मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Wednesday, April 16, 2014
मुख्य पृष्ठ - संपर्क | facebook twitter RSS Updates 
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
सिनेवार्ता
'चार्ली' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न.
गुरुवार, २० सप्टेंबर २०१२ | © मराठीमुव्हीवर्ल्ड
 
Bharat Jadhav, Charlie Marathi Film

सस्पेन्स, थ्रिलर, सिच्युएशनल कॉमेडी आणि चार्ली चैप्लिन चित्रपटाचे गुण वैशिष्ट्य असलेली ब्लैक कॉमेडी हे चार घटक परस्परपूरक पद्धतीने एकत्र करुन 'समृद्धि क्रिएशन्स' निर्मित अणि 'पर्व क्रिएशन्स' सहनिर्मित चार्ली हा सिनेमा विदीन सिनेमा अर्थात चित्रपटातला चित्रपट आकारला येतोय. मुंबईत झालेल्या एक भव्य कार्यक्रमात  ह्या चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला. या चित्रपटाचा नायक भारत जाधव याने एका  शवपेटीच्या आत दडलेले या चित्रपटाचे शीर्षक अनोख्या पद्धतीने जाहीर केले. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते बाबा काळे अभिनेते सतीश पुळेकर, भारत जाधव, सहनिर्माते रवी गोळे, ज्येष्ठ सनदी अधिकारी गजभिये आणि मराठी चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर उपस्थित होते. 

चार्ली चाप्लिन ह्यांना आदरांजली म्हणून या चित्रपटाचे नामकरण 'चार्ली' असे करण्यात आले आहे असे यावेळी दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनी सांगितले तसेच छायाचित्रण आणि संगणकीय तंत्रात झालेल्या नव्या बदलाचा आधार घेऊन हा सिनेमा आकारास येईल असे ते म्हणाले. 

 



 




मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2013. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.