मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Tuesday, April 28, 2015
मुख्य पृष्ठ - संपर्क | facebook twitter RSS Updates 
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
सुबोध भावे
मेधा साठे © मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम करिता
बालगंधर्वांवर चित्रपट व्हावा अशी माझीच इच्छा होती - सुबोध भावे.

मराठी संगीत नाट्यसृष्टीत 'बालगंधर्व' या नावाभोवती एक आदराच, कौतुकाच वलय आहे. जेव्हा महिला रंगभूमीवर काम अकरित नव्हत्या त्या काळात संगीत नाटकात प्रमुख स्त्री पार्ट करुन आपल्या रुपानं, गोड आवाजानं सर्वांना मोहित करुन टाकणारे महान कलावंत म्हणजे श्री नारायणराव राजहंस उर्फ ' बालगंधर्व'

त्यांचा अभिनय बघायला, गाणं ऐकायला त्या काळी प्रेक्षक खूप लांबचा प्रवास करुन येत. पाच अंकी नाटक रात्रभर चाले. अशा 'एकमेवाद्वितीय' व्यक्तीचा जीवनपट दोन तासांत रसिकांसमोर उलगडून दाखवायचा म्हणजे मोठे आव्हानच! हा चित्रपट ६ मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी बालगंधर्वांची भूमिका साकर करणार्‍या सुबोध भावेंशी केलेली ही बातचीत.

नुकताच झी गौरव आणि म. टा. सन्मान प्राप्त केल्याबद्दल सुबोध भावेंच अभिनंदन करुन त्यांना विचारलं.
 
Subodh Bhave, Balgandharva * बालगंधर्वांच्या जीवनपटावर चित्रपट निर्मितीचा विचार तुमच्या मनात कसा आला?
- 'कट्यार काळजात घुसली' ह्या नाटकाचं दिग्दर्शन केल्यावर आणि 'गंधर्वगाथा' हे संगीत नाटकावरील पुस्तक वाचल्यानंतर बरेच गैरसमज दूर झाले. 'बालगंधर्व' सर्वसामान्यांना समजावेत आणि संगीत नाटकाला वाहून घेणार्‍या कलावंतांचे ऋण थोड्याफार प्रमाणात फेडता यावेत या हेतूने हा चित्रपट काढावा असं माझ्या मनात आलं आणि नितीन देसाईंजवळ ही इच्छा बोलून दाखवली. त्यांनीही ते मान्य केलं.

* ८० वर्षांचा जीवनप्रवास दोन तासांत रसिकांसमोर उभा करणं खूप अवघड काम होतं हे तुम्हाला कसं शक्य झालं?
- बालगंधर्वांच्या ५० वर्षांच्या करिअरमधल्या महत्त्वाच्या घटना घेऊन हा एक ट्रेलर बनवला आहे.
संगीत नाटकाचे प्रेक्षकांना वेड लावणार्‍या कलाकारांना हा एक मानाचा मुजरा आहे. त्यांना उतारवयात का होईना पण प्रत्यक्ष पाहणारी पिढी अजून हयात आहे. त्यांच्या आठवणींचा फायदा करुन घेतला पाहिजे. नाहीतर नंतर पुस्तकातूनच वाचायला मिळेल.

* बालगंधर्वांचा काळ म्हणजे संगीत नाट्यसृष्टीचा सुवर्णकाळ ! हा चित्रपट यशस्वी व्हावा आणि ह्या भूमिकेला न्याय मिळावा म्हणून तुम्ही कोणते खास प्रयत्न केलेत?
- स्त्री पार्ट करणार्‍या त्यांच्यासारखं दिसण्यासाठी शारिरीक मेहनत करुन बारिक झालो. मला त्यांच्या फोटोपासून प्रेरणा मिळाली. त्यातील चेहर्‍यावरच्या हावभावांचा अभ्यास केला. खूप संदर्भ वाचनं केलं त्यांना ओळखणार्‍या लोकांशी बोललो. बालगंधर्वांची मुलगी सौ. खेडेकर, नातसून अनुराधा राजहंस, नूतन गंधर्व, जयमाला शिलेदार, शैला दातार यांच्या कडून माहिती जाणून घेतली. मुख्य म्हणजे त्यांची किंवा स्त्रीभूमिकेची नक्कल न करता आत्मा समजून घेतला. उच्छृखलपणा न येऊ देता सात्विकभाव पाळला.

* चित्रपटात प्रमुख स्त्री कलाकार कोण आहे?
- त्यांची पत्नी गोहरजानची भूमिका विभावरी देशपांडे यांनी केली आहे.

* तुम्हाला शास्त्रीय संगीताची आवड आहे का? तुम्ही संगीत शिक्षण घेतलं आहे का? या चित्रपटात पार्श्वगायन कोणी केलं आहे?
- मी संगीत शिकलेलो नाही. पूर्वी मला शास्त्रीय संगीत आवडत नव्हतं बरेच गैरसमज होते. पण शौनक, सलील, बेला, महेश काळे या मित्रांच्या सहवासामुळे आणि बालगंधर्वांच्या जीवनावर संशोधन करताना खूप संगीत ऐकलं आणि माझ्यात बदल झाला. आता हिंदुस्तानी संगीत खूप आवडायला लागलं आहे. तरी मी गात नाही त्यामुळे आनंद भाटे ह्या कलाकाराने पार्श्वगायन केले आहे.

* वृद्धांबरोबर इतर वयोगटातल्या प्रेक्षकांना हा चित्रपट आकर्षित करुन घेईल का?
- बालगंधर्वांच नाव ऐकल नाही असा कुणी मराठी रसिक नाही. संगीत आवडणार्‍या प्रत्येकाला बालगंधर्वांना बघण्याची संधी मिळाली नाही. पण त्यांच्या जीवनाविषयी, कलेविषयी उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यामुळे सर्व वयोगटातले संगीतप्रेमी रसिक प्रेक्षक हा चित्रपट बघणारच.

 मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2015. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.