मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Saturday, April 25, 2015
मुख्य पृष्ठ - संपर्क | facebook twitter RSS Updates 
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
सिनेवार्ता
रितेश देशमुख, उत्तुंग ठाकूर आणि रवी जाधव यांची निर्मिती असलेल्या
बीपी (बालक पालक) चित्रपटाची घोषणा.
शुक्रवार, १४ सप्टेंबर २०१२ | © मराठीमुव्हीवर्ल्ड
View Exclusive Photographs
Ritesh Deshmukh, Ravi Jadhav, Balak Palakप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांची मुंबई फिल्म कंपनी, उत्तुंग ठाकूर यांची विवा इन आणि रवी जाधव फिल्म्सची संयुक्त निर्मिती असलेल्या बीपी ( बालक पालक) चित्रपटाची घोषणा एका पत्रकार परिषदेत करण्यात आली.

या वेळी रितेश देशमुख, उत्तुंग ठाकूर, रवी जाधव यांच्यासह किशोर कदम, सई ताम्हणकर, प्रथमेश परब, शाश्वती पिंपळीकर, मदन देवधर, भाग्यश्री सकपाळ, रोहित फाळके, सुबोध भावे, अमृता सुभाष, अविनाश नारकर, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, सतीश तारे, सुप्रिया पाठारे आदी मान्यवर उपस्थित होते. 'मुंबई फिल्म कंपनी' आणि 'विवा इन' या संस्थेद्वारे श्री. रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकूर चित्रपट निर्मिती मध्ये पदार्पण करीत आहेत. बीपी चे आणखीन एक मोठे वैशिष्ट म्हणजे बॉलीवूडमधील प्रख्यात संगीतकार जोडी विशाल - शेखर यांनी या चित्रपटाद्वारे मराठीचित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे ."करूया आता कल्ला" आणि "हरवली पाखरे" ही दोन गाणी मराठी चित्रपट संगीत क्षेत्रात धमाल उडवणार.

बीपी हा चित्रपट म्हणजे एक हलकेफुलके नाट्य आहे. नाटयातून प्रेक्षकांना आपल्या मुलांशी कसा संवाद साधायला हवा हे समजणार आहे. 
मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2015. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.