 |
'झी मराठी' ची मालिका 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' लोकांनी पसंत केलेली
आहे आणि मृणाल दुसाणीस हे नाव आज 'शमिका' म्हणून गाजत आहे. टेलिव्हिजनची
राणी एकता कपूरची हि पहिली मराठी मालिका आज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली
आहे. त्यानिमित्त मृणालची घेतलेली हि मुलाखत.
आपली 'शमिका' हि व्यक्तिरेखा फारच गाजतेय. काय कारण असावे ? -
'शमिका' हि एक भोळीभाबडी,
निरागस,
आणि थोडीशी बावळट पण आपल्या परिवारावर नितांत प्रेम करणारी
आणि आपल्या आई
|
वडिलांवर अतिशय प्रेम करणारी मुलगी आहे. हि
व्यक्तिरेखा आपण आपल्या आजूबाजूला कुठेही बघू शकतो. म्हणून लोकांनी
'शामिकाला' पसंत केले असावे असे वाटते.
मालिकेत काम करण्याचा अनुभव कसा आहे ?
- मी मुळची नाशिकची आणि महाविद्यालयात थोडेसे प्रायोगिक रंगभूमीवर काम केले
होते. पण टेलिव्हिजन मालिका करण्याची पहिलीच वेळ
म्हणून तांत्रिक बाजू शिकावी लागली पण काहीतरी नवीन शिकण्याचा आनंद मिळाला.
सह कलाकारांसोबत अनुभव कसा आहे ?
- अभिजित हा पण नाशिकचा आणि मी त्याच्याबरोबर कामही केले होते म्हणून एक
चांगला अनुभव. बाकी वरिष्ठ मंडळी म्हणजे अमिता खोपकर,
सुहिता थत्ते,
सुमुखी
पेंडसे,
संजय मोने ह्यांनी मला सांभाळून घेतले आणि एक घरचे वातावरण नेहमी मला मिळाले.
एकता कपूरची प्रतिक्रिया काय आहे?
- एकताजी
नेहमी माझी
विचारपूस करतात आणि मला शाबासकीही
देतात. त्यांचा सहवास लाभणे हीच एक मोठी गोष्ट आहे
माझ्यासाठी.
मुंबईचा एकंदर अनुभव
कसा? - पूर्वी प्रायोगिक
नाटकानिमित्त क्वचित यायचे पण
आता मुंबई
हि कर्मभूमी झाली आहे
आता आणि त्यात
'झी मराठी' वाहिनीचा मोठा हात आहे.
|