Facebook Twitter

मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Friday, May 18, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
 
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
 
विशाखा सुभेदार ह्यांच्याशी मारलेल्या मस्त गप्पा !
सुनिल पांचाळ © मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम करिता

* अभिनयाची सुरुवात कशी झाली?
- खरतरं लहानपणी मी बालनाट्यामध्ये काम करायचे पण माझ्या अभिनयाची खरी सुरुवात ही लग्नानंतरच झाली. लग्नानंतर मी व्यवसायिक नाटकातून काम करायला सुरुवात केली. 'लोका सांगे ब्रम्हज्ञान', 'जाऊ बाई जोरात', आणि 'एक डाव भटाचा' हि माझी भूमिका असलेली काही गाजलेली नाटके आहेत.

* नाटकांकडून टेलिव्हिजनकडे कशी वळलीस?
- मी काही मालिकांमध्ये काम केलं होतं पण 'कुमारी. गंगुबाई नॉनमॅट्रीक' मुळे लोक मला ओळखायला लागले. त्यानंतर अलिकडेच मी 'झी मराठी' च्या 'फू बाई फू' हा शो केला. हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला ज्यामुळे लोक मला अधिक ओळखायला लागले. 
 
Bharat Jadhav, Mast Chalalay Aamacha * म्हणजे तुला मिळालेल्या लोकप्रियतेमध्ये टेलिव्हिजनचा हातभार आहे?
- मी मला मिळालेल्या प्रसिद्धीचं श्रेय 'फू बाई फू' या मंचाला आणि साहजिकच 'झी' ला देते.... कारण त्यांनी दिलेल्या 'फू बाई फू' या संधीमुळेच मी आज ही लोकप्रियता अनुभवते आहे. 'फू बाई फू' ने मला लोकप्रियता मिळवून दिली आणि माझ्या अभिनयछटा घराघरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचल्या.

* 'फू बाई फू' मधील एखादा आठवणीतला प्रसंग?
- 'फू बाई फू' मध्ये एक स्किट होतं. ज्यात वैभवने एका संगमेश्वरी वकिलाचा रोल केला होता आणि मी एका म्हातारीची भूमिका. जी भूमिका आम्हाला आधी खूप सो...सो.... वाटली. मग आम्ही आणि लेखकाने बसून त्यात खूप enhancement केली. माझ्या पात्रासाठीचे बारीक बारकावे त्यात ऍड केले. तो ऍक्ट वन ऑफ द बेस्ट ऍक्ट होता.

* 'झी टॉकिज' च्या आगामी 'मस्त चाललय आमचं' या चित्रपटात तू दिसणार आहेस.. काय भूमिका आहे तुझी त्यात?

- ह्या चित्रपटात मी भरत जाधव च्या बायकोची भूमिका करत आहे. त्यांच्या मुलीच एका टपोरी रिक्षावाल्यावर प्रेम आहे. ज्याला माझ्या नवर्‍याचा विरोध आणि माझा पाठिंबा आहे.... मी या चित्रपटात 'अण्णामहाराजांची' भक्त आहे. मी जी भूमिका साकारतेय तिचा आपल्या नवर्‍यावर बिल्कुल विश्वास नाही. तिला सारखी अशी शंका असते की आपल्या नवर्‍याच बाहेत काहीतरी चालू आहे...
अशी भूमिका आहे माझी.

* या चित्रपटाच कथानक ऐकल्यावर 'एक डाव भटाचा' या नाटकाची आठवण होते....
- हो ....... अगदी बरोबर.... हे कथानक नाटकावरच बेतलेलं आहे. त्या नाटकात मी जी भूमिका साकारली होती तीच भूमिका मी या चित्रपटात साकारत आहे.

* नाटकाच्या कथानकाचा वापर करताना आणि भूमिका साकारताना कोणते बदल केले? कोणती काळजी घेतली?
- नाटक करताना expressions अर्थातच loud असतात. चित्रपटात ते loud होऊ नयेत यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. नाटकाचे आणि चित्रपटाचे दिग्दर्शक सचीन गोस्वामी यांनी खूप छान समजवल्यामुळे खूप सोपं गेलं चित्रपटात काम करणं.

* तू रिअल लाईफ मध्ये सुद्धा धार्मिक आहेस का?

-थोडी फार आहे..... पण या चित्रपटात सारखं 'देव देव' करत असते तसं मी नाही करत,

* चित्रपटात विनोद कोणत्याप्रकारे हाताळला आहे..?
- या चित्रपटात जाणून बुजून एकही विनोद करण्यात आला नाही. ही एक साधी सरळ गोष्ट आहे. यात टाळ्या किंवा शिट्ट्या मिळाव्या म्हणून कोठेही विनाकारण पंचेस टाकण्यात आलेले नाहीत. हा चित्रपट एक सिच्युएशनल कॉमेडी सादर करतो.

* तू या पुढे नक्की काय करणार? चित्रपट, टेलिव्हिजन की नाटक?
- अजून काही ठरलेलं नाही, मला फक्त विनोदी भूमिकाच करायच्या आहेत असं काही नाही. मी आगमी 'बालगंधर्व'  आणि 'फक्त लढ म्हणा' या चित्रपटात सुद्धा भूमिका करत आहे.
 



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.