Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Sunday, February 12, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
Untitled Document
सुहास जोशी
मुलाखतः संदिप हट्ट्गडी © मराठीमुव्हीवर्ल्डसाठी
"मला हिंदी चित्रपटात काम करावेसे नाही वाटत."- अभिनेत्री सुहास जोशी.

Suhas Joshi
सुहास जोशी यांना आपण सगळेच त्यांच्या 'कुंकू', 'अग्निहोत्र' या मालिका आणि 'तू तिथं मी', 'सातच्या आत घरात' , 'तेजाब' अशा चित्रपटातून सशक्त अभिनयामुळे ओळखतात. त्यांच्या स्वत: बद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी मारलेल्या गप्पा.

'कुंकू' आणि 'अग्निहोत्र' या सध्या चालू असलेल्या मालिकांना मिळणार्‍या प्रतिसादाबद्दल तुम्हाला  काय वाटते?
- या दोन्ही मालिकांना आणि माझ्या भूमिकेला मिळणार्‍या प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल खूप समाधानी आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की हे कार्यक्रम खूप काळ चालावे आणि त्यांना प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद मिळावा.

या मालिका स्विकारण्याच काही खास कारण?
- 'अग्निहोत्र' बद्दल सांगायचं झालं तर याची कथा खूप प्रभावी होती आणि सर्वच आघाडीचे कलाकार यात काम करत आहेत. तर नवोदित असणारी 'मृण्मयी देशपांडे' आणि त्याच्या कथेचं वेगळेपण हे 'कुंकू' कडे आकर्षित करणार्‍या गोष्टी ज्यामुळे मी या दोन्ही मालिका करायचं ठरवल.

'तू तिथं मी' आणि सातच्या आत घरात' या चित्रपटांनंतर तुम्ही चित्रपटात जास्त दिसला नाहीत.......
- मी कुणाकडे काम मागायला जात नाही आणि जर माझ्याकडे काही भूमिका चालून आल्या आणि त्या कराव्याशा वाटल्या तरचं मी त्या स्विकारते. माझी भूमिका असलेला 'आनंदी आनंद' हा मराठी चित्रपट पूर्ण झाला असून त्याचं प्रदर्शन थोड लांबणीवर गेलं आहे. मला हिंदी चित्रपटात काम करावेसे नाही वाटत. त्यामुळे हिंदी चित्रपटात काम स्विकारण बंद केलं आहे.

आणि नाटकं?
- हो, जर चांगल नाटक असेल तर मला काम करायला नक्की आवडेल.

काही नवीन मालिका ?
- नाही अजून तरी नाही. 'कुंकू' अजून ६-७ महिने तरी चालेल, आणि 'अग्निहोत्र' पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.




मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.