Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Sunday, February 05, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
सिनेवार्ता
'चल लवकर' ३ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार.
24 June 09 | ©MMW News
'कुठे कुठे शोधू मी तिला', 'चिकट नवरा', ' सुना येती घरा', 'माणूस', 'चालू नवरा भोळी बायको', चतूर नवरा चिकणी बायको' या सारख्या चित्रपटाच्या निर्मितीनंतर ए. राधास्वामींचा 'जय श्री सिद्धी विनायक चित्र'च्या बॅनरखाली 'चल लव कर' हा विनोदी चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आहे. केवळ निर्मितीच नव्हे तर अंजली वळसगावकर या अभिनेत्री सोबतच 'सुना येती घरा' ह्या चित्रपटातून अंकुश चौधरी व 'चालु नवरा भोळी बायको' या चित्रपटातून भरत जाधवला नायक म्हणून ब्रेक मिळवून दिला. 'चतूर नवरा चिकणी बायको' या चित्रपटातून भरतला डबलरोल मध्ये प्रथमच पडद्यावर आणलं. तसंच एक विनोदी अभिनेता ह्या इमेज मधून बाहेर काढून 'माणूस' चित्रपटातून त्याला एका गंभीर भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आणलं. ए. राधास्वामी यांनी मराठी चित्रपटातून केलेल्या प्रयोगांना स्विकारत प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

'चल लवकर' या चित्रपटाची कथा-पटकथा स्वतः ए. राधास्वामी ह्यांचेच असून संवाद प्रताप गंगावणे ह्यांचे आहेत. संगीत अनिल मोहिले ह्यांच असून छायाचित्रण चारुदत्त दुखंडे ह्यांचे आहे. 'खबरदार' , 'जबरदस्त' या चित्रपटांनंतर भरत जाधव आणि संजय नार्वेकर या जोडगोळीची करामत या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.या दोघांसोबत या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, स्मिता शेवाळे, विजय चव्हाण, नयना आपटे, आनंद अभ्यंकर, किशोरी अंबिये, मैथिली वारंग या सारख्या आघाडीच्या कलाकारांचा समावेश आहे. आता हा मल्टीस्टार, संगीतप्रधान कौटुंबिक विनोदी चित्रपट ३ जुलैला प्रेक्षकांची करमणूक करण्यासाठी प्रदर्शित होत आहे.


chal love kar



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.