Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Sunday, February 12, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
Untitled Document
मुक्ता बर्वे
चेतना © मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम करिता

Mukta Barve * तू सिनेमा,  नाटक, टि.व्ही. सिरीअलमध्ये काम केले आहे. पण यापैकी लोक कशामुळे तुला ओळखायला लागले?
- मी सिनेमा , नाटक, टि.व्ही. सिरीअलमध्ये काम   केले. पण मी नाटकाला आधी सुरुवात केली. सिनेमात काम करायला मी उशीरा सुरूवात केली. नाटकं आधी केल्यामुळे नाटकाचा प्रेक्षकवर्ग ओळखू लागला आणि सिनेमा केल्यामुळे सिनेमाचा प्रेक्षकवर्ग ओळखू लागला.
* एका कलाकारासाठी पुरस्काराच काय महत्त्व आहे? चकवा साठी तुला शासनाच आणि झी च बेस्ट प्रोमिसिंग न्यु कमरचा पुरस्कार मिळाल्यानंतर तुझी प्रतिक्रिया काय होती? 'कबड्डी कबड्डी' च्या यशाची जमेची बाजू कोणती?
- - पुरस्काराच महत्त्व खूप आहे. ती पावती आहे एका कलाकारासाठी की लोक आपलं काम बघतात आणि त्यांना ते आवडतय. आपल्या कामाची कोणीतरी दखल घेतय आणि आपण करतोय ते एकतर्फी नाही याची खात्री पटते. या सगळ्या गोष्टी जाणवण्यासाठी पुरस्कार मिळणं गरजेच आहे.
चकवासाठी पुरस्कार मिळाल्यावर मी सॉलिड खुष झाले होते. पहिला पुरस्कार हा नेहमीच महत्त्वाचा असतो. माझ्यासाठी तर नामांकनाच पत्र माझ्यानावावर माझ्या घरी येण सुद्धा खुप कौतुकाची गोष्ट होती आणि राहिल. 'कबड्डी कबड्डी' बद्दल सांगायच झाल तर या नाटकाची कथा खूप अपिलिंग होती. कलाकार सगळेच एकदम तगडे होते. कबड्डी या विषयापुरती मर्यादित न राहता वडील - मुलीच्या नात्यावर हे नाटक आधारीत आहे.

* 'एक डाव धोबीपछाड' हा तुझा नविन वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेला चित्रपट. या बद्दल काय सांगशील?
मस्त. खूप छान. अशोक मामांचे चित्रपट बघतच मी मोठी झाले.त्यांच्यासोबत काम करणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. मी त्यांच्या टायमिंगची फॅन आहे. ते या क्षेत्रात मास्टर आहेत. या क्षेत्रात खूप वर्ष काम करणारे खूप जण आहेत, पण मामांनी यावर प्रभुत्व मिळवले आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर मला मिळालेल्या कॉम्प्लिमेंट मध्ये सगळ्यात स्ट्राँग कॉप्लिमेंट म्हणजे मला काही जण म्हणाले की तू खरच त्यांची मुलगी वाटतेस. आणि या काहि जणांमध्ये निवेदिता मॅडम पण होत्या.

आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बाजी मारल्यानंतर तुझी प्रमुख भूमिका असलेला 'जोगवा' प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. कसं वाटतय तुला?
- चित्रपटाच्या प्रदर्शनाची खूप उत्सुकता आहे. चित्रपट खूपच अप्रतिम झाला आहे. खूप प्रेक्षणिय आहे. एक सामाजिक विषय हाताळण्यात आला आहे. ही एक वेगळी प्रेमकथा आहे. जोख्ता आणि जोख्तीणीची. यात मी जोख्तीणीच्या भूमिकेत असून उपेंद्र लिमये जोख्त्याच्या भूमिकेत आहे. या चित्रपटातील अजय-अतुल यांच संगीत असलेली गीते आनंद शिंदे, श्रेया घोषाल, हरिहरन यांनी गायली आहेत. महोत्सवात चाललेला चित्रपट चित्रपट्गृहात फारसा चालत नाही अस म्हणतात पण ते या चित्रपटाच्या बाबतीत घडताना दिसत नाही याचा अनुभव आम्ही टेक्निकल रिलीज करायच म्हणून कोल्हापूरला केलेल्या शो मध्ये घेतला.

