काही कलाकार आपल्याला मिळालेल्या संधीच सोनं
करतात आणि स्वतःला सिद्ध करतात. स्मिता ही एक अशीच कष्टाळू आणि मिळेल ती
भूमिका आव्हान म्हणून स्विकारणारी अभिनेत्री आहे. तिने मालिका आणि
चित्रपटात काही ताकदीच्या भूमिका निभावून तिची कारकिर्द सुरु केली आहे. आणि
आता अमोल पालेकर दिग्दर्शित 'धूसर' आणि राजीव पाटील दिग्दर्शित 'पांगिरा'
असे तिचे दोन चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहे. त्यानिमित्त
मराठीमुव्हीवर्ल्डने स्मिताकडून तिच्या या एकूण प्रवासाबद्दल अधिक जाणून घेतलं...
|
 |
* तुला इंडस्ट्रीत येऊन ३-४ वर्षे झाली... तुझा या ४ वर्षांचा प्रवास कसा
आहे?
- माझं मूळगाव सातारा. वास्तव्य पुण्यातलं. मुंबईत आल्यानंतर प्रत्येक नवीन
कामाचा उत्साह होता. माझ्या घरच्यांना या क्षेत्राबद्दल काहीही माहित नव्हतं
आणि अजूनही माहित नाही. पण त्यांचा मला विरोध नाही. त्यांचा खूप सपोर्ट आहे.
इथपर्यंतचा प्रवास खूप छान आहे. 'अनुबंध' मधली 'किट्टी' असू दे किंवा जोगवा
मधली भूमिका असू दे मी ती खूप प्रामाणिकपणे निभवली आहे. काही जणांना माहित
नाही की मी जोगवा चित्रपटाच्या नृत्य दिग्दर्शनातसुद्धा सहभागी होते. |
* तुला असं वाटतं का की तू सेटल झाली आहेस? कि तू स्वत:ला स्ट्रगलर
समजतेस....?
- मला असं वाटतं की सुरुवातीला जो पर्यंत काही काम मिळत नव्हतं तो पर्यंत
सगळेच स्ट्रगलर असतात. पण जेव्हा तुम्ही सतत काही ना काही तरी काम करता
त्यात प्रामाणिकपणा दाखवता आणि जेव्हा लोक तुम्हाला तुमच्या कामाने ओळखू
लागतात तेव्हा तुमचा जम बसला आहे असं म्हणनं योग्य आहे..
* तू अमोल पालेकरांच्या 'धूसर' या चित्रपटात दिसणार आहेस... या
चित्रपटासाठी तुझी निवड कशी झाली?
- मी त्या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेले होते. माझी निवड त्या चित्रपटातल्या
एका छोट्याशा पण वेगळ्या भूमिकेसाठी झालं होती. पण नंतर माझी निवड एका
महत्त्वाच्या भूमिकेसाठी झाल्यानं मी खूप खुष आहे.
* या चित्रपटात तुझी काय भूमिका आहे?
- हा चित्रपट एका थोडा भावनिक आहे .... याची कथा एका आजारावर आधारीत आहे.
यात मी एका अशा मुलीची भूमिका साकारतेय जी
अडीच वर्षांनी आपल्या आईला भेटते.
पण या अडीच वर्षात परिस्थिती खूप बदललेली असते . या परिस्थितीचं चित्रणं या
चित्रपटात करण्यात आलं आहे. या चित्रपटात रिमाजी, उपेंद्र लिमये, ज्योती
सुभाष, अमृता खानविलकर यांच्यासुद्धा भूमिका आहेत.
*अमोल पालेकरांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
- अमोल पालेकर हे एक नावाजलेले दिग्दर्शक आहेत. अभिनेता आहेत. त्यांची
स्वतःची एक शैली आहे. कामाची पद्धत आहे. त्यांच्या सोबत काम करताना खूप
उत्सुकता होती. अशा दिग्दर्शकाकडे काम करताना खूप जवाबदारी होती. त्यांच्या
चित्रपटांचे विषय नेहमीच वेगळे असतात. त्यांनी ज्या अपेक्षेने माझी निवड
केली होती मी त्या भूमिकेला १००% न्याय दिला असं मला वाटतं, आता बाकी सगळं
प्रेक्षकचं ठरवतील.
|