पिंजरा - माझ्या १८व्या वाढदिवसाच बेस्ट गिफ्ट- संस्कृती बालगुडे.
तुझ्या आतापर्यंतच्या वाटचाली बद्दल सांग.
- मी पुण्याच्या सिम्बॉसिस सेकंडरी स्कूल मध्ये होते. वयाच्या सातव्या वर्षापासून
मी भारतनाट्यम शिकत आहे. (पुण्यातील गांधर्व महाविद्यालयातून) भरत नाट्यमच्या चार
परिक्षा दिल्या आहेत. १२वी पासून मी वेस्टर्नसुद्धा शिकत आहे. त्यानंतर मी काही
डान्स शो केले. अरंगेत्रम केलं, कॉलेजच्या बऱ्याच स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. तसेच
मी स्वित्झर्लंड, मॉरिशिअस आणि फ्रान्स इथे डान्स शो केले. आणि सध्या मी पुण्याचा
स.प. महाविद्यालायत (S .P . कॉलेजमध्ये) सेकंड ईयरला शिकत आहे.
डान्सिंग करता करता अभिनयाकडे कशी वळलीस?
- मी 11th मध्ये असताना माझे सिनिअर मृण्मयी देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर यांना बघत आहे.
मृण्मयी ताई आणि सिद्धार्थ यांना मी माझे सिनिअर म्हणूनच बघते. त्या दोघांकडे बघून मला अभिनयात इंटरेस्ट
येऊ लागला आणि असं वाटायला लागलं होते की आपल्याला हे जमू शकत. त्यामुळे मी ११वी मध्ये असल्या
पासून अभिनयाच्या संधीसाठी ऑडिशन्स देत होते. आणि डान्सचा बेस होताच.
|
 |
पिंजरा मधली आनंदी साकारण्याची संधी डान्सिंग स्किल मुळेच मिळाली का?
- हो. फर्स्ट इयर मध्ये असताना मला पिंजराची ऑडिशन आहे. असं कळल आणि त्यांना या
भूमिकेसाठी डान्सर मुलगीच हवी आहे. मी ती ऑडिशन दिली. त्यामुळे माझ्या डान्सिंग
स्किल मुळे मला पिंजारातली आनंदी साकारायला मिळाली असं म्हणता येईल.
पिंजरा च्या टीममधल्या इतर कलाकारासोबत तुझ ट्युनिंग कस आहे?
-
माझ ट्युनिंग ग्रेट आहे. या मालिकेला १७ जानेवारीला एक वर्ष पूर्ण होणार आहे. पण
हे एक वर्ष कस गेलं ते कळलच नाही. मागच्या वर्षी १९ डिसेंबरला जेव्हा मी
१८ वर्षाची होणार होते. त्याच्या आदल्या दिवशीच मला
माझ्या पहिल्या मालिकेचं कन्फर्मेशन मिळाल होत. ते माझ्या १८व्या वाढदिवसाच बेस्ट
बर्थडे गिफ्ट होत. त्यासाठी झी मराठी, पिंजरा, आणि इतर कलाकार ज्यांनी मला |
अभिनय
शिकवला यांची मी आभारी आहे. मला अभिनयाचा 'अ' सुद्धा येत नव्हता. मला आज ज्या
कॉम्प्लिमेंट्स मिळतात की माझ काम बर होतंय किवा चांगल होतंय त्याच सर्व श्रेय
माझ्या टीममधल्या कलाकारांना जात.
आनंदी बद्दल काय सांगशील? आणि संस्कृती कशी आहे.
आनंदी स्वभावाने अत्यंत गोड आहे. म्हणजे ती अतीच चांगली आहे. ती चांगुलपणा वाया जातो
किवा धोका असतो असं म्हणतात. तिला कळत नाही
कोणाशी कस वागायचं लोक तिच्याशी कसेही
वागले तरी ती सगळ्यांशी चांगलीच वागत राहते. आनंदी डान्स बद्दल अत्यंत पॅशनेट आहे.
ती व प्रेमळ आणि केअरिंग आहे. खूप सॉफ्ट आहे. संस्कृती म्हणजे मी सुद्धा डान्स बद्दल खूप पॅशनेट आहे. मी सुद्धा लविंग आणि
केरिंग आहे. आनंदी खूप लाजाळू आहे. मी सुद्धा थोडीफार म्हणजे थोड्याफार प्रमाणात लाजाळू
आहे. आनंदिपेक्षा जरा कमी लाजाळू आहे. आनंदी जरा जास्तच आहे.
झी फॅमिली ऍवॉर्ड मध्ये पिंजराला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल काय सांगशील?
मला खूप अभिमान आहे माझ्या सिरीअलचा. सर्वात जास्त नामांकन आणि सर्वात जास्त म्हणजे
७ पुरस्कार ज्याला मिळाले. कारण पिंजराची सगळी भट्टी उत्त्तम जमून आली आहे. उत्तम दिग्दर्शक,
उत्तम कलाकार, उत्तम काम करणारे तंत्रज्ञ. आमच्या प्रॉडक्शन मॅनेजरपासून कॉश्च्युम
आणि हेअर डिझायनर पर्यंत पूर्ण टीमच चांगली आहे. आमचं हार्ड वर्क सगळ्यांना दिसून
आलं. आणि लोकांच प्रेम. लोक इतका प्रतिसाद देतात. इतके इन्व्हॉल्व होऊन बघतात. हि
माझी पदार्पणाची मालिका आहे आणि त्याला इतका चांगला प्रतिसाद म्हणजे it was
great mument for me.
मालिकचे या निर्माते आणि दिग्दर्शाकांबद्द्ल काय सांगशील?
राकेश सारंग हे अत्यंत स्ट्रिक्ट आहेत. म्हणजे मला त्यांची भीती वाटते. ते सेटवर आले
तर मी त्यांच्या समोरही जात नाही. तसे ते स्वभावाने गोड आहेत. म्हणजे सेटवर आल्यावर
विचारपूस करतात. मला सगळे असं लहान लहान समजतात. i respect my produucer .
he is a great cameraman & director. आणि आमचे दिग्दर्शक गिरीश वसईकर. म्हणजे मी जी आनंदी आहे जी लोकांना
स्क्रीनवर दिसते हि फक्त त्यांचामुळे. he is the best director एवर. म्हणजे
गिरीश वसईकर is one of the best director from the industry . त्यांनी खूप
patiently आम्हाला. handle केलं. वीर आणि आनंदाची केमिस्ट्री आहे ती फक्त गिरीश
वसईकर सरांमुळेच आहे. एवढेच मी सांगेन.
डान्स आणि अभिनयापैकी काय करायला आवडतं?
सध्या माझा आणि आनंदीचा आमच्या दोघांचाही Dance मागे पडला आहे. मला Dance चे जेवढे
कार्यक्रम करता येतील तेवढे मी करत असते. डान्स माझी भूक आहे. अभिनय थोडा नंतर आहे.
त्यामुळे मी डान्सला जास्त महत्व देत्ते आणि अभिनय सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे.
पिंजरा व्यतिरिक्त अजून काय करत आहेस का?
मला बऱ्याच चित्रपटांची ऑफर आली होती. पण पिंजऱ्याच्या block dates इतक्या आहेत कि
मला dates च देता येत नाही. त्यामुळे सध्या तरी मी पिंजराच करत आहे.
धन्यवाद संस्कृती. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉमच्या खूप खूप
शुभेच्छा.
|