मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Monday, June 17, 2013
मुख्य पृष्ठ - संपर्क | facebook twitter RSS Updates 
marathimovieworld Zapatalela, Tatya Vinchu  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
सिनेवार्ता
'भारतीय' चे चित्रीकरण सुरू.
२१ मे २०१२ © मराठीमुव्हीवर्ल्ड

Subodh Bhave, Bhartiya'देऊळ'च्या यशानंतर चित्रपट निर्माते अभिजीत घोलप यांनी आपल्या 'देविशा फिल्म्स' तर्फे 'भारतीय' चित्रपटाची घोषणा केली असून या चित्रपटाचे सध्या जकीनपेठ (ता.भुदरगड. जि. कोल्हापूर) या अति दुर्गम भागात चित्रीकरण सुरू आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते करीत आहेत. चित्रपटाची कथा व पटकथा अनिरुद्ध पोतदार यांनी लिहिली असून संवाद संजय पवार यांचे आहेत.

चित्रपटाला अजय- अतुल यांचे संगीत असून गीते गुरु ठाकुर आणि संदीप खरे यांनी लिहिली आहेत. मकरंद अनासपुरे, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, कुलदीप पवार, डॉ. मोहन आगाशे, ऋषिकेश जोशी, मिता सावरकर, स्मिता तळवळकर, उज्वला जोग, शुभांगी लाटकर, तेजश्री खेळे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे नव्वद टक्के चित्रीकरण कोल्हपुरात होणार असून हा चित्रपट १० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.





 



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2013. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.