Facebook Twitter

मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Friday, May 18, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
 
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
 
नेहा पेंडसे
चेतना गावखडकर © मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम करिता
"आपल्याकडे टॅलेन्टची कमतरता नक्कीच नाही" - नेहा पेंडसे

* तू या क्षेत्राकडे कशी वळलीस?
- या क्षेत्राकडे कशी आले ते सांगण कठिण आहे. म्हणजे खूप लहान असल्यापासून अभिनय करत आहे. पृथ्वी थिएटर मध्ये रामनाथ थरवळ यांच्याकडून मी अभिनयाचे धडे घेतले. त्यांनी माझं नाव काही ठिकाणी सुचवलं व एक काम पाहून पुढची कामं मिळत गेली.

* तुझ्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून झाली ?
- हो. साधारण १०-१२ वर्षांपूर्वी आपल्याकडे बालकलाकारांची फारशी चलती नव्हती आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा बालकलाकारांची संख्या कमी होती. तेव्हा एकता कपूर तिची पहिली मालिका करत होती आणि योगायोगाने ती माझी सुद्धा पहिली मालिका ठरली. 'हसरतें', 'पडोसी', 'खुशी' अशा काही मालिकांमध्ये मी काम केलं आहे, तसेच 'प्यार कोई खेल नही', ' तुमसे अच्छा कौन है', 'दिवाने' या चित्रपटात माझ्या भूमिका आहेत. दूरदर्शनवर पूर्वी दोन्-अडीच तासाची टेलिफिल्म लागायची त्यात सुद्धा मी अनंत महादेवन दिग्दर्शित 'घुंघट के पट खोल' या टेलिफिल्म मध्ये काम केलं आहे.
 
Neha Pendse, Bhagyalakshmi * तू दक्षिणात्य चित्रपटात सुद्धा काम केले आहेस?
- हो. मी आतापर्यंत १३ चित्रपट केले आहेत. त्या सर्व चित्रपटांमध्ये माझ्या मुख्य भूमिका होत्या. तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्न्ड अशा चारही भाषांमध्ये मी चित्रपट केले आहेत.

* तू साऊथ आणि मराठी चित्रपटांमध्ये तुलना करु शकते का?
- हो. साऊथ आणि मराठी या दोन्ही रिजनल मुव्हीज आहेत. प्रेसेंटेशन आणि बजेट या दोन गोष्टींमध्ये आपण मागे आहोत. आपल्याकडे प्रेक्षकांची विभागणी झालेली दिसते. इंटेलिजंट आणि कमर्शिअल आणि टिपिकल अशी. परंतु तिथे प्रेक्षकांना काय हवे आहे हे तिथल्या फिल्म मेकर्सला माहित आहे आणि ते ग्लॅमर तिथल्या प्रेक्षकांना त्यांच्या रिजनल मोव्हीज मधून अनुभवता येत असल्याने ते दुसर्‍या रिजनल मुव्हीज कडे लक्ष देत नाहीत. पण आपल्याकडे टॅलेन्टची कमतरता नक्कीच नाही. या बाबतीत आपण दक्षिणात्य आणि बॉलिवुड यापेक्षा खूप सरस आहोत.
* तू मराठी इंडस्ट्रीत कशी आली?
- चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित पिंपळपान' ही माझी पहिली मालिका नंतर 'भाग्यलक्ष्मी' आणि 'एकापेक्षाएक- अप्सरा आली' हा रिऍलिटी शो.
'अग्निदिव्य' हा माझा पहिला चित्रपट ज्यासाठी मला स्टेट ऍवॉर्ड मिळालं होतं आणि 'करुया उद्याची बात' हा माझा नुकताच प्रदर्शित चित्रपट. या चित्रपटाचा विषय ग्लोबल होता. पण तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचलाच नाही. या चित्रपटाला यु. एस चं ग्रीन ऍवॉर्ड सुद्धा मिळालं आहे.

* 'भाग्यलक्ष्मी' या मालिकेत तू दुहेरी भूमिका साकारण्याचा अनुभव कसा आहे?
- अनुभव चांगला आहे. रिअल लाईफ मध्ये मी थोडी काशी आणि थोडी गोपी सारखी आहे. त्यामुळे या दोघींमार्फत मला पूर्णपणे मी साकारायला मिळाल्यामुळे या दोन्ही भूमिका मी एन्जॉय करते.

* 'एकापेक्षाएक- अप्सरा आली' चा तुझा अनुभव कसा होता?
- खुप शिकायला मिळालं. मी डान्सर नाही. लहान असताना मी २ वर्षे क्लासिकल शिकले होते. मला डान्सचा बेस नाही. एक नॉन डान्सर असून मी या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचले ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

* तुझ्या आगामी प्रोजे़क्ट्सबद्दल सांग..
-  'एकापेक्षाएक- अप्सरा आली' मुळे गेले ४ महिने मी दुसरं काहीच करु शकले नाही 'भाग्यलक्ष्मी' वगळता. ते चालू असताना मला काही ऑफर्स आल्या होत्या पण तारखा सूट होत नसल्याने मी त्या स्विकारल्या नव्हत्या. मे मध्ये १५ दिवस मी आउट ऑफ इंडिया जाणार आहे त्यामु़ळे जूनमध्ये परत आल्यानंतर कामाला सुरुवात होईल.
 



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.