मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Monday, April 27, 2015
मुख्य पृष्ठ - संपर्क | facebook twitter RSS Updates 
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
मिहीर सोनी 
जितेंद्र मोरे © मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम करिता


रिऍलिटी शो आणि मराठी चित्रपट सृष्टी यांचे नाते सर्वपरिचित आहेच. रिऍलिटी शो ने मराठी टेलिव्हिजन, नाटक  आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांना अनेक चांगले अभिनेते, अभिनेत्री, गायक, गायिका, संगीत दिग्दर्शक मिळवून दिले. डान्स रिऍलिटी शो ने चांगले डान्सर आणि कोरिओग्राफर मिळवून दिले.त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे 'एका पेक्षा एक' चा विनर सर्वांचा लाडका मिहीर सोनी. अवघ्या १० वर्षांचा मिहीर एका रिऍलिटी शो चा विनर तर आहेच पण 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये त्याच्या नावाची नोंद आहे.त्याच्या नृत्याच्या कौशल्यामुळे आगामी 'कुटुंब' या चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. त्याच्या ह्या संधीबद्दल आणि त्याच्या डान्सच्या आवडीबद्दल अधिक जाणून  घेण्यासाठी आम्ही त्याच्याशी गप्पा मारायचे ठरवले.
 
Miohir Soni, Eka Peksha Ek * या चित्रपटात काम करण्याची संधी तुला कशी मिळाली? आणि या चित्रपटात कोणती भूमिका साकारत आहेस ? 
- मी जेव्हा 'एकापेक्षाएक' हा रिअलिटी शो करत होतो तेव्हा त्याच्या फायनलसाठी महेश सर परिक्षक/मार्गदर्शक म्हणून आले होते. आणि त्यांनी डान्स / डान्स रिऍलिटी शो या संकल्पनेवर चित्रपट बनवण्याचे ठरविले तेव्हा त्या चित्रपटाच्या कथानकात एक  साधारण  ८-१० वर्षाचा मुलगा त्यांना हवा होता.त्यासाठी त्यांनी मला विचारले आणि मी काय लगेच हो म्हणाले कारण या चित्रपटात मी ज्या मुलाची भूमिका साकारत आहे तो डान्सबद्दल अतिशय passionate असा मुलगा आहे आणि तो वेगवेगळ्या डान्स स्पर्धांमध्ये भाग घेऊन खूप बक्षिसे जिंकून स्वतःच्या स्वप्नासोबत आई-बाबांचे स्वप्न पूर्ण करतो.
* चित्रपटात काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता ?
- चित्रपटात काम करण्याचा अनूभव खूपच चांगला होता. सुरुवातीला मला मराठी बोलता येत  नव्हते. पण  चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान पूर्ण टीमने मला मराठी शिकताना खूप  मदत केली. माझे सहकलाकार जितु दादा, विणा ताई  या सार्‍यांची खूप मदत झाली आणि आता मी खूप चांगलं मराठी बोलू शकतो.

* तू इतक्या डान्स कॉम्पिटीशन मध्ये participate केल आहेस तर तुझी आता पर्यंतची achievement काय वाटते तुला?
- मी माझ्या वयाच्या चौथ्या वर्षापासून डान्सची ट्रेनिंग घेत आहे. राजू परदेशी, दर्शन, श्रद्धा साठे यांच्याकडे मी ट्रेनिंग घेतलं आहे. 'ला शो दि रेकॉर्ड' या कार्यक्रमात इटलीतील रोम येथे पार पडलेल्या स्पर्धेत मी एका मिनिटात ५७ हेडस्वाईप करून त्याची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केली होती. असे करताना मी माझा ५६ हेड स्वाईपचा रेकॉर्ड मोडला हि माझ्यासाठी एक achievement आहे.

* अभ्यास आणि छंद या दोन्ही गोष्टींपैकी कोणत्या गोष्टीला जास्त प्राधान्य देतोस?
- मी अभ्यास करता करता माझा छंद जोपासतो. माझ्या आई-बाबांनी मला एक  वेळापत्रक करून दिले आहे.मी त्या वेळापत्रकाप्रमाणेच सगळी आखणी करतो. मला विविध प्रसिद्ध चॅनेलकडून डेली सोप  साठी सुद्धा विचारण्यात आले होते. पण डेली सोपमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते आणि त्यामुळे मी सध्या अभ्यास आणि डान्स प्रॅक्टिस या गोष्टींना आवश्यक तेवढा वेळ देतो पण एखाद्या चांगल्या चित्रपटासाठी विचारण्यात आले तर मी ती संधी नक्की स्विकारेन.
 
* तुला As a dancer आणि As a actor कोण आवडतं?
- हृतिक रोशन

* अभिनय आणि डान्स या व्यतिरीक्त तुला आणखी कशाची आवड आहे?
- अभिनय  आणि डान्स या व्यतिरीक्त कॉम्प्युटर गेम खेळायला आवडतात आणि कार्टून पहायला आवडते.

* मोठेपणी तुला कोण व्हायला आवडेल?
- मोठं झाल्यावर मला Actor, Dancer, Choreographer & Director व्हायचं आहे.

नक्कीच मिहीर...  तुला तूझ्या पुढच्या  वाटचालीसाठी मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम तर्फे खूप खूप  शुभेच्छा

 
 मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2015. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.