| |
|
|
| सिनेवार्ता |
'क्रांतिवीर राजगुरुं'ची जयंती मोठया उत्साहात साजरी.
२८ ऑगस्ट २०१० © मराठीमुव्हीवर्ल्ड |
भगतसिंग, सुखदेव, राजगुरु. . . भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या ज्वालेतील तीन
धगधगते निखारे. इतिहासात त्यांच्या प्रखर देशभक्तीच्या शौर्यगाथा सुवर्णाक्षरात
लिहिल्या गेल्यात. या तीन रत्नांतील एक तेजस्वी रत्न म्हणजे मराठी मातीतील
शिवराम हरी राजगुरु.
२४ ऑगस्ट हा राजगुरुंचा जन्मदिवस. 'श्री भवानी चित्र
कम्बाईन' या चित्रपटनिर्मिती संस्थेच्या वतीने नुकतीच क्रांतिवीर राजगुरुंची
जयंती साजरी करण्यात आली. मुंबईतल्या जॉगर्स पार्क, लोखंडवाला येथे पार पडलेल्या
या कार्यक्रमाच्या दरम्यान 'श्री भवानी चित्र कम्बाईन'चे श्री. श्रेयस कामले,
राजेंद्र कामले, दिपक गांधी, सुप्रिया सावंत, अँड. मोहन पिंपळे, निर्माते-दिग्दर्शक अशोक कामले आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
|
 |
|
|
|
|
|
|
|
|