मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Tuesday, April 21, 2015
मुख्य पृष्ठ - संपर्क | facebook twitter RSS Updates 
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
Untitled Document
सुबोध भावे
चेतना © मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम करिता
सुबोध मध्ये असे कोणते गुण आहेत की ज्यामुळे सिनिअर कलाकार नेहमीच त्याच कौतुक करतात?
- माझा प्रामाणिक पणा असू शकते, सतत काही तरी वेगळ करुन दाखवण्याची धडपड असू शकते. किंवा मी माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयाने मोठ्या असलेल्या कलाकारांचा आदर करतो आणी त्याच्याकडून जे काही नवीन शिकता येईल ते शिकण्याचा प्रयत्न करतो. कदाचित ह्या सर्व गोष्टींमुळे त्यांना माझ कौतुक कराव असं वाटत असेल.

पडद्यामागचा सुबोध कसा आहे? म्हणजे तू रिझर्व्ड असतोस कि तुला नविन मित्र बनवायला आवडतात?
- मी रिझर्व्ड तरी नक्कीच नसतो आणि नाही. . . . मला नविन मित्र-मैत्रिणी करायला आवडतं त्यांच्या गप्पाटप्पा मारायला मला आवडतात. त्यांच्याशी मैत्री करायला किती वेळ लागेल हे मी नाही सांगू शकत पण मैत्री झाल्यानंतर ती मी खूप चांगली टिकवू शकतो.

Subodh Bhave

सुबोध आम्हाला  पाककलेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसतो. अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायला तुला कितपत आवडत? . . . तुला वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतात का?
- खरं सांगू मला खूप मजा येते त्या शोचं सुत्रसंचालन करायला. पण मला एकही पदार्थ बनवता येत नाही. एक कप चहा सुद्धा मी नीट बनवू शकेल की नाही सांगता येत नाही. पण एक गोष्ट नक्की मला करायला आवडत नसलं किंवा जमत नसलं तरी मला इतरांनी बनवलेले पदार्थ खायला खूप आवडतात खास करुन शाकाहारी. . .  आणि म्हणूनच मी त्या शो मध्ये आहे.

'कट्यार काळजात घुसली' या नाटकात काम करताना आणि त्याच दिग्दर्शन करतानाचा तुझा अनुभव कसा होता? नाटकानंतर चित्रपट दिग्दर्शन करण्याचा तुझा विचार आहे का?
- काम करतानाचा अनुभव तर अमेझिंग होता. .  आहे. . . जवळ पास १२ वर्षांनी मी नाटकाचं दिग्दर्शन केल आहे. तेही संगीत नाटकाच. . . त्यातून एक असं नाटक जे खूप गाजलं होतं. . . त्यामुळे त्या नाटकाचं दिग्दर्शन करताना खूप दडपण होतं कारण त्या नाटकाला मी न्याय देऊ शकेल की नाही ही शंका सारखी सतावत होती. पण आज जेव्हा ते नाटक रंगमंचावर आलं आणि त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळतोय त्यावरुन मला खूप छान वाटतयं. नाटक केल्यानंतर मला नक्कीच चित्रपट दिग्दर्शित करायला आवडेल.

'कुलवधू' ही मालिका आता संपली आहे. . .तु तुझ्या सहकलाकारांची आठवण येते का?
- हो नक्कीच मला त्यांची आठवण येते. . .कारण आम्ही जवळजवळ तीन वर्ष एकत्र काम केलं आहे. ती मालिका माझ्यासाठी खूप स्पेशल होती कारण या पूर्वी मी झी वर खूप मालिका केल्या होत्या पण माझी प्रमुख भूमिका असलेली ती पहिलीच मालिका होती.
 
Subodh Bhave in Hapus 'हापुस' या आगामी चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी सांग. यात तू प्रमुख भूमिकेत दिसणार आहेस का?
-  मी त्यात अजित नावाच्या एका टिपिकल कोकणी मुलाची भूमिका करतोय. हापुस पिकवणार्‍या शेतकर्‍याला न्याय मिळावा यासाठी तो धडपडतोय. यात माझी किंवा आमच्यापैकी कुणाचीच प्रमुख भूमिका आहे ती 'हापूस'ची.

'कोण आहे रे तिकडे' मध्ये तू विनोदी भूमिका केली आहेस. . 'रानभूल' मध्ये तू निगेटीव्ह रोल मध्ये दिसतोस, आणि आता 'हापूस' मध्ये तुझी आणखी थोडी वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. . . ही भूमिका तुझ्यासाठी चॅलेंजिंग होती का?
- तसा माझ्यासाठी प्रत्येक भूमिका चॅलेंजिंग असतो. कारण माझं १००% देण्याचा प्रयत्न मी नेहमीच करत असतो. प्रत्येक भूमिका वेगळी असते. . . प्रत्येक भूमिकेतला मी वेगळा असतो. प्रत्येक चित्रपटाची कथा वेगळी असते. चित्रपट बनवणार्‍या, घडवणार्‍या व्यक्ती वेगळ्या असतात.
 तुमच्यातलं सर्वोत्तम देण्यासाठी तुमच्या आजुबाजूला सुद्धा तेवढयाच ताकदीचे कलाकार असणं आवश्यक आहे यावर तुझा विश्वास आहे का?
- हो. माझा या वाक्यावर पुर्ण विश्वास आहे. कारण चित्रपट हा काही एकपात्री नसतो. मी आतापर्यंत जेवढे चित्रपट, मालिका केल्या त्यात माझे सहकलाकार, माझे तंत्रज्ञ ताकदीचे असल्यामुळे मी माझं सर्वोत्तम देऊ शकलो असं मला वाटतं.

कलाकाराकडून उत्तमोत्तम काम करुन घेण्यामध्ये दिग्दर्शकाचा किती वाटा असतो?
- कलाकाराकडून उत्तमोत्तम काम करुन घेण्यामध्ये आणि चित्रपट पूर्णत्वाकडे नेण्यामध्ये दिग्दर्शकाचा खूप महत्त्वाचा वाटा असतो कारण कथेच्या, कथेतील पात्रांच्या जवळ तो पोहचलेला असतो आणि त्यामुळे तो प्रत्येक पात्राला घडवतो.

'हापूस' मध्ये असे कोणते प्लस पाँईटस आहेत ज्यामुळे हा चित्रपट हिट होऊ शकतो.?
- 'हापूस' हिट ठरु शकतो कारण - चित्रपटाच नाव सर्व काही सांगून जातयं. हापूस वर्षातून एकदा येत असला तरी सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा, लाडका आहे. त्यानंतर त्याची कथा, संदिप- सलीलची गाणी. आणि लास्ट बट नॉट लिस्ट हापूसची पडद्यावरची आणि पडद्यामागची पूर्ण टीम.मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2015. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.