"'सुपरस्टार' होण्याबरोबरच चांगला माणूस होण्याचा प्रयत्न" - पॅडी कांबळे
'सुपरस्टार चित्रपट प्रदर्शित होण्याआधी व नंतर थोडे दिवस पंढरीनाथ कांबळे यांची
खूप धावपळ चालू होती. चित्रपटाला अनेक थिएटर्समध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्याच्या
बातम्या मिळाल्यानंतर ते थोडे रिलॅक्स झाले आणि आमच्याशी गप्पा मारायला थोडी उसंत
मिळाली.
सुपरस्टार मधल्या वेगळ्या रोल मध्ये प्रेक्षकांकडून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला?
- चित्रपटाला आणि माझ्या गंभीर भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
माझ्या सिनेकरिअरमधला हा
टर्निंग पॉईंट होता. मी सिरीयस रोल करु शकतो हे मला सिद्ध
करायचं होतं आणि ही संधी मला दिग्दर्शक महेंद्र कदम याने दिली. तो माझा शाळेपासूनचा
मित्र आहे. तो माझे गुण ओळखतो. डिस्ट्रीब्युटर नानूभाई यांना सुद्धा माझ्या या
भूमिकेविषयी खात्री वाटली. त्या दोघांचा मी खूप आभारी आहे. खरं म्हणजे प्रेक्षकांच्या
आधी दिग्दर्शकाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला मला असं वाटतं की मी त्या
विश्वासाला न्याय देऊ शकलो. कारण दिग्दर्शकाने अनेक वेळा माझ्या अभिनयावर खुष होऊन
पाठिवर कौतुकाची थाप दिली यात मला समाधान आहे.
|
 |
पंढरीनाथ कांबळेच 'पॅडी' हे नामकरण कुणी आणि केव्हा केलं?
मी कॉलेजमध्ये असताना अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत अस. १९८८ मध्ये मोनोऍक्टिंग, गाणं
आणि मिमिक्री अशा सगळ्या स्पर्धांत मला प्रथम बक्षीस मिळालं. त्याबद्दल कॉलेजकडून
स्कॉलरशीपही मिळाली. तेव्हा मित्रांनी विशेष करुन कैलास नावाच्या मित्रानं 'पॅडी'
हे नाव ठेवलं.
तुम्ही या क्षेत्रात कॉलेजमध्ये असतानाच पदार्पण केलं का?
- आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा हे व्यवसायिक रंगभूमीवर येण्याची पहिली पायरी
आहे. मी, भरत जाधव, अंकुश चौधरी, केदार शिंदे आम्ही सर्वांनी मुंबईच्या महर्षि
दयानंद म्हणजे एम. डी. कॉलेजमधून अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. |
हौशी रंगभूमीवर्ही तुमचा सहभाग होता का?
- हो हो.. ती पुढची पायरी...... तिथं मी 'प्लांचेट' एकांकिका केली. अनेक विनोदी
भूमिका केल्या. देवेंद्र पेम कडून खुप शिकायला मिळालं. त्यानंतर व्यवसायिक
रंगभूमीवर केदार शिंदेचंही मार्गदर्शन लाभलं.
तोपर्यंत तुम्हाला यशाचं शिखर दिसायला लागलं होतं का?
- माझ्या आधी काही प्रेक्षकांनी ओळखलं होतं माझं टॅलेन्ट. सवाई स्पर्धेत नाटक
झाल्यानंतर एक जण आपल्या ७-८ वर्षाच्या मुलाला घेऊन मला भेटायला आला आणि हसत हसत
आपल्या मुलाला म्हणाला "अरे आजच सही घेऊन ठेव नंतर मिळणार नाही." ही गोष्ट खूप
आनंददायी होती. पण मी हुरळून गेलो नाही. आणखी जोशात कम करीत राहिलो.
तुम्ही सर्वसामान्यांच्या परिचयाचे झालात ते 'हसाचकट फू' आणि 'गंगूबाई नॉनमॅट्रिक
या मालिकांमुळे... त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
- 'हसाचकट्फू' मुळे लोक मला
घराघरातून ओळखू लागले आणि 'गंगूबाईने' तर धमाल उडवून
दिली. लहानांपासून म्हातार्यापर्यंत सर्वजण एकत्र बसून ही मालिका पाहत. सहा वर्षे
ही कॉमेडी सिरीअल चालली. हे एक व्हिज्युअल वर्तमानपत्र होतं. त्याचं क्रेडिट लेखक-
दिग्दर्शक राजेश देशपांडे यांना जातं. निर्मिती बाईंनी तर बहार आणली. त्यांच्या
कॅलीबरची दुसरी नटी नाही असं मी म्हणेन.
या सिरीअलमध्ये तुमची आणि निर्मिती ताईंची केमिस्ट्री खूप छान जमली होती.
त्यांच्याबरोबर काम केल्याच तुम्हाला काय फयदा झाला?
- मी त्यांना बाई म्हणतो. त्यांनी मला खूप काही शिकवल. माझ्या जडण घडणीमध्ये त्यांचा
मोठा वाटा आहे. १९९४ मध्ये मी त्यांच्याबरोबर 'डबल ट्रबल' नाटकात भूमिका करीत होतो.
त्यामुळे 'गंगूबाईच्या' शुटींगच्यावेळी मी बुजलो नाही. अजूनही मी त्यांच्याशी माझ्या
भूमिकांविषयी
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फोनवरुन सुद्धा चर्चा करतो.
नाटक, सिनेमा आणि टेलिव्हिजन मालिका या सर्व माध्यमातून तुम्ही कामे केलीत.
सगळ्यात अधिक कुठे रमलात?
- अर्थातच नाटकात............ नाटकाचा नशा काही औरच. नाटक ही झटपट लॉटरी आहे.
प्रेक्षक आपल्यासमोर 'पंच'ना लगेच रिऍक्ट होतात. हसतात. रडतात. सिनेमा ही लेंदी
प्रोसेस आहे. सुरुवातीला नाटकातून मला
प्रसिद्धी मिळाली.
आयुष्यामध्ये पुढे काय ध्येय ठेवलय?
- मी कलाकार म्हणून मोठा होण्यापेक्षा 'माणूस' म्हणून मोठा होण्याचा प्रयत्न करणार
आहे. मला लोकांनी चांगला माणूस म्हटलं पाहिजे. माझा कुणाला राग येऊ नये. माझ्याकडून
कुणी दुखावल जाऊ नये याची मी काळजी घेतो. तुमच वागणं तुमच्या कलेतूनही समजतं. रागीट
आणि खडूस माणसाचं वागणं कामातून रिफ्लेक्ट होतं. मला नुसते पैसे कमवायचे नाहीत
चांगली कामे करत मोठं व्हायचंय.
|