'मी
मराठी' घेऊन येत आहे नवा कार्यक्रम 'एक तास भुताचा' ३ जून पासून शुक्रवार आणि
शनिवार रात्री ९ वाजता.
या मालिकेची निर्मिती 'एक्स्प्रेशन एन्टरटेनमेन्ट' यांनी केली असून अभिनेत्री
अमिता खोपकर या मालिकेच्या निर्मात्या आहेत. दिग्दर्शन संजय खांबे यांचे असून
संजीव कुमार यांनी छायंकन केले आहे. ही भूतकथांची भयावह मालिका प्रेक्षकांना
घाबरवत एक वेगळ्या प्रकारचे मनोरंजन देऊन जाईल.