 |
'इक्बाल' या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड्मध्ये प्रवेश करणा-या आणि 'ओम शांती ओम' या चित्रपटातून शाहरूख खान सोबत महत्त्वाची भूमिका बजावणा-या पप्पूमास्टरला आज मराठी माणसासोबतच अख्ख बॉलिवूड ओळखतय. नाटक , जाहिराती, मालिका, मराठी चित्रपट, आणि बॉलिवूड मध्ये अभिनयाची छाप पाडल्यानंतर श्रेयस तळपदे आपल्या चाहत्यांसाठी सुभाष घईंच्या
'मुक्ता आर्ट्स प्रा. लि.' या बॅनरखाली आपली पत्नी दिप्ती तळपदे हिचीनिर्मिती असलेला 'सनई चौघडे' हा चकचकीत मराठी चित्रपट घेऊन येतोय त्यानिमित्त श्रेयससोबत मारलेल्या गप्पा.
निशा: निर्माता म्हणून तुझा काय अनुभव आहे?
श्रेयस: अनुभव खूपच छान. मी आणि दिप्तीने या चित्रपटासाठी खूपच कष्ट घेतलेत. निर्मात्याच्या खूपच जवाबदा-या असतात. अभिनय आणि निर्मिती या गोष्टींमध्ये |
|
खूपच फरक आहे. कलाकारांना काय करायच असत फक्त सेट वर येऊन ड्रेस अप करून शॉट द्यायचा असतो. पण निर्मात्याला प्री-प्रॉडक्शन पासून पोस्टप्रॉडक्शन, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची प्रतिक्रिया या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची असते.
निशा: हिंदी चित्रपट निर्मिती हि मराठी चित्रपट निर्मिती पेक्षा वेगळी असते का?
श्रेयस: मला निर्मिती सूत्रांमध्ये काही फारसा फरक जाणवत नाही पण एक खूप मोठा जाणवण्यासारखा फरक आहे तो म्हणजे चित्रपटाच बजेट. हिंदी चित्रपट निर्माते चित्रपट निर्मितीसाठी खूप पैसे गुंतवतात. आम्ही 'सनई चौघडे' सुद्धा तसा बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही चित्रपट बनवताना कोणत्याही प्रकारचीतडजोड केलेली नाही. चित्रपटातील लोकेशन्स, कलाकारांची वेशभूषा, चित्रपटातील गाणी सगळ काही अतिशय उत्तम दर्जाचं आहे. जेव्हा एखादी महाराष्ट्रीयन नसलेली व्यक्तीमला जेव्हा अस म्हणते की त्यांना माझा चित्रपट आवडला तेव्हा मला खूप आनंद होतो.
निशा: दिप्ती सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
श्रेयस:तिच्या सोबत काम करताना खूप छान अनुभव आला. तिने सेटवर खूप मदत केली. मी जेव्हा जेव्हा माझ्या दुस-या चित्रपटाच्या शुटिंगसाठी व्यस्त असायचो तेव्हा तिने सेट वरच्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित सांभाळल्या. तिने प्रत्येक गोष्टीकडे प्रेक्षकांच्या दृष्टीकोनातून पाहिले आणि मला त्यांच्यात सुधारणा करायला सांगितली.
निशा: नवोदितांबद्दल, त्यांच्या कामगिरीबद्दल तुला काय वाटते?
श्रेयस:मी स्क्रिप्टला साजेसे असेच कलाकार निवडले आहेत. मला सगळे नावाजलेले कलाकारच हवे होते असं काही नव्हतं. सई च्या रोलसाठी सई ताम्हणकरलाआम्ही ६ वेळा ऑडिशनसाठी बोलवल आणि मग तिची निवड केली. मला लोकांनी फक्त टि.व्ही. वर पाहिलेल असताना, माझी स्वतःची ओळख नसताना सुद्धा नागेशने मला त्याच्या 'इक्बाल' या चित्रपटाच्या टायटल आणि अतिशय महत्त्वाच्या अशा व्यक्तिरेखेसाठी निवडले होते. 'आदित्य' च्या
भुमिकेसाठी संतोष जुवेकर आणि 'राहुल बोरगावकर' च्या भुमिकेसाठी आपला सुबोध भावे एकदम परफेक्ट होते. सुबोध भावे सोबत मी आधी काम केले आहे.आणि एक अभिनेता म्हणून तो मला आवडतो. People tend to have pre
conceived notions of an ideal son, father or even mother in law hence we found a new face for the role of daughter in law... |
निशा: दिग्दर्शनाची जवाबदारी राजीव पाटील यांना देण्याचे काही खास कारण ?
श्रेयस: मी अस करण्याची दोन कारणे होती. मी त्यांच्या सोबत माझा 'सावरखेड एक गाव' नावाचा चित्रपट करत होतो तेव्हा मी त्याला चेष्टेतच म्हणालो होतो कि 'एक दिवस जेव्हा मी चित्रपट निर्मिती करेन तेव्हा त्याच दिग्दर्शन मी तुझ्याकडूनच करून घेईन.' आणि दुसर म्हणजे मी त्याला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करताना पाहिल होत. लोकांकडून त्याला हवं तस काम करून घेण्याची क्षमता त्याच्यात आहे. तो खूप वैचारिक आहे, माझ्याच वयाचा आहे आणि त्यामुळे आम्हाला काही गोष्टी खूप सोप्या होत्या. एखादी गोष्ट आवडण, एखादी नाकारण यात एकमत व्हायचं.
निशा: सुभाष घईंसोबत तुझे संबंध कसे आहेत?
श्रेयस: सुभाष घई खूप वेगळ व्यक्तिमत्व आहे. मी त्यांच्या सोबत साडे तीन वर्षांपेक्षा जास्त वेळ काम केलय. त्यामुळे इतक्या वर्षांनी व्यवसायिक संबंधांपेक्षा वैयक्तिक त्यापेक्षा मैत्रिचे संबंध खूप जुळून आले आहेत. आम्ही कार्यक्रमांना एकत्र असतो. त्यांचा आणि माझ नात खूप छान आहे पण जेव्हा आम्ही सेट्वर असतो तेव्हा आम्ही पूर्णपणे व्यवसायिकच असतो.
|