दिल्ली, लखनौ, मुंबई, बंगळूर यांसह विविध शहरांतील तब्बल २०००हून अधिक गायकांचा
समावेश असलेला, 'अंतर्नाद' हा भव्य महोत्सव 'आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन' तर्फे १२
जानेवारीला पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून संस्थेतर्फे हा कार्यक्रम आयोजित
करण्यात आला आहे. 'आर्ट ऑफ लिव्हिंग'ची गायिका चित्रा रॉय, प्रसिद्ध गायक पं.
राजन-साजन मिश्रा, संगीतकार- गायक शंकर महादेवन यांच्या नेतृत्वाखाली ही मैफल
रंगणार आहे.
पं. श्री रविशंकर या वेळी उपस्थित राहणार आहेत. मैफलीसाठी हिंदुस्तानी शास्त्रीय
संगीतातील राग श्री, पूरिया धनाश्री, देस, बसंत बहार या रागांची निवड केली असून
मैफिलीची रंगीत तालीम सध्या सुरू असून, एक ते तीन जानेवारीदरम्यान दुसरी सराव फेरी
होणार आहे.