मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Saturday, April 18, 2015
मुख्य पृष्ठ - संपर्क | facebook twitter RSS Updates 
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
तेजा देवकर
चेतना गावखडकर © मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम करिता
Click Here To Read In English
तेजा देवकर - नृत्याकडून अभिनयाकडे


तेजा देवकर हे नाव सर्वांनाच परिचीत आहे. अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटात तिने आपलं अभिनयातलं कौशल्य सिद्ध केलं आहे. पण एक अभिनेत्री म्हणून नावारुपाला येण्यापूर्वी ती एक उत्तम नृत्यांगना आहे. आणि त्यामुळेच आज ती आपल्याला टेलिव्हिजनवर एका प्रसिद्ध रिऍलिटी शो मध्ये सादरीकरण करताना दिसत आ़हे. तिची पार्श्वभूमी आणि तिची सध्याची वाटचाल जाणून घेण्यासाठी मराठीमुव्हीवर्ल्डने थेट तिलाच गाठलं.

तुला तुझ्यातल्या कलाकाराची जाणीव कधी झाली ?
- खर म्हणजे आमच्या सात पिढ्यांमध्ये अभिनय- नृत्यामध्ये वगैरे कुणीच नाही. त्यामुळे थोडं अवघड होतं आणि माझ्या वडिलांना असं वाटायचं कि मी पायलट व्हाव. एके दिवशी मी रात्री ३ वाजता उठून त्यांना सांगितलं की मला पायलटिंग नाही करायचं मला डान्स मध्ये करिअर करायचं आहे. तेव्हा त्यांनी फार सपोर्ट केला. कधी काही बोलले नाहीत. का ? वगैरे असं काही विचारलं नाही. त्यांनी नेहमी मला फ्रिडम दिलं. माझे आई - बाबा नेहमी म्हणतात "रिग्रेट असा काही प्रकार नसावा म्हणजे आयुष्यात असं कधी वाटू नये की अरे हे जर मी केलं असतं तर बरं झालं असतं तुला जो निर्णय घ्यायचा तो घे आम्ही सल्ला देऊ शकतो. वाईट झालं तरी तो तुझा निर्णय असेल त्याबद्दल तुला वाईट वाटता कामा नये आणि चांगल झालं तरी वेल एण्ड गुड."
 

Tejaa Deokar तुझी पहिली संधी तुला कशी मिळाली ?
- F . Y . ला फायनल्स असताना मला पहिल्या फिल्मची ऑफर आली होती. तेव्हा फार हसले होते मी माझ्या आईने विचारलं होतं त्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना कि का घेताय तुम्ही माझ्या मुलीला तिला असलं काही येत नाही हो आणि त्यांची रिएक्शन अशी होती कि नाही हो ती छान करेन आम्हाला माहितेय. मी बेसिकली एक क्लासिकल डान्सर आहे. कथ्थकच शिक्षण पूर्ण केलं आहे. माझे ते दिग्दर्शक बेसिकली माझा कथ्थकचा एक कार्यक्रम होता पुण्यात तिथे आले होते. तिथे त्यांनी मला त्या पहिल्या फिल्म ची ऑफर दिली. ज्या फिल्ममुळे मी इंडस्ट्रीत आले ती फिल्म आयुष्यात कधी रिलीज झाली नाही हे माझं वेगळं दु:ख आहे. पण त्यानंतर बऱ्याच फिल्म करत गेले आणि खरं सांगायचं तर पहिले ४-५ चित्रपट करेपर्यंत मी अशी होते की आपल्याला आवडतं, आपल्याला ऑफर्स येतयात आपण करूया तोवर करिअर म्हणून मी मनावर घेतलच नव्हतं. तो पर्यंत माझ असं होत कि नाही आपण अभ्यास करूया T . Y .
पर्यंत मी अशीच होते. T . Y . संपेपर्यंत माझं असं झालं कि everything is happening good .कदाचित लोकांना आपलं काम आवडतं असेल म्हणून आपल्याला काम मिळतंय त्यानंतर मग मी खूपच सिरीअसली घेतलं.

तू आता पर्यंतकिती चित्रपट आणि मालिका केल्या ?

- मी ३२ चित्रपट केले त्यातले ३० रिलीज झाले. १ रिलीज झाला नाही. एक रिलीज होणार आहे. त्यानंतर डेलिसोप केले. माझी पहिली मालिका कुलस्वामिनी (स्टार प्रवाह) दुसरी 'एक झुंज वादळाशी', तिसरी 'मायलेक' (दोन्ही ई टीव्ही मराठी) आणि चौथी वृंदावन (मी मराठी) त्यानंतर सह्याद्रीवर ४-५. सह्याद्रीवर खरतरं ते डेलीसोप नसतात. ते आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा असतात. आणि साधारण दीड वर्षपूर्वी DD National वर 'कोई तो होगा अपना' हि मालिका केली होती. सध्या डेली सोप मधून जरा परत सुट्टी घेऊन फिल्म्सकडे वळाले. गेले २ वर्ष फक्त डेली सोप करून चित्रपटाकडे दुर्लक्ष झाल्यासारखं झालं मी म्हटलं जरा सोप कडून सुट्टी घेऊन चित्रपट करावे आणि मग परत डेली सोप कडे वळाले .

