Untitled Document
Change Language: English  | Thursday, September 02, 2010
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता सिनेमा परीक्षण मुलाखत
 
 
Untitled Document

सिनेवार्ता
बेला शेंडे यांच्या 'अर्पण' या अल्बमचे प्रकाशन
४ जानेवारी २०१० © मराठीमुव्हीवर्ल्ड
'फाउंटन म्युझिक कंपनी'तर्फे डॉ. शेंडे यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि बेला शेंडे यांनी गायलेल्या मराठी भावगीतांच्या 'अर्पण' या अल्बमचे प्रकाशन बुधवारी २७ जानेवारी रोजी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते झाले. निमित्त होते डॉ. शेंडे यांच्या षष्टयब्दीपूर्तीचं.

एस. एच. एंटरप्रायझेस' तर्फे आयोजित या कार्यक्रमात 'सकाळ'चे संपादक सुरेशचंद्र पाध्ये यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी 'फाउंटन'चे कांतिभाई ओसवाल या वेळी उपस्थित होते. या अल्बममधील काही रचना बेला शेंडे यांनी सादर केल्या. उत्तरार्धात प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी यांनी 'स्वराभिषेक' हा पं. जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेल्या नाटयगीतांचा कार्यक्रम सादर केला.

'फाउंटन म्युझिक' निर्मित या अल्बममध्ये कवी विंदा करंदीकर, वा. रा. कांत, सुरेश भट, शांता शेळके यांच्या रचनांचा समावेश आहे. यात भावगीतांसह गझल, रोमॅटिक गीते आहेत. या गीतांचे ध्वनीमुद्रण करताना सारंगी, सतार, बासरी आणि व्हायोलिन या वाद्यांचा वापर करण्यात आला आहे.

 

 

 
Untitled Document
मुख्य पृष्ठ| संपर्क