| |
|
|
| सिनेवार्ता |
'अर्धा गंगू अर्धा गोंद्या' चित्रपटात खास देशभक्तीपर गीत!
१४ ऑगस्ट २०१० © मराठीमुव्हीवर्ल्ड |
"स्वतंत्र करण्या भारत आपुला, ज्यांनी वेचीला प्राण!
विसरु नका हो कधी कदापी त्यांचे हे बलीदान!"
हे या अबाल- वृद्धांच्या मनावर देश स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या प्राणाची
आहुती देऊन, रक्त सांडवून, आपले सारे आयुष्य भारतदेशासाठी अर्पण करणार्या
देशभक्तांच्या बलिदानाची महती कथन करणार्या खास गीताची निर्मिती प्रसिद्ध
अभिनेते मुकेश खन्ना यांनी ज्येष्ठ बंधू वेद खन्ना यांच्या सोबतीने त्यांच्या
रिषी-राज प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेतर्फे 'अर्धा गंगू अर्धा गोंद्या' या
मराठी चित्रपटासाठी केली आहे. लोकप्रिय गायक विनोद राठोड यांच्या आवाजातील हे
गीत ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांनी ते संगीतबद्ध केले आहे. गीतकार अनंत जाधव
यांनी हे गीत लिहिले असून चित्रपटाचा नायक दिपक राजपूत याच्यावर ते चित्रीत
करण्यात आले आहे.
|
 |
|
|
|
|
|
|
|
|