या चित्रपटातल्या तुझ्या जोख्तीणीच्या भूमिकेसाठी तू कशी तयारी केलीस?
-
ही भूमिका थोडी वेगळी असल्याने थोडा अभ्यास करावा लागला. मी काही फोटोंची मदत घेतली आणि ग्रामिण भागात तर बघायला मिळतातच या गोष्टी. जोख्तीणीच सामाजिक आयुष्य काय आहे ते जाणून घेतलं. कर्नाटकमध्ये एक गाव आहे सौंदत्ती तिथे जोख्ता आणि जोख्तीणीच देवाशी लग्न लावतात. भूमिका करण्यापर्यंत ठिक आहे पन त्यांच्या आयुष्याबद्दल जर विचार केला तर खरच त्रास होईल या गोष्टींचा. दोन एकाच वयाच्या मुली. एकीच लग्न, संसार, मुल. आणि दुसरीकडे गाववाल्यांनी लिंब नेसवून बनवलेली जोख्तीण जिला माहितेय  लग्न, संसार, मुल या गोष्टी माझ्या आयुष्यात घडणार नाहित. एक पुरुष ज्याला गाववाल्यांनी इतका त्रास दिलाय तो पुरुष नाही अशी जाणीव त्याला करून दिली आहे. या व्यक्तींच सामाजिक आयुष्य कस आहे हे दाखवण्यात आलं आहे. अंधश्रद्धा माणसापेक्षा मोठी झाली की त्रास होतो.

'ब्लाईंड गेम' नंतर पुन्हा एकदा राजीव पाटील आणि उपेंद्र लिमये सोबत काम करतानाचा तुझा अनुभव कसा होता?
- 'ब्लाईंड गेम करताना राजीव माझ्यासाठी फक्त 'सातच्या आत घरात'चा दिग्दर्शक होता. आणि मी शाळेत असताना उपेंद्रच नाटक पाहिल होतं तेव्हापासून त्याच काम आवडतं. मधल्या गॅप मध्ये आम्हा सगळ्यांच्यात ड्रास्टीक बदल झाले. 'जोगवा'च्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र काम करताना आम्हाला जाणवल की आपण किती मॅच्युअर झालो आहोत. कामात प्रोफेशनलिस्म आला आहे. खूप पारदर्शकता आली आहे कामात. या चित्रपटात माझे आणि उपेंद्रचे खूप रोमँटिक शॉट्स आहेत. एका गाण्यात उपेंद्र साडी मध्ये आहे. ते गाणं करताना मला आणि उपेंद्रला खूप भीती वाटात होती की लोक हे सगळ स्विकारतील की नाही? पण राजीव हा खूप हुशार दिग्दर्शक आहे. त्याला प्रेक्षकांची लेवल माहितेय. ते गाणं येईपर्यंत लोक त्या कथेशी इतके एकरुप झालेले असतात की उपेंद्रने साडी नेसली आहे हे डोक्यात येत नाही. या वरून एक किस्सा आठवला तो मला सांगावासा वाटतो कि माझ्या आई-बाबांनी हा चित्रपट पिफ म्हणजे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये पाहिला आणि घरी आल्यानंतर त्यांच अखंड चर्चसत्र भरल होत ते 'सुमी'च्या आयुष्यावर. मला आईला सांगाव लागल कि आई ती मी होते म्हणून.

तुझा आवडता सहकलाकार कोण?
- मी आतापर्यंत जेवढे चित्रपट आणि नाटकं केले त्यात माझ्या सोबत नेहमी वेगवेगळे कलाकार होते. प्रत्येकासोबतच काम करण्याचा अनुभव वेगळा  आहे. सगळ्यांसोबतच छान टयुनिंग जमल होतं. आणि समोरच्या व्यक्तीने जर तुम्हाला कम्फर्ट केल तरच केमिस्ट्री चांगली जमते.

आतापर्यंत तू वर्षाला एकच चित्रपट केला आहे. पण या वर्षाच्या सुरुवातीलाच 'एक डाव धोबीपछाड' आणि आता 'जोगवा' येतोय. २००९ तुझ्यासाठी लकी आहे म्हणायला हरकत नाही.
- हो नक्कीच हरकत नाही. वर्षाची सुरुवात जोरदार झाली. या दोन चित्रपटांव्यतिरीक्त गजेंद्र अहिरे दिग्दर्शित 'सुंबरान' नावाचा चित्रपट मी करतेय. एका चित्रपटाच ७०-८० % काम पूर्ण झाल आहे. आणि एकाच शुटिंग या महिन्यात चालू होईल. आणि नाटकाचे प्रयोग चालू आहेत. मला तर २००९ छान चाललय आणि जाईल व प्रेक्षकांनासुद्धा चांगल्या कलाकृती पहायला मिळून त्यांच वर्ष सुद्धा मस्त जावो.  





मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.