| |
|
|
| सिनेवार्ता |
'भैरोबा' कौटुंबिक विनोदी मालिका साम वाहिनीवर २३ फेब्रुवारी २०१० © मराठीमुव्हीवर्ल्ड |
'कुंडली' सारख्या गाजलेल्या मालिकेनंतर पी. एम. आय एंटरटेन्मेंट इंडिया प्रा.
लि. च्या बॅनरखाली 'भैरोबा' ही कौटुंबिक पण विनोदी मालिका साम मराठी वाहिनीवर
मंगळवार दि. २३ फेब्रु. पासून सोम. ते शनी. सायं ७.३० वा प्रसारीत होणार आहे. मनीष
पटाडिया व अजय पटाडिया यांनी 'भैरोबा' ची निर्मिती केली आहे. गौतम कोळी यांनी
'भैरोबा' या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. कथेची संकल्पना डॉ. श्री बालाजी तांबे
यांची असून, कथा- पटकथा समीर जोशी यांनी लिहीली आहे तर संवाद चिन्मय केळकर यांनी
लिहीले आहेत.
प्रख्यात अभिनेते मोहन जोशी प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासह वंदना वाकनीस, गौरी
सुखटणकर, रुचा हसबनीस, स्वप्नील फडके, आशीष कुलकर्णी, निर्मल कोटणीस, आशा साठे व
बालकलाकार वेदांती गायकवाड यांच्या भूमिका आहेत. शरद पोंक्षे लक्षवेधी भूमिकेत
आहेत. अश्विनी शेंडे यांनी लिहिलेल्या शिर्षक गीताला अशोक पत्की यांनी संगीत
दिले आहे. संकलन नरपत चौधरी व कला दिग्दर्शन समरेष करत आहेत. अमिता खोपकर
मालिकेच्या क्रिएटीव्ह हेड असून शाहीद सय्यद कार्यकारी निर्माते आहेत.
'भैरोबा' ही कौटुंबिक, विनोदी मालिका साम मराठी वाहिनीवरील मालिका सर्व
स्तरावरील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असे निर्मात्यांनी
सांगितले. |
 |
|
|
|
|
|
|
|
|