|
|
"भैरु पैलवान की जय हो" या चित्रपटाच्या प्रकाशनानिमित्ताने दिग्दर्शक
प्रविण कारळे हे मराठी चित्रपटसृष्टीत २५ वर्षे पूर्ण करत आहेत. मुंबईच्या
एलाफिस्टन टेक्नीकल शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमधून पूर्ण
केले. परंतू त्यामधील काळात त्यांनी सुधा करमरकर यांच्या बालनाट्य संस्थेत खूप अनुभव घेतला.
वडिल लेखक - पत्रकार आसल्यामुळे नाट्य आणि सिनेमा क्षेत्राशी त्यांचा जवळचा
संबंध होता प्रविण कारळे यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या विभागात १७५ पुरस्कार
मिळविले आहेत.
|
 |
स्टेजबद्दल भरपूर अभ्यास केलेल्या प्रविण कारळे यांनी रंगभूमिवर वेगवेगळे
कलात्मक प्रयोग केले. यापैकी एक म्हणजे INT साठी त्यांनी ६० कलाकारांना
घेऊन सादर केलेले 'डिक्टेटर' हे नाटक, जो एक मुकप्रयोग होता. पण तरिही
प्रेक्षकांनी या नाटकाला भरपूर दाद दिली. बर्याचशा टेली फिल्म्सची निर्मिती
त्यांनी केली आहे त्यापैकी BCC च्या ही फिल्म्स आहेत. महेश भट्ट यांचे
सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले होते. २००१ साली ते झीटीव्ही वर सिनीअर
प्रोग्रामिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. 'भैरु पैलवान.....' शिवाय
त्यांनी हिंदीमध्ये सुधाकर बोकाडे यांचा 'हॅन्डस अप' हा चित्रपट पूर्ण केला
आहे. शिवाय त्यांचा 'बोकड' हा आगामी मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे, जो डिसेंबरपर्यंत प्रदर्शित होईल. |
|
प्रविण कारळे यांनी त्यांच्या अनुभवांबद्दल मराठीमुव्हीवर्ल्डशी केलेली
बातचीत. * 'भैरु पैलवान की जय हो!' हेच नाव का निवडले ?
- असे शिर्षक निवडण्यामागे एकच हेतू होता; तो म्हणजे ही घोषणा प्रोत्साहन
देणारी आहे खास करुन आजच्या युवकांना. मला अस वाटत होतं की त्याची आज गरज
आहे कारण कुस्तीच्या खेळामागे किती परीश्रम आणि श्रद्धा आवश्यक आहे. हे मला
सर्वांपर्यंत पोहोचवायचे होते.
* इतर व्यवसायिक मराठी चित्रपटांपेक्षा हा चित्रपट किती वेगळा आहे ?
- या चित्रपटात नक्कीच वेगळेपण जाणवेल अशी त्याची कथा व पटकथा विणली आहे.
प्रेक्षकांना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवण्याची ताकद
या चित्रपटात आहे.
* चित्रपटात सिद्धार्थचा प्रतिसाद कसा होता ?
- सिद्धार्थ हा आता एक परिपूर्ण कलाकार झाला आहे. त्याने या भूमिकेचा
स्विकार करुन म्हणूनच केला होता. सेटवर आम्ही त्याच्यासाठी एक जीम बनवून
दिली होती व त्याचा वापर त्याने स्वतःला घडविण्यात केला.
* 'भैरु...... 'चे मार्केटिंग तुम्ही कसे करत आहात?
- यासाठी सर्व मार्गांचा वापर आम्ही करत आहोत. ऑनलाईन पब्लिसिटीसुद्धा सुरु
केली आहे, खास करुन सध्याच्या युवकांचा विचार करुन जी नेहमी नेट चा वापर
करतात.
* हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार ?
- 'भैरु .....' पुणे आणि इतर महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरला तर मुंबईत ५
नोव्हेंबरला होईल.
|