Facebook Twitter

मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Friday, May 18, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
 
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
 
पूजा सावंत .
पूनम शिवले © मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम करिता
मराठीत ग्लॅमर आणायचं आहे - पूजा सावंत.

हाउस फुल या कार्यक्रमातून सूत्रसंचालन, 'एका पेक्षा एक जोडीचा मामला' या रिऍलिटी शो मधून डान्स आणि 'क्षणभर विश्रांती', ' झकास' या चित्रपटातून अभिनय अशा आपल्या विविध कलागुणांचे पैलू उलगडून दाखवणारी पूजा सावंत सगळ्यांच्या परिचयाची आहे.

बालमोहन विद्यामंदिर या शाळेत मराठी माध्यमातून शिक्षण घेत असताना अभ्यासात आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ती नेहमीच पुढे असायची. कॉलेजमध्ये पण तिने अनेक स्पर्धामध्ये भाग घेतला होता. वक्तृत्व   स्पर्धेत तिने तिचा पहिल्या नंबरच बक्षीस कधीच सोडल नाही आणि डान्समध्येही तिने कायम पहिल्या, दुसऱ्या नंबरची ट्रॉफी मिळवली. प्रत्येक डान्स शो मध्ये तिच्या शिक्षकांना पूजा सावंत हवी असायची. मग ग्रुप गोळा करून डान्स बसवणे वगैरे, या सर्व गोष्टी पूजानं खूप एन्जॉय केल्या. तिने डान्सच कुठेही रितसर प्रशिक्षण घेतलेलं नाही. पण ती खूप छान डान्स करते, हे 'एका पेक्षा एक' मुळे सर्वाना कळलं. या क्षेत्रात ती कधी करिअर करू शकेल असं तिला वाटल नव्हत. पण हे सगळ करतानाच ती मिस श्रावण क्वीन झाली आणि या क्षेत्रात आली. स्मिता पाटील तिच्यासाठी आदर्श आहेत. त्यांनी ज्या भूमिका केल्या त्या गोल्डन झाल्या आहेत. मराठीत नवे चेहरे बघायला लोकांना आवडत आहेत. त्यामुळे मराठीत ग्लॅमर आणायचं काम या नवीन चेहर्‍यांनी करावं असं तिला वाटतं.  श्रावण क्वीन ते अभिनेत्री हा तिचा प्रवास आम्ही जाणून घेतला.
 
Pooja Sawant * तुला या क्षेत्रात यायची संधी कशी मिळाली?
- माझी पहिली ऑफर मला खूप Accidentaly मिळाली. मी श्रावण क्वीन या स्पर्धेत भाग घेतला होता. तिथे मला perform करायचं होत आणि साहजिकच मी Dance prepare करून गेले होते. पण नेमकी माझ्या performance च्या वेळेस लाईट गेले आणि  सचित पाटील यांनी मला विचारलं की तू नंतर परफॉर्म करते का? पण मी म्हटलं नाही सर, मी करते आता perform. आणि मला बीट्स काऊंट करून परफॉर्म कराव लागलं मी तिथे सिलेक्ट झाले. त्याच दिवशी मला सचित पाटील यांनी मला 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटाची ऑफर दिली आणि योगायोगाने मी श्रावण क्वीन सुद्धा झाले.

* तू आता पर्यंत केलेल्या चित्रपटाविषयी आम्हाला सांग ?
- श्रावण क्वीन झाल्यानंतर सगळ्यात पहिला चित्रपट मी जो केला तो एक कन्नड चित्रपट होता.
'ओलवे मंदारा' नावाचा. त्यानंतर 'क्षणभर विश्रांती' हा माझा मराठीतला पहिला चित्रपट. त्यापाठोपाठ 'आता गं बया', 'गणित', 'सतरंगी रे' आणि पाचवा चित्रपट जो मी केला तो 'झकास'. पण 'झकास' हा 'सतरंगी रे' च्या आधी प्रदर्शित झाला आणि गणित अजून प्रदर्शित व्हायचा आहे.

* आतापर्यंत काम केलेल्या चित्रपटातील सहकलाकार आणि दिग्दर्शकांबद्दल तू काय सांगशील ?
- दिग्दर्शकांबद्दल बोलायचं तर अंकुश, सचित, आदित्य अशा दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. ते फारसे अनुभवी नसले तरी हे सगळेच आपापल्या कामाबद्ल खूप अभ्यास करतात. ते सगळेच खूप focused आहेत.
सहकलाकार बद्दल बोलायचं तर संजय सरांबरोबर काम करताना मी Actually खूप घाबरले होते. कारण ते वयाने आणि अनुभवाने मला खूप सिनिअर आहेत. पण खूप छान वाटलं त्यांनी खूप सांभाळून घेतलं. आदिनाथ, सिद्धार्थ, भूषण, सौमील आणि अमृता आमची पूर्ण कलाकारांची टीम खूप मस्त जमली होती. या चित्रपटाच शुटिंग आणि कलाकार यांच्यावर एक पुस्तक लिहू शकते एवढी धमाल आम्ही केली. यांच्यासोबत काम करताना मला असं वाटलं कि आम्ही सगळे खूप वर्षा पूर्वीचे friends आहोत आणि खूप वर्षांनी भेटलो. या चित्रपटामुळे मला खूप चांगले मित्र मिळाले. या सगळ्यांना जराही ego अथवा attitude नाही.

* 'सतरंगी रे' या चित्रपटातील तुझी भूमिका काय आहे?
-या चित्रपटात मी जेनी नावाच्या एका ख्रिश्चन मुलीची भूमिका साकारात आहे. 'गुंज' नावाच्या बॅन्ड सोबत ती असते. ती काही instrument वगैरे play करत नाही. पण ग्रुपमधल्या एका मुलाची म्हणजे भूषण प्रधानची ती girlfriend आहे त्यामुळे ती त्या बॅन्ड चा एक पार्ट आहे. ती या सगळ्यांना सपोर्ट करत असते. त्यांना त्यांचा अभ्यास सांभाळून वेगवेगळ्या competitions मध्ये participate करण्यासाठी support करत असते. या चित्रपटात भूषण प्रधान सोबत एक वेगळा love track आहे. वेगळ काही तरी करताना, ख्रिश्चन मुलीची भूमिका साकारताना मला खूप मजा आली.

* तू आणि अमृता, तुम्ही दोघी आतापर्यंत दोन चित्रपटात एकत्र दिसल्या आहात. तर तुमच्या ट्युनिंग बद्दल काय सांगशील?
- मी आणि अमृता आम्ही 'झकास' आणि 'सतरंगी रे' या चित्रापटात एकत्र काम केले आहे. 'सतरंगी रे' मध्ये आमच रिलेशन खूपच फ्रेंडली आहे. आता सध्या आम्ही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकत्रच फिरत आहोत. खूप एन्जॉय करत आहोत. We take care of each other, there is no ego and attitude between me and Amruta.

* मल्टीस्टारर चित्रपटात प्रत्येक भूमिकेला न्याय मिळतो का ?
- सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर तुमचं casting बरोबर झालं, तर तुम्ही आर्धी लढाई जिंकलेली असते. प्रत्येक character च जर casting correct झालं तर ते character आपोआपच खुलत जात. या फिल्मच casting सगळच perfect आहे. सगळ्यांच काम खूप छान झालं आहे.

नक्कीच पूजा तुमचं सगळ्यांच काम पहायला आम्हाला आणि प्रेक्षकांना आवडेल. तुझ्या चित्रपटाला आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
 
 



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.