Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Sunday, February 05, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
Untitled Document
श्वेता शिंदे
चेतना © मराठीमुव्हीवर्ल्ड साठी
सध्या ई टिव्ही वरील 'काटा रुते कुणाला' या मालिकेने तिला प्रत्येक मराठी माणसाच्या घरात आणि मनात पोहचवल. जिच 'प्रेम' नाम है मेरा प्रेम चोप्रा हे नाटक उत्तम प्रतिसादात सुरू आहे. नाटक व मालिका यात अडकून न बसता तिने चित्रपटातूनही भूमिका केल्या आहेत अशा श्वेताशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा...
shweta Shinde
  • या क्षेत्रात तुला कितपत स्ट्रगल कराव लागल?
    - मला संधी मिळवण्यासाठी तरी या क्षेत्रात फारस स्ट्रगल कराव लागल नाही. पण या क्षेत्रात माझ्या येण्याला माझ्या घरच्यांचा फार विरोध होता. मी मुळची सातार्‍याची. शिक्षणासाठी मुंबईत आलेली. महाविद्यालयात शिकत असतानाच मला प्रोफेशनल रॅम्प शो आणि सिरीअल्स च्या ऑफर्स येत होत्या आणि मी तेव्हा त्या ओफर्स स्विकारुन माझ्या करिअरची वाटचाल चालू ठेवली. तरी घरच्यांचा विरोध होताच. घरतली फक्त एकच व्यक्ती माझ्या बाजूने होती. ती म्हणजे माझी आई. मला असं वाटतं की जोपर्यंत एका अभिनेत्याच्या बायकोला वाटत नाही कि तो अभिनेता व्हावा तो पर्यंत तो नाही होऊ शकत. तसच जोपर्यंत एखाद्या नटीच्या आईला वाटत नाही की आपल्या मुलीने अभिनेत्री व्हाव तोपर्यंत ते शक्य नसतं. आणि माझ्या आईला ते वाटल्यामुळेच मी आज ह्या इंडस्ट्रीत आहे. आणि लग्नानंतर संदीप व त्याची फॅमिलीने मला खूप सपोर्ट केला.


  • संदीपची आणि तुझी ओळख कशी झाली?
    - आम्ही दोघ 'बी. आर. फिल्म्स'ची सिरीअल करत होतो 'अपराधी कौन'. त्यावेळी आमची ओळख झाली. व दीड वर्षापूर्वी आमचं लग्न झालं.

  • 'प्रेम' नाम है मेरा.. प्रेम चोप्रा' मधल्या भूमिकेसाठी तुझी निवड कशी झाली?
    - एकदा संजय माझ्या घरी आले होते. आणि असचं त्यांनी मला ते स्क्रिप्ट वाचायला दिलं. मला ते स्क्रिप्ट आवडलं. पण तेव्हा मी काही मालिकासुद्धा करत असल्याने माझ्याकडे डेट्स अवैलेबल नव्हत्या. नंतर 'मनोमिलन' नाटक करत होते. दरम्यान जितूची पण निवड झाली व फायनली 'मनोमिलन' संपल्यानंतर म्हणजे जवळ जवळ दीड वर्षाने  'प्रेम' नाम है मेरा.. प्रेम चोप्रा' हे नाटक रंगमंचावर आलं.

  • संजय मोनेंसोबत आणि जितू सोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता?
    - फॅनटॅस्टीक. मला खूप आनंद होतो की संजय दादा माझ्यासाठी नाटक सुरू करायचे थांबले. ते मला म्हणाले "श्वेता तुला जेव्हा वेळ असेल, जेव्हा तू हो म्हणशील तेव्हा आपण हे नाटक करायचं. आणि जितूबद्दल सांगायच तर He is a nice co-artist.

  • राष्ट्रपती भवन मध्ये परफॉर्म करताना तुला कस वाटलं?
    - खूपच छान. म्हणजे राष्ट्रपती भवनात परफॉर्म करायची संधी हीच एक खूप मोठी exitement होती पण त्या स्टेज्वर पाऊल ठेवल्यानंतर त्याच महत्त्व आम्हाला कळल.  It was a royal. तिथलं एक विशेष म्हणजे तिथला प्रेक्षकवर्ग हा uniform  मध्ये होता. प्रतिभाताईंसमोर परफॉर्म केल्याची feelingच वेगळी आहे. आम्हाला तिथे खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा adjust करावं लागल. तिथे एकदा आत गेल्यावर बाहेर जाण allowed नव्हतं. आम्ही तिथे प्रतिभाताईंसोबत चहा घेतला. तिथल्या सर्व कपबशीवर अशोक स्तंभ आहे. आयुष्यातला एक अविस्मरणीय दिवस होता तो.
     
  • कॅमेर्‍यापलिकडच्या श्वेताचे वर्णन तू कसे करशील?
    -
    स्क्रीनवर मला वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात. मी आधी निगेटीव्ह भूमिका केल्या त्या भूमिका मला कंटाळवाण्या झाल्या मी त्या भूमिका करण बंद केल्या. 'काटा रुते कुणाला' या मालिकेत मी लांब केस असलेली एक घरंदाज मुलगी रंगवली आहे. जी थोडी भावनिक आहे. 'परिवार' ही माझी शेवटची मालिका ज्यात मी 'मेघना' ही विनोदी भूमिका रंगवली होती. आणि या भूमिकेसाठी मला नामांकन होत. मला निगेटीव्ह आणि विनोदी अशा दोन्ही भूमिकांसाठी नामांकन मिळाली आहेत. पुरस्काराची वाट बघतेय...

    खरी श्वेता...........मी खूप workoholic आहे. मी कधीच कामाच्या बाबतीत compramise करत नाही. मी खूप मुडी आहे. मला जर एखादी गोष्ट नाही पटली तर मी ती नाही करत. मला लोकांना गिफ्ट्स द्यायला फार आवडतात. मी खूप बिनधास्त आहे. मला स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला आवडतात.
     
  • भविष्यात तू स्वत:ला कुठे पाहतेस?
    - एक यशस्वी अभिनेत्री. म्हणजे मी जेव्हा मरेन तेव्हा प्रत्येक घरात, घरातल्या प्रत्येकाच्या मनात एक सेकंद तरी हळहळ निर्माण होईल. ती बातमी प्रत्येक वृत्तपत्र आणि प्रत्येक चॅनेलवर झळकेल व तेव्हा लोक म्हणतील अरे ही खरच खूप छान अभिनेत्री होती.

  • 


    मुख्यपृष्ठ
    I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
    ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
    Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
    Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
    © 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

    -: A Project by :-
    Honeybee Media
    Honeybee Media Pvt. Ltd.