Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Saturday, February 11, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
Untitled Document
प्रसाद ओक
चेतना © मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम करिता
प्रसाद ओक. आपल्या सर्वांना परिचित असलेलं एक वलयांकित नाव. कारण प्रसादने या क्षेत्रातल एकही माधयम वगळलं नाही. जाहिरात, मलिका, चित्रपट, नाटक, दिग्दर्शन एवढचं काय तर त्याने 'झी मराठीचं' सेलिब्रिटी स्पेशल जिंकल आणि अजिंक्यतारा बनला. मागे त्याने 'हफ्ता बंद' मध्ये कविता सादर करुन माझ्यासारख्या कित्येक लोकांना एक धक्का दिला आणि त्याच्या चाहत्यांना तो आवडण्याच आणखी एक कारण. तो सूत्र संचालनात माहिर आहे हे तर वेगळ सांगयला नको.

पुण्याच्या भावे हायस्कूल व बी.एम्.सी.सी महाविद्यालयाचा तो विद्यार्थी. महाविद्यालयीन जीवनात त्याने अनेक एकांकिका दिग्दर्शित केल्या. या  चित्रपटसृष्टीत तो आला ते दिग्दर्शन करण्यासाठी. त्याने सुरुवातही केली होती. 'डॉ श्रीराम लागू आणि निळू फुले काम करत असलेल्या 'प्रेमाची गोष्ट' या नाटकासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले. नंतर श्रीरंग गोडबोलेंसोबत 'लाईन १'
साठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले पण ते रंगमंचावर आलंच नाही नंतर प्रसादला अभिनयाची ऑफर आली व त्याची अभिनयतली वाटचाल चालू राहिली पण दिग्दर्शक म्हणून नावलौकिक मिळवायचं त्याचं स्वप्न पूर्ण व्हायला तब्बल एका तपासून अधिक काळ जावा लागला ..... त्याच्या प्रवासाबद्दल त्याच्याकडूनच जाणून घेऊयात.
 
  • तुझा पहिला ब्रेक तुला कसा मिळाला?
    - माझी पहिली मालिका 'बंदिनी' ज्यामध्ये मी मृणाल कुलकर्णीसोबत काम केल होतं. हि मालिका मला शिरीष कुलकर्णीमुळे मिळाली. मी तेव्हा शिरीष सोबत 'आवर्त'साठी काम करत होतो. माझ पहिल नाटक 'अधांतर' आणि पहिला चित्रपट 'अष्टरुप वैभव लक्ष्मी माता'.
     
  • 'सारेगमप' मुळे तुझं गाणं लोकांसमोर आलं. . .  तुझा गाण्यात करिअर करायचा विचार आहे का?
    - मी 'दोघात तिसरा.. आता सगळ विसरा', 'जोशी की कांबळे' या चित्रपटात गाणं गायलो आहे. एका आगामी चित्रपटात सुद्धा मी गाणं गातो आहे. गाण्यात करिअर करायच की नाही हे अजून ठरलं नाही. सध्या हि कला मी एक छंद म्हणूनच जोपासतो आहे.  पण जर तशी गरज असेल आणि पुढे संधी मिळाली तर मी नक्कीच गाणं पुढे  चालू ठेवेन.
     
  • 'हाय काय .. नाय काय!' हा तू दिग्दर्शित पहिलाच चित्रपट . . . तुला आलेले अनुभव?
    - चित्रपटाच्या दिग्दर्शनापासून निर्मितीपर्यंत सर्वच प्रोसेस मी खूप एन्जॉय केली. मी ज्या गोष्टीसाठी या चित्रपटसृष्टीत आलो होतो. ते स्वप्न साकार व्हायला ह्या चित्रपटाच्या निमित्ताने सुरुवात झाली आहे. ह्या चित्रपटामुळे माझी दिग्दर्शनाची वाटचाल सुरु झाली आहे. कारण तब्बल १५-१७ वर्षांनी मला दिग्दर्शनाची संधी मिळाली.
     
  • तुला आम्ही विनोदी आणि नकारात्मक अशा दोन्ही भूमिका करताना पाहिलं आहे. पण तुला स्वतःला कोणत्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतात.
    - मला विनोदी भूमिका करायला आवडतात कारण मला लोकांना हसवायला फार आवडतं.
     
  • तू कविता सुद्धा करतोस . .  . हे खर आहे का?
    - हो, म्हणजे मला सूचलं तर मी लिहीतो. ए पण त्या कविता वगैरे नाही बरं का. म्हणजे मी लिहीतो पण त्यांना मी कविता नाही म्हणू शकत. मला लिहीण्याची इच्छा झाली तर मी नक्की लिहीतो.
     
  • तुला चित्रपटसृष्टीत येऊन १५-१७ वर्षे झाली पण तुला असं वाटतं का.. काहीतरी करायचं राहून गेलय?
    - हो खूप काही करायचं बाकी आहे अजून. दिग्दर्शक म्हणून स्वतःला या चित्रपटसृष्टीत एक ओळख निर्माण करुन द्यायची राहिली आहे अजून. मी जवळपास ८० मालिकांमध्ये काम केलं आणि तसेच चित्रपटही केले आहेत. अभिनय करत राहिल्यामुळे दिग्दर्शन करायच माझ स्वप्न राहून गेल. जे मला पूर्ण करायच आहे.
     
  • तुझ्या आगामी चित्रपटांबद्दल काय सांगशिल....
    - येत्या ३-४ महिन्यात माझे १० चित्रपट प्रदर्शित होतील. त्यातले तीन ऑगस्ट मध्ये प्रदर्शित होणार आहेत. यातल्या प्रत्येक चित्रपटात माझी भूमिका वेगळ्या प्रकारची आहे. 'जेता' मध्ये मी विलनच्या भूमिकेत आहे. 'ऐका दाजिबा' मध्ये मी गुजराती मुलाची भूमिका साकारतोय. आणि 'ती रात्र' हा एक थ्रिलर चित्रपट आहे आणि हो माझा आतापर्यंतची आवडती भूमिका असलेला हा चित्रपट आहे.
  • 


    मुख्यपृष्ठ
    I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
    ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
    Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
    Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
    © 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

    -: A Project by :-
    Honeybee Media
    Honeybee Media Pvt. Ltd.