मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Thursday, April 24, 2014
मुख्य पृष्ठ - संपर्क | facebook twitter RSS Updates 
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
सिनेवार्ता
 
'कलाकार'मध्ये भूषण साकारत आहे 'सुपरस्टार'.
शनिवार, ०२ जून २०१२ | © मराठीमुव्हीवर्ल्ड

Kalakar Marathi Movie, Actor Bhushan Pradhan
आशय पालेकर निर्मित भूषण प्रधान अभिनित 'कलाकार' या चित्रपटाचे चित्रीकरण मंगळवारी मॅक्स स्टोर्स, आर मॉल, ठाणे येथे झाले.

रंगमंच एन्टरटेन्मेन्ट निर्मित 'कलाकार' या चित्रपटाचे निर्माते आशय पालेकर असून दिग्दर्शक साकार राऊत आहेत. भूषण प्रधान आणि अमृता देशमुख हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. छोट्या गावातून आलेल्या एका सामान्य तरूणाचा सुपरस्टार पर्यंतचा प्रवास म्हणजे 'कलाकार' चित्रपट होय. सुपरस्टार झालेला हा चित्रपटाचा नायक 'मॅक्स स्टोर्स'चे उद्घाटन करतो असे दृश्य मंगळवारी ठाण्याच्या आर मॉलमधील मॅक्स स्टोर्स येथे पार पडले. सदर दृश्य भूषण प्रधान याच्यावर चित्रीत करण्यात आले.

चित्रपटाविषयी बोलताना भूषण प्रधान म्हणाला की, माझी वाटचाल ही कुठेतरी कलाकार चित्रपटातल्या नायकासारखीच आहे. ही भूमिका साकारताना खरोखरच एक वेगळा अनुभव आणि आनंद मिळत आहे.

'कलाकार'चे दिग्दर्शक साकार राऊत चित्रपटाविषयी माहिती देताना म्हणाले की, आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम अभिनेते आहेत. पण सुपरस्टार नाही. बॉलिवुडमधल्या सलमान, शाहरुख, आमिर सारखा सुपरस्टार आपल्याकडे देखील होऊ शकतो, हे या चित्रपटातून दाखविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.




 



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2013. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.