Facebook Twitter

मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Friday, May 18, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
 
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
 
सिनेवार्ता
  
'काट्यांची मखमल' या गझल अल्बमचे प्रकाशन.
१७ जानेवारी २०१२ © मराठीमुव्हीवर्ल्ड
युनिव्हर्सल म्युझिक इंडिया प्रस्तुत 'काट्यांची मखमल' या गझल अल्बमच्या निमित्ताने दिलीप पांढरपट्टे, सुधाकर कदम, सुरेश वाडकर आणि वैशाली माडे अशी नामांकित आणि आदरित नावे एकत्र येत आहेत. १६ जानेवारी रोजी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक यशवंत देव आणि अशोक पत्की यांच्या हस्ते ह्या अल्बमचे प्रकाशन करण्यात आले.

प्रसिद्ध कवी श्री. दिलीप पांढरपट्टे यांचे अनोखे व नाविन्यपूर्ण कल्पना मांडणारे लेखन आणि गझल गंधर्व सुधाकर कदम यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या या अल्बममध्ये वेगवेगळे मूड आणि शैली दर्शविणार्‍या ९ गझला आहेत.

या अल्बमबद्दल बोलताना सुरेश वाडकर म्हणतात "हा अल्बम म्हणजे अशी रेकॉर्ड आहे जिच्याशी सर्वजण स्वतःला जोडू शकतील आणि ती माझी खूप आवडती आहे. मला खात्री आहे की श्रोत्यांना हा अल्बम खूपच आवडेल."
 



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.