'श्वास', 'पछाडलेला', 'सरिवर सर' या सुपरहिट चित्रपटांनंतर मराठी चित्रपटाला चांगले दिवस आले आहेत. थोडाफार पैसा आणि प्रसिद्धी या दोन गोष्टी मिळवण्यासाठी आजकालची तरुण पिढी या क्षेत्राकडे आकर्षित होताना दिसते. आपल्या पदार्पणातच 'झी गौरव'चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' चा पुरस्कार मिळवणारी 'बकुळा नामदेव घोटाळे'या चित्रपटातली सोनाली कुलकर्णी ही याच एक उत्तम उदाहरण आहे.
|
 |
* 'झी गौरव' पुरस्कार मिळाल्यानंतर तुझी प्रतिक्रिया काय होती?
- मला या पुरस्काराने आश्चर्याचा धक्का दिला. प्रतिक्षा लोणकर आणि अश्विनी भावेंसारख्या अभिनेत्रींना नामांकन असताना मला वाटल नव्हत हा पुरस्कार मला मिळेल. पण माझ्या पहिल्या वहिल्या चित्रपटासाठी नामांकन मिळाल हि गोष्ट सुद्धा माझ्यासाठी भरपूर होती.मी तिथे फक्त त्या सोहळ्याचा आनंद घ्यायला गेले होते.पणं माझ नाव ऐकल्यानंतर माझा विश्वासच बसला नाही. ही माझ्यासाठी खरच खूप आश्चर्याची गोष्ट होती. म्हणजे यश खूप लवकर मिळाल्यासारख वाटत होत. पण मी खूप मेहनत घेतली यासाठी. या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेणं माझ्यासारख्या मुलीसाठी खरचं खूप अवघड गोष्ट आहे ते पण कोणतीही फॅमिली बॅकग्रॉऊंड नसताना. पण माझा माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता, खूप कष्ट केल्यानंतर ४-५ वर्षांनंतर माझे तारे बदलल्यासारखे वाटत आहेत.
* म्हणजे हे यश मिळवण्यासाठी तू खूप कष्ट केले तर.... |
|
- हो, मी ५वीत असल्यापासून नृत्य करते, मी ९वीत असताना मला एफ.टी.आय्.आय च्या एका शॉर्टफिल्ममध्ये अभिनय करण्याची संधी मला मिळाली. त्यानंतर सुद्धा मी बरीच गोंधळलेली होते कि मी अभिनय क्षेत्रात करिअर करायच की नाही?..... १०वीत असताना मे एका 'मे क्वीन' नावाच्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला होता. तरी मी इतकी सिरिअस नव्हते. मी रनर अप होते त्या कॉन्टेस्टची ५ सबटायटल्स सह... आणि या गोष्टीने माझा आत्मविश्वास वाढला आणि मी या क्षेत्रात करिअर करायच ठरवल. त्यामुळे मी फर्ग्युसन महाविद्यालयातून १२वी पूर्ण केल्यानंतर मास कम्युनिकेशन करण्याचा निर्णय घेतला.
निर्णय घेण जेवढ सोप होत तिथून पुढचा प्रवास तितकाच अवघड होता कारण मला या सृष्टीत कोणीच गॉड्फादर नव्हत आणि कोणाची ओळख सुद्धा नव्हती. सुरुवातीला मी संपूर्न भारतात ऑडिशन द्यायचे.
* तुला 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटात भूमिका कशी मिळाली?
- खर तर by luck! अंकुश चौधरीने मला 'साडे माडे तीन'च्या ऑडिशनसाठी बोलावले होते..पण काही कारणास्तव ती रद्द झाली. मी पुण्याला परत येत असताना, अंकुशचा मला फोन आला आणि तो मला म्हणाला "केदार शिंदे त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी नवीन चेहरा शोधतोय. जर तुला त्याला भेटायच असेल तर मी त्याच्याशी बोलतो". मी संधीच्या शोधात असल्याने मी केदार शिंदेला भेटले. आर्.के स्टुडिओच्या समोरच रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशात माझ ऑडिशन झालं. आणि त्यानंतरच केदारने मला बकुळाच्या भुमिकेची ऑफर दिली.
* तुझ्या करिअरच्या सुरुवातीलाच तुला भरत जाधव, केदार शिंदे आणि मकरंद अनासपुरे यांसारख्या मराठी चित्रपट सृष्टीतल्या स्टार मंडळींसोबत काम करायला मिळाल. तुझा अनुभव कसा होता?
- अविस्मरणीय्.....मला त्यांच्याकऊन खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. भरत्त जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांची खूप मदत झाली. मी माझ्या पहिल्या शॉटच्या वेळी खूप नर्व्हस होते तेव्हा सिद्धार्थने खूप जोक सांगून माझा मूड बदलायला मदत केली. माझ्याकडून चूक झाली तरी केदार शिंदे कधीच ओरडले नाहीत, की चिडले पण नाहीत. एक आठवड्यानंतर मला सगळ्या गोष्टी खूप सोप्या वाटू लागल्या आणि मी बरेचसे शॉट एका टेक मध्ये ओके केले. मी अशोक सराफ यांच्यासोबत काम केले आहे. त्यांच्यासोबत काम करणं तर माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय अनुभव आहे. मला एक गोष्ट नक्कीच सांगावीशी वाटेल की हे सगळे खूप मदत करतात आणि या सगळ्यांकडे इतकी प्रसिद्धी आहे, टॅलेंट आहे, यांचा प्रेक्षकवर्ग सुद्धा खूप मोठा आहे. एवढं सगळ असूनही ह्या लोकांचे पाय जमिनीवर आहेत.
* या नंतरचे तुझे प्लॅन्स काय आहेत?
- सगळ्यात आधी तर मला माझ ग्रॅज्युएशन पूर्ण करायच आहे. या सगळ्या व्यापामुळे मी माझे बरेचसे लेकचर्स बुडवावी लागली.मला माझ्या शिक्षकांनी इतकी मदत केली आहे की ग्रॅज्युएशन पूर्ण करण माझ पहिल ध्येय आहे. त्यानंतर अभिनयासोबतच मला 'मास कम्युनिकेशन'मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायच आहे. मला माहितेय झी गौरव पुरस्कार मिळाल्यानंतर प्रेक्षकांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. मी त्या अपेक्षा आणि जवाबदारी माझा उत्कृष्ट अभिनय देऊन नक्कीच पूर्ण करेन. माझे दोन चित्रपट येत आहेत आणि माझ्या शिक्षकांनी मला खूप मदत केली आहे म्हणून ग्रॅज्युएशन पूर्ण करण माझ पहिल ध्येय आहे. अभिनयासोबतच मला 'मास कम्युनिकेशन'मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायच आहे. झी गौरव पुरस्कार मिळाल्यानंतर प्रेक्षकांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. पण मला त्यांना सांगावस वाटतय कि मी सर्व अपेक्षाकाही निर्मात्यांबरोबर बोलण चालू आहे.मला असा विश्वास आहे की मी माझी स्वप्न पूर्ण करीन आणि सगळ्यात यशस्वी अभिनेत्री होईन.
|