'ईटिव्ही मराठी'वर 'ढोलकीच्या तालावर' या कार्यक्रमातील लावण्यांचा फड आता
आठवडयागणिक अधिकच रंगत आहे. लावण्यांचे पारंपारिक आणि आधुनिक प्रकार सादर करुन
यातील स्पर्धक नृत्यांगणा आता एकमेकींना आव्हान देण्यासाठी खर्या अर्थाने सज्ज
झाल्या आहेत. पारंपरिक लावणी विरुद्ध पाश्चात्य नृत्याची रंगतदार स्पर्धा.
नववर्षाच्या पहिल्या आठवडयात म्हणजे ४ आणि ५ जानेवारीच्या भागामध्ये लावणीचा हा फड
प्रेक्षकांना 'ई टीव्ही' मराठीवर रात्री ९.३० वाजता पाहता येईल.
या सगळ्यांचं परीक्षण करायला या आठवडयात परीक्षक विश्वास पाटील, सुरेखा पुणेकर आणि
अमृता पत्की यांच्या सोबत नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य आणि दिग्दर्शक व ऍड मेकर
अभिनय देव यांची उपस्थिती असणार आहे.