कल्पनाशक्ती हीच खरी गुरुकिल्ली - निलेश मोहरीर
जवळपास २१ मालिकांची शिर्षकगीते, १४ म्युझिक अल्बम आणि ७ चित्रपटांना संगीत असा हा
प्रवास फक्त ५ वर्षात घडवून आणणारा तरुण संगीतकार म्हणजेच निलेश मोहरीर या छोट्या
प्रवासातच त्याने एवढे पुरस्कार प्राप्त केले आहेत की त्याचे कौतुक करावे तेवढे
कमीच.
मुंबई विद्यापिठातून संगीत साईंड रेकॉर्डिंगची पदवी प्राप्त करत असतानाच निलेशला
अनिल मोहिले व अच्युत ठाकूर यांसारख्या दिग्गज लोकांकडून संगीताचे शिक्षण प्राप्त
होते. टाईम्स म्युझिक, फाऊंटन, सागरिका व कृणाल अशा मोठ्या कंपन्यांनी त्याचे
म्युझिक अल्बम प्रकाशित केले आहेत. सुरुवातीलाच संगीत संयोजक (म्युझिक अरेंजर)
म्हणून काम करत असतानाच जेव्हा त्याला 'कळत नकळत' या मराठी टी.व्ही. मालिकेसाठी
शिर्षक गीत देण्यासाठी ब्रेक मिळाला, तेव्हा मात्र निलेश प्रकाशझोतात आला.
'कळत नकळत' च्या यशामुळे निलेश लोकप्रिय तर झालाच, शिवाय निर्मात्यांची रांग
त्याच्या घरी लागली. त्याच्या चित्रपट प्रवासाकडे पाहिले तर 'यंदा कर्तव्य आहे' या
त्याच्या पहिल्याच चित्रपटातील राहुल वैद्य व वैशाली सामंत यांनी गायलेल्या
गीतावरुनच निलेशच्या संगीताचे खरे सामर्थ्य कळते. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'मन्या
- द वंडर बॉय' हा चित्रपटही निलेशच्या संगीताची एक वेगळीच ओळख करुन देतो.
मराठीमुव्हीवर्ल्डने निलेश सोबत मारलेल्या गप्पा.
|
 |
तुझ्या कारर्किर्दिची सुरुवात कशी झाली? तू आधी पासूनच ठरवून हे क्षेत्र
निवडले होतेस?
- खरं सांगू , कॉलेजपर्यंत मला बिल्कुल कल्पना नव्हती की, मी ह्या
क्षेत्रामध्ये करीअर करणार आहे. तसा आधी गाणी ऐकायचो, कॉलेजमध्ये परफॉर्मर होतो;
गायचो सुद्धा. पण ९४-९५ दरम्यान जेव्हा मी ए. आर. रेहमानच्या 'बॉम्बे' ह्या
चित्रपटातील गाणी ऐकली तेव्हा मात्र मला खरच कुठे तरी आतून एक ठिणगी पेटल्यासरखं
झालं, आपणही असलं काही तरी सॉलिड म्युझिक द्यायला हवं. असं वाटायला लागले, तेव्हा
पासून मी ए. आर. रेहमानला माझा गुरु मानतो. प्रत्येक गाण्याचा मी बारकाव्याने
अभ्यास करु लागलो.
ग्रेट...... म्हणजे ए. आर. रहमान तुझा आदर्श आहेत तर.
- हो. |
सध्या बरेचसे नवीन तरुण संगीतकार प्रकाशात येत आहेत. पण सातत्याने एक गोष्ट अशी
जाणवते की वेस्टर्न, साऊथ, हिप हॉप, रॉक असली सगळी भेसळ करुन, त्यात मराठी लिरिक्स
फिट केलं जातय? असं नाही वाटत तुला?
- (हसून) ... ट्रू. काही केसेस मध्ये असं होतय खर... पण ह्या संदर्भात माझ पर्सनल
ओपिनियन विचारल, तर एकच सांगेन.... की एक्सपेरिमेंटल आणि इमॅजिनेशन
मध्ये इमॅजिनेशन महत्त्वाचे आहे. तुम्ही जर
इमॅजिनेशन नाही केलत आणि आहे त्या चौकटीतच काम केलत तर बरेचदा एक्सपेरिमेंट म्हणून
केले जाणारे प्रयोग फसतात. मला स्वतःला तसल्या पठडीचे म्युजिक करायला नाही आवडत. मी
संगीत करताना एक काळजी नेहमी घेत असतो की जर म्युजिकचा genre तुम्ही वेस्टर्न किंवा
नॉन मराठी वापरत असाल तर निदान काही लिरिक्स (बोल) तुम्ही तसे त्या गीतात गुंफायला
हवे.
गेल्या ५-६ वर्षात आलेल्या नविन गीतात आम्हाला प्रकर्षाने ते साऊथ फिल्म साँग
किंवा इंग्लिश पॉपच असलेले वाटते.
