणि सिद्धू म्हणजे फुल ऑफ लाईफ.
जीवनाचा प्रत्येक क्षण ते आनंदाने जगतात. त्यामुळे चित्रीकरणाच्या वेळी वातावरण
एकदम छान राहिलं. 'सुपरस्टार' चित्रपटाचं चित्रीकरण वाई आणि नाशिक येथे झालं.
निर्माती म्हणून तिच्यावर अनेक जबाबदार्या होत्या. चित्रपट निर्मितीच शिवधनुष्य
मेधानं लिलया पेललं.
नायिका आणि निर्माती यातला कुठला रोल आवडला असं विचारलं तेव्हा मेधाकडून बर्यावाईट
अनुभव कथनाचा वर्षाव झाला. तिचं म्हणणं अभिनय क्षेत्र तिला नवीन नाही त्यामुळे
नायिकेचा रोल सहज सुलभ पार पडला. पण निर्माती म्हणून जे काही कटू अनुभव आले, कठिण
प्रसंग आले त्याविषयी सुद्धा ती
भरभरुन बोलते. ही एक तारेवरची कसरतच होती.
वाई आणि नाशिकला दोन्ही ठिकाणी पाऊस आणि वादळाने सेटच नुकसान झालं. ज्यांच्या घरात
शुटिंग चाललं होतं तिथे सोन्याची चोरी झाली त्यामुळे निर्माती म्हणून पोलिस
स्टेशनवर चकरा माराव्या लागल्या नुकसान भरपाई द्यावी लागली. शूटिंग काही दिवस बंद
ठेवाव लागलं. मनस्तापही झाला आणि आर्थिक नुकसानही झालं. चित्रपटाच्या मार्केटिंगसाठी
खूप धावपळ करावी लागली. याबाबतीत सचिन गुरव आणि सुनील भोसले यांनी खूप मदत केली.
नाटक, मालिका आणि चित्रपट यंची तुलना करताना मेघा म्हणते नाटकांत स्टेजवर कलाकार
संपूर्णपणे प्रेक्षकांच्या समोर दिसत असतात. त्यांच्या संपूर्ण हालचाले हावभाव
पाहून प्रेक्षक ताबडतोब प्रतिक्रिया देतात. टाळ्या वाजवतात. त्यामुळे हुरुप येतो.
किंवा पुढील प्रयोगत सुधारणा करायला वाव असतो.
छोट्या पडद्यावर रोज घराघरातून मालिका पाहिल्या जातात. लोकांचे लगेच फोन येतात.
त्यामुळे रोजच्या रोज प्रतिक्रिया कळते. सिनेमामधे सर्व हालचाली हावभाव कॅमेरात
टिपल्या जातात पण एडिटिंगमुळे आपला अभिनय नीट पोहचेल कि नाही याची कल्पना आधी येत
नाही. चित्रपट काही महिन्यांनी लोकांसमोर येतो. त्यामुळे प्रतिक्रिया खूप उशीरा
समजते.
'सुपरस्टार' ह्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे हे पाहून
कष्टाचे चीज झाले असे तिला वाटते आणि मधल्या सगळ्या संघर्षाचा थकवा नाहीसा होतो.
पुढील प्लॅनविषयी विचारले तेव्हा ती म्हणाली एका वेळी सिनेमा किंवा सिरीअल एकच
काहीतरी करावं असं वाटतं. सध्या ती मालिकांमधून विश्रांती घेणार आहे. २-३ मराठी
चित्रपट तिच्या हातात आहेत. पुढे निर्मिती चालू ठेवण्याचा मानस आहे. प्रोडयुसर
झाल्यावर कलाकारांच्या तारखांचे महत्त्व तिला चांगलेच कळले आहे. त्यामुळे ती
याबाबतीत फार काळजी घेणार आहे. तिच्या या सर्व प्रवासात तिला कुटुंबियांचा पाठिंबा
आहे. आईच्या प्रोत्साहनामुळे हे सर्व शक्य झालं हे तिने आवर्जून सांगितले.
मेघाला चित्रपट क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा.
|