"
मला मराठी चित्रपटात वेगळे असे
काहितरी करावयचे होते"
- तृप्ती भोईर
|
तृप्ति भोईर हे नाव मराठी चित्रपट्स्रुष्टित
नविन नाही.
सुरवातीला नाटक त्यानंतर
मालिका व त्यापाठोपाठ
चित्रपट असा प्रवास तिने केला
आहे.
'सही रे सही'
या सुप्रसिद्ध
नाट्काद्वारे यश मिळाल्यानंतर टिवी वर
'वादळ्वाट'
आणी
'चार दिवस सासुचे'
ह्या मलिकांमधुन तिने आपल्या अभिनयाची
एक वेगळीच छाप पाड्ली.
'इश्श्य', 'ओवाळ्ते भाउराया'
' तुझ्या माझ्या संसाराला
...' आणि
'पाउलखुणा'
हे
तृप्ति चे चित्रपट.
यापैकी
'तुझ्या माझ्या संसाराला
...' हा तिचा स्वत:चा चित्रपट.
तरिहि मनात खंत होति कि,
आपण काही वेगळ अस साकार करु
शकलो नाही.
पण जेव्हा
'अगड्बम'
ची कथा समोर आली त्यावेळी तिन फैसला केला कि चित्रपट करायचा तर हाच.
'अगड्बम'
येत्या ८ तारखेला प्रदर्शित होत आहे.
त्यानिमिताने
तृप्ति सोबत केलेली दिलखुलास बातचितः
प्रः तुमच्या चित्रपटाच बजेट ५ कोटि च्या पुढे गेला आहे.
खात्री आहे तुम्हाला कि तुमची रिकवरि होईल
? |
 |
|
ऊ:
ज्या भावनेतुन या चित्रपटाची निर्मिति होत आहे,
ती भावना मनात ठेवुनच आम्ही शुटिंग केल.
प्रोस्थेटिक मेकअप व्यतिरिक्त वि एफ एक्स वर भर देउन तांत्रिक दृष्टिने
एक उत्तम कलाकृति सादर करण्याचा मी प्रयोग केला आहे.
नाजुका च्या गेटअप मध्ये २५० किलो वजन पेलवून मी कसरतच केलि आहे.
त्यामुळे मला विश्वास आहे कि मराठी प्रेक्षक नक्किच दाद देतील.
प्रः लहानपणापासुन तुम्हाला ह्या कलेची आवड होती का?
उ
: शाळेत असताना मला
नृत्याची खुप आवड होती.
पण आई नेहमी म्हणायची,
'आधी अभ्यास मग सारे काही.
पुढे महाविद्यालयात शिकत असताना आंतर महाविद्यालयीन नाट्यस्पर्धांमधुन
अभिनयाचे धडे घेतले.
पण या सर्व गोष्टिंचा फायदा नंतर झाला.
|
 |
प्र.
२५० किलो वजनाची नाजुका साकार करताना कोणत्या अड्चणी आल्या?
उ:
प्रोस्थेटिक मेकअप तसा भारतीय चित्रपटांना नविन नाही.
कमाल हसन व अनिल कपूर यानी हा प्रयोग केला आहे.
पण एका स्त्री ने आणि तेही संपूर्ण बॉडी चा मेकअप तोही सलग २६ तास ठेवुन काम करण्याचा विक्रम मी केला आहे.
त्या स्थितित नाचुन व फाईट सीनही केले आहेत.
त्यासाठी माझा आमच्या मेकअपमन श्री.
पेमगिरीकर यांच्यावर पुर्ण विश्वास होता.
प्रः तुम्ही हा चित्रपट १७ दिवसात पुर्ण केला,
हे खर आहे का?
उ: हो.
व्यवस्थित प्लॅनिंग करुन आम्ही १७ दिवसात शूटिंग पुर्ण केले आणि तेही ४ गाण्यांसकट. आमचे दिग्दर्शक सतिश मोतलिंग यांनी खुप परिश्रम घेतले. |
|
प्रः तुम्ही वी एफ एक्स ईफेक्ट वापरुन बजेट वाढविले, त्याच नेमक कारण काय?
उ: मला नुस्ता प्रोस्थेटिक मेकअप करुन रेकोर्ड करायचा नव्हता. तर मराठीतील एक दर्जेदार चित्रपट होण्यासाठी वी एफ एक्स ची गरज होती.
प्रः या चित्रपटाच मार्केटिंग तुम्ही कस केलत?
उ:
गोविन्दा पासुन मी सुरुवात केली.
डोबिवली येथील गोविन्दामध्ये मी चक्क नाचले.
माझ्या नाजुकाच्या
वेशभूषेत गणपती उत्सवात तर मी महाराष्ट्रात
बर्याच ठीकाणी फिरले.
आजूनही प्रोमोशन चालूच आहे.
|