- खरंतर एक वेळ साऊथ स्टाईलचे म्युझिक चालेल, कारण ते एक रिजनलच आहे
व आपल्या देशातील एक संगीत प्रकार आहे. पण अगदीच इंग्लिश पॉप आणि
तिकडची म्युझिक इन्स्ट्रुमेंट वापरुन तयार होणार्या गाण्यात मराठीचा आत्मा नसतो असं
मला वाटतं.... गाणं तयार करताना वाद्य, ऍरेंजमेंट ही त्या चालीच्या, सिंगरच्या
आवाजाच्या वरचढ नसावी असे मी मानतो. ... तुमच्या गाण्यातील भाव हे त्या चालीतून,
स्वरातून, गायकाच्या आवाजातून जास्त एक्सप्रेस व्हायला हवेत रादर दॅन इन्सटॄमेंट.
आधीच्या काळी संगीतकाराला एक विशिष्ट प्रसिद्धी मिळायची.... नावलौकिक मिळायचे,
पण हल्ली अस होत नाही. नवीन गाणी लक्षात राहतात पण संगीतकाराला फारसं क्रेडीट मिळत
नाही. तुला काय वाटत?
- एक्साक्टली........ खरतर हा खूप मोठा विषय आहे. खूप काही कारणे आहेत पण बेसिक
सांगायचे झाले तर ज्या प्रमाणे मराठी सिनेमाची अवस्था आहे. तशीच थोडीफार मराठी
म्युझिकची व्यथा आहे. गाणी लोकांपर्यंत पोहचली जात नाहीत. आज इतकी सारी माध्यम
उपलब्ध असून सुद्धा लोकांपर्यंत गाणं नीट पोहचत नाही. पुर्वी रेडिओ (आकाशवाणी)
हे एकमेव माधय्म असून देखील आधीची गाणी लोकांच्या लक्षात आहेत.
त्याच कारण हेच की त्या वेळी प्रत्येक गाण नीट ऐकल जायच.. आज हिंदी म्युझिकसाठी इतकी
चॅनेलस आहेत, कीतीही वाईट गाण असल तरी ते कंटिन्युअस हॅमर केल जात..........
ऐकवल जात........ म्हणून हिंदी म्युजिज्क जास्त फेमस आहे. आधिक लोकांपर्यंत पोहचतय.
तस मराठी साठी कुठलेच ऑपशन नाही. मला जास्तीत जास्त लोक ओळखतात ते माझ्या टायटल
साँगमुळेच....माझी बरीचशी अशी कंपोसिशन आहेत की जी लोकांना माहितच नाहीत.
लोकांपर्यंत पोहचलीच नाहीत.
हल्लीची पिढी खूप नेट सेव्ही आहे. मोबाईल, टेलिव्हिजन प्रमाणेच इंटरनेट हे
त्यांचा दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक बनलेला आहे. मग तुम्ही ते माध्यम का नाही
वापरत ?-
बरोबर ........ आज इंटरनेटमुळे बर्याच चांगल्या गोष्टी घडतायत....... माझ्या सारखे
अजून बरेच नवीन कलाकार आहेत जे ह्या माध्यमाचा
वापर करतात. पण तरी अजून थोडा वेळ लागणार आहे पुर्ण पणे मराठी म्युझिक लोकांपर्यंत
पोहचवण्यासाठी आणि त्याची गोडी निर्माण करण्यासाठी...
आत्तापर्यन्त तू कंपोज केलेले तु़झ फेवरेट साँग कुठल आहे?
- खरंतर मी रिसेंन्टली 'मन्या.....' ह्या फिल्म साठी एक साँग कंपोस केल आहे. 'नुर अदा.......
नूर अदा' ते मा़झ खुप फेवरेट आहे. शिवाय मिडीया
फ्रेंडस मध्ये सुद्धा त्या ट्रॅक साठी माझ खुप कौतुक होतय.
खुप काँप्लिमेंट्सही मिळाल्या आहेत.
'मन्या' नंतर अजून कुठल्या कुठल्या फिल्म्स साठी तू म्युझिक दिल आहेस? अजुन कुठले
अल्बम आम्हाला ऐकायला मिळणार आहेत?
- आगामी काळात मी ३ मराठी फिल्म साठी म्युजिक कंपोस करत आहे. त्यात 'पार्टनर', 'प्लॅटफॉर्म',
'निरुत्तर' ह्या फिल्म्स आहेत. त्यातील 'पार्टनर' हि फिल्म व पु काळेंच्या कादंबरीवर
'पार्टनर' वर हा सिनेमा बनवण्यात आला आहे. ....शिवाय प्लॅटफॉर्म ह्या सिनेमालाही
अनेक प्रेस्टिजियस फिल्म फेस्टीवल मध्ये ऍप्रिशिएशन मिळालय. ह्या शिवाय
टेलिव्हिजन वर २-३ सिरीअल्स साठी टायटल साँग कंपोज करतोय....
आम्ही नक्कीच उत्सुक आहोत तुझी गाणी ऐकायला...... होपफुली तु नक्कीच छान
कर्णमधुर संगीत दिलं असशील. तुझ्या यशाची गाडी अशीच वेगाने धावत राहो. आगामी करीअर
साठी हार्दिक शुभेच्छा..
-धन्यवाद |