राजीव पाटील मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध दिग्दर्शक ज्यांनी आपली कामगिरी एक अतिशय सुपरहिट अशा 'सावरखेड- एक गाव' आणि आणखी दोन चित्रपटांद्वारे दाखवून दिली आहे. कामातीलप्रामाणिकपणा, सातत्य, आणि श्रद्धा या सगळ्या गोष्टींमुळे मुक्ता आर्टसच्या 'सनई चौघडे' च्या दिग्दर्शनाची संधी मिळाली. या निमित्ताने आपले अनुभव सांगत आहेत 'राजीव पाटील'.
 |
'सनई चौघडे' चा एकूणच अनुभव कसा होता?
-
खूपच छान.. मी या पूर्वी तीन मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शन केले आहे. पण मी प्रत्येक चित्रपट नाविण्याने बनवतो. हा चित्रपट म्हनजे एक खूप छान टीमवर्क आहे. आमच सगळ्यांचच एकमेकांशी खूप छान ट्युनिंग जमल होत, संतोष, सुबोध सहित श्रेयस सगळ्यांनीच या चित्रपटासाठी खूप मेहनत केली. एक दिग्दर्शक म्हणून मी चित्रपट पूर्ण होई पर्यंत खूप मजा केली कारण या चित्रपटाच्या कथालेखनापासून पोस्ट प्रॉडक्शन पर्यंत मी चित्रपटाकडे माझा चित्रपट म्हणून पाहिले आणि तेवढीच मेहनत
सुद्धा केली.. खूप मजा आली.. माझ्या आयुष्यातले काही अविस्मरणीय क्षण आहेत .
|
|
तुम्ही भारतातल्या काही नावाजलेल्या निर्मिती संस्थापैकी एक असलेल्या अशा 'मुक्ता आर्ट्स प्रा. लि.' सोबत काम केले आहे. तुमचा अनुभव काय आहे.... इतरसंस्था आणि या संस्थेसोबत काम करताना काही फरक जाणवला का?
-
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा स्वतःवर विश्वास आहे. माझी क्षमता आहे म्हणून माझी निवड झाली, आणि त्यामुळे मला क्षमतेने काम करण गरजेच होत. पण अशा मोठ्या निर्मिती संस्थेसोबत काम करण्याचा अनुभव छान आहे. मला सुभाष घईंसोबत काम करण्याची संधी मिळाली. बजेट चांगल होत. तांत्रिक अडचणी नव्हत्या. तज्ञांचे मार्गदर्शन होत. एकूणच काम करण्यासाठी पोषक अस वातावरण होत त्यामुळे खूप मजा आली.
चित्रपट व्यवसायिक असला तरी त्यात सामाजिक घटक होते. दोन्ही बाजू कशा हाताळल्या?
-
एक छान करमणूक करणारा चित्रपट करण्याचा माझा उद्देश होता. आणि ते मनोरंजन फक्त काही ठराविक प्रकारच्या चित्रपटातूनच होऊ शकत अस मला वाटत नाही. सामाजिक विषय घेऊन सुद्धा मनोरंजन करता येऊ शकत. मी या चित्रपटात अगदी प्राथमिक गोष्टींपासून गुंतलो आहे. त्यामुळे मला या दोन्ही बाजू हाताळणकाही कठीण वाटले नाही. चित्रपट व्यवसायिक असल्याने तो ब-याच प्रेक्षकांपर्यंत पोहचेल. मला चित्रपटातून जे काही सांगायच आहे ते त्यांच्या पर्यंतपोहचेल आणि त्यात मांडलेल्या प्रश्नावर लोक विचार करतील त्यामुळे या चित्रपटाचा प्रभाव वेगळा असेल.
चित्रपट बनवताना तुमचे विचार काय होते?
-
ग्लोबलायजेशनमुळे सामान्य माणसाचे सुद्धा आयुष्य बदलले आहे. मी एका छोट्या गावात होतो आणि आता मुंबईसारख्या शहरात मी आहे. मी हे बदल जवळून अनुभवले आहेत. लग्न, संबंध, राहणीमान, विचार सगळ काही लवकर बदलत आहे. लग्नाची पद्धत, स्त्रीचे महत्त्व, स्त्रीत्वाची व्याख्या बदलते आहे. मोठी शहरे तरसोडाच पण सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद अशा शहरात सुद्धा बरेच बदल झालेत. मुलींचे शरीर संबंधांबद्द्लची मत बदलायला लागली आहेत. एक निरिक्षक म्हणून मला या गोष्टी सगळ्यांसमोर मांडून मला त्यांना विचार करायला लावायच होत. आणि मला वाटतय मी ते केलं आहे.
श्रेयसची काय मदत झाली या चित्रपटासाठी?
-
तो या चित्रपटाच्या बाबतीत खूपच चिंतीत होता. आम्हाला सगळ्यांना एकत्र आणणारा तो होता. त्याची शुटिंगच्या वेळेस काहीच मदत झाली नाही. पण प्री-प्रॉडक्शन पासून पोस्ट प्रॉड्क्शन, लोकेशन पाहण्यापासून मिक्सिंग या सगळ्या गोष्टीत त्याची फार मदत झाली आणि सगळ सोप झालं. आणि सध्या तो प्रत्येक शहरातल्या प्रत्येक शो वर त्यातल्या कलेकशन सोबतच लोकांच्या प्रतिक्रियांवर जास्त लक्ष ठेऊन आहे
यानंतर काही नवीन चित्रपट?
-
सप्टेंबर पर्यंत माझे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. आणखी काही चित्रपटांसाठी काम चालू आहे. सनई चौघडेला मिळणा-या प्रतिसादावरून माझ्याकडे आणखी खूप नवीन विषय येत आहेत. पण आधी सारखच मी चांगले विषय पाहूनच निवड करेन.
|