Facebook
 
मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Sunday, February 05, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
सिनेवार्ता
'हॉटेल हनिमून' नाटक रंगमंचावर हजर.
१ ऑक्टोबर २००९ © मराठीमुव्हीवर्ल्ड

संजीवनी थिएटर्स आणि श्री. कळेश्वर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्माते स्वप्निल आणि संजीवनी जाधव निर्मित 'हॉटेल हनिमून' हे धमाल विनोदी फार्सिकल नाटक २३ सप्टेंबर रोजी रंगभूमीवर दाखल झालं. याचा शुभारंभाचा प्रयोग प्रबोधनकार ठाकरे सभागृहात दु. ४ वाजता अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत साकार झाला.

प्रा. शशीकांत कोनकर लिखित या नाटकाचे दिग्दर्शन 'लालबागचा राजा' चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक विजय खानविलकर यांच असून गीत, संगीत जगदीश पाटील ह्यांचे आहे. याच मनमोहक नेपथ्य दिपक पडते यांचे आहे. व नृत्य दिग्दर्शनाची बाजू संतोष आंबरे यांनी सांभाळली आहे. यात प्रदीप पटवर्धन, मयुर कोतेकर, पूनम जाधव, अंकिता चंद्रकांत, रोहन पेडणेकर, प्रदीप डोईफोडे स्वतः दिग्दर्शक विजय खानविलकर आणि संजीवनी जाधव ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संजीवनी जाधव ह्यांची ही दुसरी नाटय निर्मिती असून ह्या आधी त्यांनी 'पोलिस बि घडवतात' या यशस्वी विनोदी नाटकाची निर्मिती केली आहे.

ही कथा आहे हनिमून हॉटेलात हनीमूनसाठी उतरलेल्या एका जोडप्याची आणि त्यांनी आपल्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याच्या रागाने त्यांच्या हनिमून न होता त्यांना वेगळ करण्याच्या मुलीच्या आईवडिलांच कारस्थान असते. ह्या कारस्थानात त्यांना हॉटेलच्या मॅनेजरची प्रथम मदत मिळते. पण नंतर तो त्या नवविवाहीत जोडप्याच्या बाजूने उभा राहतो. त्या मॅनेजरचही त्या हॉटेलच्या मालकाच्या मुलीवर प्रेम असतं. पण हॉटेल मालकाचा ह्या विवाहाला विरोध असतो. अशा पार्श्वभूनीवर त्या हॉटेलात हास्याचा फुलोरा फुलवणार्‍या अनेक विनोदी वेगवान घटना घडतात व प्रेक्षक पोट धरुन हसतात. केवल विनोदच नाही तर जोडीला नृत्य व संगीताची भरभराट असलेलं हे नाटक प्रेक्षकांना मनपसंत करमणुक देऊन त्यांना मनमुराद हसवित व रसिकांना एक निर्मळ करमणुकांचा आनंद मिळेल ह्या हेतूने ह्या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे.

Pradip Patwardhan



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.