 |
चेतना: तुमचा छायाचित्रकारापासून दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास कसा राहिला?
संजयः तंत्रज्ञ म्हणून काम पाहणाया प्रत्येकाच स्वप्न असत एक पाऊल पुढं जाण्याच
तसच माझ होतं म्हणजे कॅमेरा हाताळतानाच दिग्दर्शक व्हायच मी ठरवल होत. एक चांगली कथा डोक्यात होती 'चेकमेट' च नाव साजेस असलेली...
चेकमेट कसा दिसेल याची कल्पना एकदम स्पष्ट होती. चेकमेट मध्ये स्टाईल होती रिचनेस होता. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि छायाचित्रण ह्या सगळ्या बाजू माझ्याकडे असल्याने चेकमेट बनवताना खूप मजा आली. म्हणजे मी दिग्दर्शकम्हणून समाधानी आहे चेकमेट बनवल्यानंतर. |
चेतना: छायाचित्रणाचा दिग्दर्शक म्हणून काही उपयोग झाला का? कुणाकुणाची मदत झाली?
संजयः दिग्दर्शन करताना छायाचित्रणाची खूप मदत झाली म्हणजे चेकमेट साठी वापरलेले स्पेशल इफेक्ट्स, कॅमेरा अँगल.... सगळ काही परफेक्ट होत...
हे सगळ करताना सगळ्यात जास्त मदत झाली ती हर्षदा खानविलकरची. आणि चेकमेट मधल्या प्रत्येक कलाकाराची, तंत्रज्ञापासून निर्मात्यांपर्यंत सगळयांनी खरच खूप मेहनत घेतली. मी टिम वर्क काय असत ते अनुभवल .
चेतना: 'चेकमेट' साठी दिग्दर्शक म्हणून काम करताना आलेले अनुभव...
संजयः 'चेकमेट' ची कथा जरा वेगळ्या पद्धतीने मांडायची होती. ही एक रहस्यमय कथा म्हणजे चित्रपटाचा नायक म्हणजे रामाचा अवतार आहे अस मला दाखवायच नव्हतं म्हणजे रावण नायक असू शकतो म्हणजे नायकच जर खलनायक असेल तर काय होईल ? चित्रपटातला प्रत्येक जण जर खलनायक असेल तर कायहोईल ? यातून काय निर्माण होईल. प्रत्येक जण प्रत्येकाचा मित्रही आहे आणि शत्रूही अशा वेळेस काय होईल? 'चेकमेट' ही हा सगळा गोंधळ सोडवतानाआकाराला आलेली कलाकृती आहे
चेतना: 'चेकमेट'ची कथा तुमचीच... मग त्यातल्या व्यक्तीरेखेला न्याय देणारे कलाकार कसे निवडले?
संजयः 'चेकमेट' स्क्रिप्ट जेव्हा मी लिहिली तेव्हा त्यातली एक गंमत म्हणजे मी ती लिहिताना त्यात व्यक्तिरेखेची नाव न टाकता परस्पर त्यात कलाकारांची नावलिहिली होती.. म्हणजे हा अंकुश हा असा, तो स्वप्नील, हे त्यांचे संवाद, त्यांची स्टाईल.....मला ह्या व्यक्तीरेखेसाठी हाच कलाकार हवा हे आधीच ठरवल होत. तेकलाकार मिळाले. आणि याचा एकत्रित परिणाम म्हणजे 'चेकमेट'... ज्याची सुरुवात विसरायची नाही आणि शेवट सांगायचा नाही.
चेतना: सध्या काय चालू आहे?
संजयः सध्या मी ' धुडगुस' नावाच्या एका मराठी चित्रपटासाठी छायाचित्रण करतोय... यु टि.व्ही. चा 'मुंबई मेरी जान' आणि बालाजी मोशनसचा 'सी- कंपनी' ह्याचित्रपटासाठी छायाचित्रणाच काम करतोय. 'धुडगुस' या चित्रपटाची खासियत म्हणजे हा मराठीतील मल्टीस्टारार बिग बजेट चित्रपट आहे. यात जवळ जवळ सगळेच कलाकार बिना मेकअप आहेत. लाईट्स खूप कमी वापरले आहेत. नैसर्गिक प्रकाशाचा वापर करूनच सर्व शुटिंग करण्यात आल आहे. कोल्हापूरमधेच शुटिंग झालं आहे.