ढोलकीच्या तालावर या तुझ्या नाव्या शो बद्दल काहीतरी सांग.
- हा एक लावणी बस शो आहे. रेग्युलर डान्स रिएलिटी शोज असतात तिथे कोणताही डान्स फॉर्म सादर करू शकता. पण हा शो बेसिकली लावणीवर आहे. म्हणजे बैठकीची लावणी, रिमिक्स लावणी असे वेगवेगळे प्रकार पण लावणीतले, त्यात असे पण काही राउंड होते तिथे आम्ही वेस्टर्न विरुद्ध लावणी अशी जुगल बंदी केली होती. मी तॉप ६ पर्यंत पोहचले आहे. आता काही जणी कॉल बॅक मध्ये परत आल्या आहेत.

कॉल बॅक या संकल्पनेबद्दल तुला काय वाटतं?
- कॉल बॅक म्हणजे परत बोलवणं. तुम्ही पहिल्या दुसऱ्या एपिसोडला बाहेर पडता आणि त्यानंतर डायरेक्टली फायनल ५ किंवा फायनल ४ मध्ये येता. कॉल बॅक माझ्यासाठी थोडासा शॉर्टकट आहे. म्हणजे मी खूप appreaciate करत नाही पण माझा विरोध सुद्धा नाही. कारण सगळ्या रिऍलिटी शो मध्ये आजकाल कॉल बॅक असतात आणि हे एक गणित आहे. आपल्याला प्रत्येक गोष्ट शो मध्ये बघायला लागते. TRP असतो. प्रत्येक शोचं एक गणित आहे. या टेक्निकल गोष्टी आहेत. त्यात आपण पडून काही उपयोग नाही कारण प्रत्येक शो चा एक साचा असतो. शो कसा करायचा आहे किवा कोणत्या एपिसोड नंतर काय होणार हे ठरलेले असतं दिग्दर्शक, प्रॉडक्शन हाऊस किवां चॅनेल यांच्याकडे ते अधिकार असतात. त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. आपलं काम एवढंच आहे कि आपल्या हातात जेवढं आहे तेवढं चांगल काम करून मनोरंजन देण्याचा प्रयत्न करायचा.

ढोलकीच्या तालावर हा शो तू का स्वीकारलास ?
- ढोलकीच्या तालावर हा शो घेण्याचं माझं कारण असं होतं की मी खूप फिल्मस, डेलीसोप्स केले. प्रत्येक वेळी खूप रडले. ग्लिसरीनच्या खूप बाटल्या संपवल्या. पण कुठेतरी डान्सर हा एक बिल्ला होता माझा काही वर्षापूर्वी. कि तेजा म्हटलं कि ती एक उत्तम क्लासिकल डान्सर आहे, ते एक हरवल्यासारखं झालं फिल्म आणि सिरीअल मध्ये. मला असं वाटलं कि किमान आता सगळ्यांच्या लक्षात तरी देऊ दे कि मी हे सुद्धा करू शकते, म्हणजे ज्यांनी मला फक्त रडताना पाहिलंय. सोशिक भूमिकेमध्ये पाहिलंय ज्यांनी मला कधी हसताना बडबड करताना पाहिलंय नाही पण ते ढोलकीच्या तालावरच्या निमित्ताने लोकांना कळेल कि अरे तेजा अशी आहे. एका episode ला मी perform वगैरे केल्यावर खूप हसत होते ते व्हा आमच्या शो चा अँकर सुबोध असं बोलला कि हे काय तेजा . तुला आम्ही असं कधी पाहिलं नव्हतं तेव्हा मी त्याला सांगितल कि हि खरी तेजा आहे. जे मला बघतात ते film / serial चं character आहे आणि मी आहे ती हि आहे. मला हसणं, सगळ्यांबरोबर मजा करणं, मिक्स होण, गप्प मारायला आवडतं मला असं कुणीच पाहिलं नाही. मी डान्स करते हे सुद्धा फार कमी लोकांना माहित आहे. मला स्वतःला एक बदल हवा होता आणि मला माझ्या प्रेक्षकांना ही एक बदल द्यायचा होता कि मी अशी आहे तुम्ही बघा.

धन्यवाद तेजा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉमच्या खूप खूप शुभेच्छा.
 


 
 
मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2015. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.