ऐश्वर्या मुव्हीजची निर्मिती असलेल्या 'डोंबारी' या चित्रपटाचे चित्रीकरण
पुण्याच्या पौड, मुळशी, सावरगाव, बेलवडे या परिसरात सध्या सुरु आहे. चाकोरी बाह्य
विषयाची हाताळणी करून 'डोंबारी' समाजावर थेट भाष्य करुन प्रकाशझोत टाकणार्या या
चित्रपटाची कथा - पटकथा व दिग्दर्शक अशी तिहेरी बाजू सुनिल वाईकर हे संभाळत आहेत.
पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज जीवघेणी कसरत करून लोकांना करमणूक करून दाखवणे
स्वतःच्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला असला तरी कष्ट करून मुलांना
चांगले शिक्षण द्यायचे असे स्वप्न त्यांच्यातील अनेकजण पाहू लागले आहेत .
असेच काहीसे स्वप्न पाहणाऱ्या एका 'डोंबारी' कुटुंबाची कथा या चित्रपटात मांडली आहे.
अशा वेगळ्या धाटणीच्या विषयाचे संवाद लेखन शंकर नर्हे यांचे असून गीत लेखन रवी
पाईक व राजेंद्र भोसले यांचे आहे. तर संगीताची धुरा संगीतकार हर्षीत अभिराज यांनी
संभाळली आहे.
मिलिंद शिंदे, हेमांगी कवी, मधू कांबीकर, मेधा घाडगे, मोहिनी कुलकर्णी, दादा पासलकर,
दिपक करंदीकर, संजय खापरे हे कलाकार चित्रपटात आपल्याला दिसतील.